शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण प्रश्न | Shabdyogi Avyay Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 3

Practice Questions

शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
खालील वाक्य काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा
1. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येत नाहीत
2. शब्दयोगी अव्यय क्रियापदे आणि क्रियाविशेषण यांना केव्हा-केव्हा जोडून येतात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
Correct Answer: 1 आणि 2 दोन्ही बरोबर
Question : 2
' वर ' या नामाची शब्दजात बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल - अचूक उदाहरण ओळखा
▪️ दशरथाने कैकयीला दोन वर दिले
▪️ पक्षी झाडावर बसतो
▪️ तू त्या राजपुत्राला वर
▪️ वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता
Correct Answer: दशरथाने कैकयीला दोन वर दिले
Question : 3
खालील वाक्यात योग्य शब्दयोगी अव्ययाचा उपयोग करा
डोळ्यांनी ---------------- पाहून देव दिसत नाही अंत:चक्षूनी पहावा लागतो
▪️ फक्त
▪️ केवळ
▪️ सुद्धा
▪️ पण
Correct Answer: फक्त
Question : 4
नंतर , आधी , पुढे , पुर्वी - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ कालदर्शक
▪️ हेतूवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
Correct Answer: कालदर्शक
Question : 5
मला तुझ्या सारखे पुस्तक हवे आहे - या वाक्यात 'सारखे' हे शब्दयोगी अव्यय कोणत्या संबंधाचा बोध करते ?
▪️ हेतु
▪️ तुलना
▪️ विरोध
▪️ व्यतिरेक
Correct Answer: तुलना
Question : 6
विरुद्ध, उलट, ऐवजी, खेरीज, वीण - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ गतीवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ विरोधवाचक
Correct Answer: विरोधवाचक
Question : 7
क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय म्हणून दोन्ही प्रकारे वापरता येणारा शब्द कोणता ?
▪️ पेक्षा
▪️ मागे
▪️ साठी
▪️ करिता
Correct Answer: मागे
Question : 8
पासून , पर्यंत , मधून , खालून - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ कालदर्शक
▪️ हेतूवाचक
▪️ गतिवाचक
▪️ तुलनावाचक
Correct Answer: गतिवाचक
Question : 9
आई मुलांसह बाजारात गेली - या वाक्यातील 'सह' हे अव्यय कोणत्या प्रकारात मोडते ?
▪️ कालवाचक
▪️ साहचर्यवाचक
▪️ करणवाचक
▪️ विरोधवाचक
Correct Answer: साहचर्यवाचक
Question : 10
भर, पर्यंत, मात्र, सुमार - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ संबंधवाचक
▪️ साहचर्यवाचक
▪️ विरोधवाचक
▪️ परिमाणवाचक
Correct Answer: परिमाणवाचक
Question : 11
पुढीलपैकी कोणते अव्यय शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे,जे क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरले जात नाही ?
▪️ शिवाय
▪️ जवळ
▪️ समोर
▪️ मागे
Correct Answer: शिवाय
Question : 12
आत , बाहेर , अलिकडे , पलिकडे - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ गतीवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ विरोधवाचक
Correct Answer: स्थलवाचक
Question : 13
पाऊस पडल्या मुळे शेतकरी आनंदित झाले - या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणत्या संबंधाचा बोध करते ?
▪️ मर्यादा
▪️ स्थळ
▪️ कारण (करणवाचक)
▪️ विरोध
Correct Answer: कारण (करणवाचक)
Question : 14
तो माझ्या नंतर आला - या वाक्यातील 'नंतर' हे कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे ?
▪️ स्थलवाचक
▪️ कालवाचक
▪️ भागवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
Correct Answer: कालवाचक
Question : 15
मुळे , करवी , द्वारा , कडून , हाती - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ संबंधवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ साहचर्यवाचक
Correct Answer: करणवाचक
Question : 16
तुझ्या हून माझा आवाज चांगला आहे - या वाक्यात 'हून' हे कोणते शब्दयोगी अव्यय आहे ?
▪️ विरोधवाचक
▪️ तुलनावाचक
▪️ हेतुवाचक
▪️ साधनवाचक
Correct Answer: तुलनावाचक
Question : 17
देवांकरिता पूजा केली - येथे 'करिता' या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
▪️ उद्देश
▪️ स्थळ
▪️ काळ
▪️ विरोध
Correct Answer: उद्देश
Question : 18
करिता , निमित्त , स्तव , प्रीत्यर्थ , अर्थी - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ संग्रहवाचक
▪️ हेतूवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
Correct Answer: हेतूवाचक
Question : 19
शब्दयोगी अव्यय हे कोणत्या शब्दाचे कार्य करतात ?
▪️ विशेषण
▪️ क्रियापद
▪️ विभक्ती प्रत्यय
▪️ क्रियाविशेषण
Correct Answer: विभक्ती प्रत्यय
Question : 20
मी शाळेपासून दूर आहे - या वाक्यात 'पासून' हे कोणते शब्दयोगी अव्यय दर्शवते ?
▪️ स्थल/अंतर
▪️ तुलना
▪️ काल
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
टीप : 'पासून' हे स्थल, काळ (आरंभ) आणि अंतर हे सर्व दर्शवू शकते
Question : 21
शिवाय , वीना , वाचून , व्यतिरिक्त , खेरीज , निराळा - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
▪️ योग्यतावाचक
▪️ कैवल्यवाचक
Correct Answer: व्यतिरेकवाचक
Question : 22
मी तुमच्या वाचून एक क्षणही राहणार नाही - या वाक्यातील 'वाचून' हे अव्यय कोणत्या प्रकारचा बोध करते ?
▪️ साहचर्य
▪️ संबंध
▪️ व्यतिरेक
▪️ भाग
Correct Answer: व्यतिरेक
Question : 23
'शब्दयोगी अव्यये' ही कोणत्या गटातील शब्दांना जोडून येत नाहीत ?
▪️ नाम
▪️ सर्वनाम
▪️ क्रियाविशेषण
▪️ क्रियावाचक नाम
Correct Answer: क्रियाविशेषण
Question : 24
पेक्षा , परीस , तर , मध्ये - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ तुलनावाचक
▪️ विनिमयवाचक
▪️ द्विकवाचक
▪️ संबंधवाचक
Correct Answer: तुलनावाचक
Question : 25
तो झाडामागे लपला - या वाक्यात 'मागे' हे अव्यय कोणत्या प्रकारचा बोध करते ?
▪️ कालवाचक
▪️ हेतुवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ रीतिवाचक
Correct Answer: स्थलवाचक
Question : 26
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय 'योग्यता' किंवा 'पात्रता' दर्शवते ?
▪️ शिवाय
▪️ प्रमाणे
▪️ जवळ
▪️ नंतर
Correct Answer: प्रमाणे
टीप : 'प्रमाणे' हे 'सारखे' या अर्थाशिवाय योग्यतेचा/अनुसरण्याचा बोध करते
Question : 27
च , ना , मात्र , फक्त , केवळ - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ कैवल्यवाचक
▪️ विनिमयवाचक
▪️ द्विकवाचक
▪️ विरोधवाचक
Correct Answer: कैवल्यवाचक
Question : 28
चोरांना पोलिसांनी घरातून पकडले - या वाक्यातील 'तून' या अव्ययातून कोणता अर्थ सूचित होतो ?
▪️ हेतु
▪️ मार्ग/साधन
▪️ तुलना
▪️ काल
Correct Answer: मार्ग/साधन
Question : 29
मी फक्त दहा रुपयांकरिता काम केले - या वाक्यातील 'करिता' या शब्दामुळे वाक्यात कोणता भाव निर्माण झाला आहे ?
▪️ कर्तृत्व
▪️ हेतु/कारण
▪️ कर्म
▪️ करण
Correct Answer: हेतु/कारण
Question : 30
सुद्धा , देखील , केवळ , पण , बरीक - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ संग्रहवाचक
▪️ हेतूवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
Correct Answer: संग्रहवाचक

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post