वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न | Varnmala Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 3

Varnmala Marathi Grammar Question | वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न |Marathi grammar practice question|Marathi vyakaran Sarav paper

Varnmala Marathi Grammar Question | वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न |Marathi grammar practice question|Marathi vyakaran Sarav paper

वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न

Question : 1
खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते ? योग्य पर्याय निवडा
❶ त् + य् = त्य्
❷ म् + ह् + अ = म्ह
❸ प् + प् = प्प्
❹ क् + अ = क
📝 स्पष्टीकरण : दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र आल्यास त्याला संयुक्त व्यंजन म्हणतात.
येथे त् + य् = त्य् हे संयुक्त व्यंजनाचे अचूक उदाहरण आहे, कारण यात कोणताही स्वर मिसळलेला नाही.
Question : 2
भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना ........ स्वर म्हणतात
❶ दीर्घ
❷ संयुक्त
❸ सजातीय
❹ विजातीय
📝 स्पष्टीकरण : वेगवेगळ्या किंवा भिन्न उच्चारस्थानातून उत्पन्न होणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ-इ, अ-उ, उ-ई, इ-ऊ ही विजातीय स्वरांची उदाहरणे आहेत.
Question : 3
खालीलपैकी विजातीय स्वरांची / च्या जोडी / ड्या सांगा ?
❶ अ - इ
❷ अ - उ
❸ उ - ई
❹ वरील सर्व
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या सर्व जोड्या (अ-इ, अ-उ, उ-ई) या विजातीय स्वरांच्या आहेत.
कारण या प्रत्येक जोडीतील स्वरांचे उच्चारस्थान (कंठ, तालू, ओष्ठ) भिन्न-भिन्न आहे.
Question : 4
पुढील स्वर जोड्यातून विजातीय स्वर जोडी असलेला पर्याय निवडा ?
❶ अ - आ
❷ अ - ई
❸ इ - ई
❹ उ - ऊ
📝 स्पष्टीकरण : 'अ - ई' ही जोडी विजातीय स्वरांची आहे कारण 'अ' चा उच्चार कंठ आहे तर 'ई' चा उच्चार तालू आहे.
बाकी सर्व पर्याय (अ-आ, इ-ई, उ-ऊ) हे एकाच उच्चारस्थानातून निघणारे म्हणजेच सजातीय स्वर आहेत.
Question : 5
स्वरमालेतील अं आणि अ: या दोन वर्णाना काय म्हणतात ?
❶ संयुक्त स्वर
❷ स्वरादी
❸ दीर्घ स्वर
❹ स्वरांत्न
📝 स्पष्टीकरण : वर्णमालेतील अं (अनुस्वार) आणि अः (विसर्ग) यांना स्वरादी म्हणतात.
स्वरादी म्हणजे 'ज्याचा आदी (सुरुवातीला) स्वर आहे असा'. यांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावा लागतो.
Question : 6
खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा
❶ पंती
❷ पत्नी
❸ पन्ती
❹ पम्ती
📝 स्पष्टीकरण : 'पत्नी' हा शब्द जोडाक्षराने युक्त अचूक शब्द आहे.
यात त् + न् + ई = त्नी हे जोडाक्षर आले आहे, जिथे दोन व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळला आहे.
Question : 7
ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात ?
❶ व्यंजन
❷ स्वर
❸ स्वरादी
❹ संयुक्त स्वर
📝 स्पष्टीकरण : ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही, तर त्यांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वरांचे साहाय्य घ्यावे लागते, त्यांना व्यंजन म्हणतात.
व्यंजनांना परवर्ण किंवा स्वरान्त असेही म्हणतात.
Question : 8
मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण किती व्यंजनांचा समावेश होतो ?
❶ 34
❷ 48
❸ 52
❹ 14
📝 स्पष्टीकरण : मराठी भाषेच्या पारंपारिक आणि आधुनिक वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत.
यामध्ये क-वर्गापासून तेळ-वर्णापर्यंतच्या व्यंजनांचा समावेश होतो. (क्ष आणि ज्ञ हे विशेष संयुक्त व्यंजने आहेत).
Question : 9
खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही
❶ क्ष
❷ ज्ञ
❸ कृ
❹ म्ह
📝 स्पष्टीकरण : 'कृ' हे जोडाक्षर नाही. कारण यात 'क' या व्यंजनामध्ये 'ऋ' हा स्वर मिसळला आहे (क + ऋ = कृ).
जोडाक्षरासाठी किमान दोन व्यंजने एकत्र येणे आवश्यक असते. बाकी पर्याय (क्ष, ज्ञ, म्ह) जोडाक्षरे आहेत.
Question : 10
व्यंजनास -------------- असेही म्हणतात
❶ परवर्ण
❷ कंपीत वर्ण
❸ द्रव्य व्यंजन
❹ अंतस्थ
📝 स्पष्टीकरण : व्यंजनांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वर्णावर (स्वरावर) अवलंबून राहावे लागते, म्हणून त्यांना परवर्ण किंवा स्वरान्त असे म्हणतात.
मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत.
Question : 11
조डाक्षर म्हणजे काय
❶ दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर
❷ अक्षर + स्वर
❸ स्वर + व्यंजन
❹ व्यंजन + व्यंजन
📝 स्पष्टीकरण : दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो, तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात.
रचना: व्यंजन + व्यंजन + स्वर = जोडाक्षर.
Question : 12
'क्ष' व 'ज्ञ' या संयुक्त व्यंजनांना वर्णमालेत कोणी स्थान दिले ?
❶ श्रीपात सबनीस
❷ विष्णुशास्त्री चिपळूणकर
❸ मोरो केशल दामले
❹ दादोबा पांडुरंग तर्खडकर
📝 स्पष्टीकरण : 'क्ष' आणि 'ज्ञ' या दोन विशेष संयुक्त व्यंजनांना मराठी वर्णमालेत महत्त्वाचे स्थान देण्याचे काम व्याकरणकार श्रीपात सबनीस यांनी केले आहे.
त्यामुळे आधुनिक वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या 52 झाली आहे.
Question : 13
क्ष व ज्ञ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ?
❶ संयुक्त व्यंजने
❷ कठोर व्यंजने
❸ स्पर्श व्यंजने
❹ मृदू व्यंजने
📝 स्पष्टीकरण : 'क्ष' आणि 'ज्ञ' ही एकापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन बनलेली असल्यामुळे त्यांना विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात.
उदा. क् + ष् = क्ष आणि द् + न् + य् = ज्ञ.
Question : 14
खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती ?
❶ क्ष् आणि ज्ञ्
❷ ष् आणि श्
❸ ओ आणि औ
❹ ऋ आणि ऌ
📝 स्पष्टीकरण : मराठी वर्णमालेमध्ये 'क्ष्' आणि 'ज्ञ्' ही दोन प्रमुख संयुक्त व्यंजने मानली जातात. दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन ही तयार होतात.
Question : 15
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात ?
❶ द्वित्त
❷ घर्षक
❸ अनुनासिक
❹ अल्पप्राण
📝 स्पष्टीकरण : जेव्हा एकच व्यंजन दोन वेळा सलग जोडले जाते, तेव्हा त्या रचनेला द्वित्त असे म्हणतात.
उदा. क् + क् = क्क् (चक्कर), त् + त् = त्त (पत्ता).
Question : 16
' श्र ' हे जोडाक्षर कसे बनले
❶ श् + र् + अ्
❷ श + र + अ
❸ श् + र् + अ
❹ स् + र् + अ्
📝 स्पष्टीकरण : 'श्र' हे जोडाक्षर श् + र् + अ या घटकांपासून बनले आहे.
यात 'श्' आणि 'र्' ही दोन व्यंजने असून शेवटी 'अ' हा स्वर मिसळलेला आहे.
Question : 17
क् , च् , ट् , त् , प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?
❶ स्पर्श व्यंजने
❷ अंतस्थ व्यंजने
❸ मृदू व्यंजने
❹ उष्म व्यंजने
📝 स्पष्टीकरण : क, च, ट, त, प या वर्गातील पहिल्या पंचवीस वर्णांचा उच्चार करताना जिभेचा मुखातील वेगवेगळ्या भागांशी स्पर्श होतो, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात.
वर्णमालेत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत.
Question : 18
आधुनिक वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत ?
❶ 25
❷ 34
❸ 53
❹ 48
📝 स्पष्टीकरण : मराठी व्याकरणानुसार क-वर्ग, च-वर्ग, ट-वर्ग, त-वर्ग आणि प-वर्ग या पाच वर्गांमध्ये विभागलेली एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत.
Question : 19
दोन एक सारखी व्यंजने एकत्र आली की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात ?
❶ द्वित्त
❷ जोडाक्षर
❸ संधी
❹ विग्रह
📝 स्पष्टीकरण : जेव्हा दोन एकसारखी व्यंजने एकमेकांना जोडली जातात, तेव्हा त्या जोडणीला द्वित्त म्हणतात.
उदा. कच्चा या शब्दातील च्च् (च् + च्) हे द्वित्त आहे.
Question : 20
ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात ?
❶ स्वर
❷ व्यंजन
❸ स्वरालाप
❹ मात्रा
📝 स्पष्टीकरण : स्वर उच्चारताना लागणाऱ्या वेळेला किंवा कालावधीला व्याकरणामध्ये मात्रा म्हणतात.
ऱ्हस्व स्वराचा उच्चार आखूड असतो म्हणून त्याला 1 मात्रा असते आणि दीर्घ स्वराचा उच्चार लांबट असतो म्हणून त्याला 2 मात्रा असतात.
Question : 21
गटात न बसणारा वर्ण कोणता ?
❶ क्
❷ ख्
❸ ग्
❹ च्
📝 स्पष्टीकरण : क्, ख्, ग् हे सर्व 'क' वर्गातील असून ते कंठ्य व्यंजने आहेत.
परंतु 'च्' हा वर्ण 'च' वर्गातील असून तो तालव्य व्यंजन आहे, त्यामुळे तो गटात न बसणारा वर्ण आहे.
Question : 22
दंड नसलेले व्यंजन पुढीलपैकी कोणते ?
❶ र्
❷ द्
❸ ळ्
❹ ल
📝 स्पष्टीकरण : मराठी वर्णमालेत 'र्' (र) हे एकमेव असे व्यंजन आहे ज्याला कोणताही उभा दंड नसतो.
त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याचे जोडाक्षर लिहिण्याच्या 4 वेगवेगळ्या पद्धती (राफार, काकपद इ.) आहेत.
Question : 23
दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा ?
❶ ध्
❷ य्
❸ र्
❹ ल्
📝 स्पष्टीकरण : 'ध्' हे 'त' वर्गातील असून ते एक स्पर्श व्यंजन आहे.
बाकीचे पर्याय य्, र्, ल् हे वर्णमालेतील अर्धस्वर (अंतस्थ) या प्रकारात मोडतात.
Question : 24
ज्या व्यंजनांचा उच्चार करणे कठीण असते अशा व्यंजनांना ........ म्हणतात
❶ कठोर व्यंजन
❷ मृदू व्यंजन
❸ संयुक्त व्यंजन
❹ अंतस्थ व्यंजन
📝 स्पष्टीकरण : ज्या वर्णांचा उच्चार खंबीर किंवा तीव्र असतो आणि जो करावयास कठीण वाटतो, त्यांना कठोर व्यंजन किंवा श्वास/अघोष वर्ण म्हणतात.
उदा. क, ख, च, छ इ.
Question : 25
प् आणि फ् ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ?
❶ मृदू व्यंजने
❷ उष्मे व्यंजने
❸ संयुक्त व्यंजने
❹ कठोर व्यंजने
📝 स्पष्टीकरण : 'प' वर्गातील पहिले दोन वर्ण म्हणजेच 'प्' आणि 'फ्' हे उच्चारायला कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हटले जाते.

Your Scorecard

Total Questions 0
Solved Question 0
Correct 0
Wrong 0
Final Score :   0 / 0


मराठी व्याकरण सराव पेपर सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मराठी भाषेचा उगम व व्याकरण प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वर्णमाला प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
प्रश्नसंच - 5
प्रश्नसंच - 6
प्रश्नसंच - 7
संधी आणि संधीचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दांच्या जाती प्रश्नसंच - 1
नाम व नामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा वचनविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा लिंगविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
सामान्यरूप प्रश्नसंच - 1
सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विशेषण आणि विशेषणाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापद व क्रियापदाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापदाचे काळ व अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियाविशेषण अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
उभयान्वयी अव्यय प्रश्नसंच - 1
केवलप्रयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रयोग व प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यांचे प्रकार - वाक्य रूपांतर प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
समास व समासाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
अलंकार व अलंकाराचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
रस व प्रकार प्रश्नसंच - 1
वृत्ते आणि प्रकार प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यपृथक्करण प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - सिद्ध शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - साधित शब्द प्रश्नसंच - 2
शब्दांच्या शक्ती / शब्दशक्ती प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विरामचिन्हे प्रश्नसंच - 1
शुद्धलेखन प्रश्नसंच - 1
शुद्ध - अशुद्ध शब्द प्रश्नसंच - 1
समूहदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
ध्वनिदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसमूहाबद्दल एक शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
म्हणी व त्यांचे अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
वाक्प्रचार व अर्थ प्रश्नसंच - 1
समानार्थी शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
विरुद्धार्थी शब्द प्रश्नसंच - 1
अलंकारिक शब्द प्रश्नसंच - 1
साहित्यिक व त्यांची टोपण नावे प्रश्नसंच - 1
संत व त्यांची मूळ गावे प्रश्नसंच - 1
संत साहित्य प्रश्नसंच - 1
साहित्य व साहित्यकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2


🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

1 Comments

  1. Varnamalecha prashna sanch 2 madhe Q.no 21 gatat n basanara shabda mdhe ka,kha,ga aani cha yatil cha ha oshtya aahe v to gatat dekhil basat nahi tarihi te uttar chukiche dakhavt aahet

    ReplyDelete
Previous Post Next Post