Marathi Mhani ani Tyanche Arth | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | प्रश्नसंच - 1


📋 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : सराव प्रश्नसंच - एकूण २५ प्रश्न

हा प्रश्नसंच काळजीपूर्वक सोडवा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची परीक्षा घ्या. हे केवळ सराव प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे

🗒️ सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखण्यासाठी चार पर्याय दिले आहेत. सर्वात अचूक व योग्य उत्तराची निवड करा.

🎯 तुमचा स्कोअर

तुमचे एकूण गुण : 25 पैकी ________
तुम्ही किती गुण मिळवले, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! तुमचा स्कोअर पाहून, तुमच्या तयारीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील भागांमध्ये आणखी उपयुक्त प्रश्नसंच तयार करता येतील

🔂 हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा


Practice Questions

म्हणी व त्यांचे अर्थ सराव प्रश्नसंच

Question : 1
कोल्हा काकडीला राजी - या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
▪️ कोल्ह्याने काही खाल्ले तरी आनंदी होतो
▪️ कोल्ह्याला काकडी आवडते
▪️ कोल्हा आणि काकडी यांचे नाते जुळते
▪️ क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात
Correct Answer: क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात
Question : 2
निरुद्योगी, निरुपयोगी मनुष्य कोणालाही हवासा वाटत नाही - या अर्थाची योग्य म्हण ओळखा
▪️ खायला काळ, भुईला भार
▪️ एक ना धड भाराभर चिंधी
▪️ इकडचा डोंगर तिकडे करणे
▪️ दिवे लावणे
Correct Answer: खायला काळ, भुईला भार
Question : 3
मुलीचं लग्न ठरलं म्हणून आपले भाऊ, मित्र मदतीला येतील असं वाटलं; पण गरज पडल्यावर कोणीच उपयोगी पडलं नाही – या प्रसंगासाठी योग्य म्हण कोणती ?
▪️ एक ना धड भर चिंध्या
▪️ आयत्या बिळावर नागोबा
▪️ कामापुरता मामा ताकापुरती आजी
▪️ सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा
Correct Answer: सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा
Question : 4
धर्म करता कर्म उभे राहते - या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा
▪️ धर्माचे पालन करताना कर्म करावे लागते
▪️ दानधर्म केला तर पुण्य मिळते
▪️ धर्मपालन केल्यावर कर्मबंधनातून मुक्ती मिळते
▪️ एखाद्याला साह्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते
Correct Answer: एखाद्याला साह्य करायला गेल्यास भलतेच संकट मागे लागते
Question : 5
मनात मांडे, पदरात धोंडे - या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
▪️ ओठात एक, पोटात एक
▪️ केवळ मनोराज्यात मग्न असणे
▪️ काम करून दुःख
▪️ मन थाऱ्यावर नसणे
Correct Answer: काम करून दुःख
Question : 6
काव्य गायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता. म्हणतात ना .........
▪️ पालथ्या घड्यावर पाणी
▪️ गाढवाला गुळाची चव काय
▪️ पिकत तिथे विकत नाही
▪️ दुष्काळात तेरावा महिना
Correct Answer: गाढवाला गुळाची चव काय
Question : 7
पुढे काही म्हणींचे अर्थ दिले आहेत . त्यापैकी चुकीची जोडी ओळखा ?
▪️ आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी – गरजू माणसांना मदत न करता गरज नसलेल्यांना मदत करणे
▪️ उधार तेल खवट – उधार मिळालेल्या वस्तूत काहीतरी निश्चित कमतरता असते
▪️ आधी गुंतू नये व गुंतल्यावर कुंथू नये – कोणत्याही गोष्टीत अडकण्यापूर्वी विचार करावा, अडकल्यावर विचार करू नये
▪️ आधीच मर्केट, त्यात मद्य प्याला – दुसऱ्याच्या श्रमावर स्वतःचा फायदा उकळणे
Correct Answer: आधीच मर्केट, त्यात मद्य प्याला – दुसऱ्याच्या श्रमावर स्वतःचा फायदा उकळणे
Question : 8
'खाई त्याला खवखवे' या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण कोणती
▪️ उंदराला मांजर साक्ष
▪️ कर नाही त्याला डर कशाला ?
▪️ दात कोरून पोट भरत नाही
▪️ बुडत्याचा पाय खोलात
Correct Answer: कर नाही त्याला डर कशाला ?
Question : 9
जळत्या घराचा पोळता वासा - या म्हणीचा अर्थ काय
▪️ अंबरच्या आयुष्याचे पूर्ण नुकसान झाले
▪️ घरात-बाहेर सर्वत्रच त्याला त्रास होत आहे
▪️ अनेक संकटांतूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला
▪️ यापैकी एकही नाही
Correct Answer: अनेक संकटांतूनही त्यातल्या त्यात मार्ग काढण्याचा त्याने प्रयत्न केला
Question : 10
'एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य' या अर्थाची म्हण कोणती
▪️ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
▪️ गुरुची विद्या गुरुला फळली
▪️ खाई त्याला खवखवे
▪️ आपलेच दात आपलेच ओठ
Correct Answer: गुरुची विद्या गुरुला फळली
Question : 11
पुढे काही म्हणींचे अर्थ दिले आहेत . त्यापैकी चुकीची जोडी ओळखा ?
▪️ आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
▪️ पी हळद नि हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे
▪️ वरातीमागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे
▪️ लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे
Correct Answer: आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
Question : 12
समानार्थी म्हण ओळखा : 'जगात बुवा अन् मनात कावा'
▪️ तोंड चोपडा नि मणी वाकडा
▪️ तण खाई धन
▪️ ढोंग धतूरा हाती कटोरा
▪️ नाव देवाचे नि गाव पुजाऱ्याचे
Correct Answer: तोंड चोपडा नि मणी वाकडा
Question : 13
'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीची समानार्थी म्हण कोणती
▪️ कुत्र्याचे शेपूट बाकडे ते वाकडेच
▪️ रात्रभर वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता
▪️ शहाण्याला शब्दांचा मार
▪️ गाढवाला गुळाची चव काय ?
Correct Answer: कुत्र्याचे शेपूट बाकडे ते वाकडेच
Question : 14
'पाचा मुखी परमेश्वर' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता
▪️ पाच लोक बोलतात तेच खरे
▪️ पुष्कळ लोक बोलतात ते खरे
▪️ काही लोक जे बोलतात ते खरे
▪️ पंच लोक जे बोलते ते खरे
Correct Answer: पुष्कळ लोक बोलतात ते खरे
Question : 15
'अति तिथे -------- ' ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा
▪️ पाणी
▪️ हवा
▪️ माती
▪️ प्रकाश
Correct Answer: माती
Question : 16
'नाव सोनूबाई, हाती -----------' ही म्हण पूर्ण करा
▪️ कथलाचा वाळा
▪️ दिवा
▪️ भिकारी
▪️ पणती
Correct Answer: कथलाचा वाळा
Question : 17
'काखेत कळसा अन् गावाला ---------' ही म्हण पूर्ण करा
▪️ प्रवास
▪️ वळसा
▪️ जाणे
▪️ पाहणे
Correct Answer: वळसा
Question : 18
'कामापुरता मामा, ताकापुरती -------------- ' या म्हणीत रिकामा जागा भरा
▪️ आत्या
▪️ मामी
▪️ काकी
▪️ आजी
Correct Answer: आजी
Question : 19
'गरजेल तो ------------- ' या म्हणीनुसार जो नुसती बडबड करतो तो काय करत नाही
▪️ चालेल काय
▪️ बरसेल काय
▪️ पळेल काय
▪️ पडेल काय
Correct Answer: पडेल काय
Question : 20
'पुढच्यास ठेच, मागचा -------------- ' या म्हणीतील रिकामा जागा भरा
▪️ जागे
▪️ शिके
▪️ शहाणा
▪️ पळे
Correct Answer: शहाणा
Question : 21
ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी -------- ' या म्हणीतील योग्य शब्द निवडा
▪️ पाटी
▪️ थाळी
▪️ टाळी
▪️ घंटा
Correct Answer: टाळी
Question : 22
'पाण्यात राहून माशाशी वैर करू नये' या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
▪️ मासे पकडण्यासाठी पाण्यात जाऊ नये
▪️ पाण्याच्या ठिकाणी शांत राहावे
▪️ वैर विसरून मैत्री करावी
▪️ ज्याच्या आश्रयाने राहायचे, त्याच्याशी शत्रुत्व करू नये
Correct Answer: ज्याच्या आश्रयाने राहायचे, त्याच्याशी शत्रुत्व करू नये
Question : 23
'पदरी पडले, पवित्र झाले' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?
▪️ दुसऱ्याच्या हातून पडलेली वस्तू उचलणे
▪️ कोणतीही गोष्ट स्वीकारल्यावर ती चांगली मानावी लागते
▪️ पवित्र नदीत स्नान करणे
▪️ जुन्या वस्तू फेकून देणे
Correct Answer: कोणतीही गोष्ट स्वीकारल्यावर ती चांगली मानावी लागते
Question : 24
'शेरास सव्वाशेर' या म्हणीतून काय सूचित होते ?
▪️ वजन कमी करणे
▪️ एकावर दुसरा भारी असणे
▪️ सर्वजण समान असणे
▪️ थोडे काम करणे
Correct Answer: एकावर दुसरा भारी असणे
Question : 25
वरात जोंधळ्यासाठी, भटजी गव्हासाठी - या म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता
▪️ सर्व लोकांचे एकच मत असणे
▪️ एकच काम अनेक जणांनी करणे
▪️ एका कामात अनेक लोकांचे वेगवेगळे स्वार्थ असणे
▪️ एक व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असणे
Correct Answer: एका कामात अनेक लोकांचे वेगवेगळे स्वार्थ असणे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /


✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post