Marathi Mhani ani Tyanche Arth | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | प्रश्नसंच - 2


📋 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : सराव प्रश्नसंच - एकूण २५ प्रश्न

हा प्रश्नसंच काळजीपूर्वक सोडवा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची परीक्षा घ्या. हे केवळ सराव प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे

🗒️ सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखण्यासाठी चार पर्याय दिले आहेत. सर्वात अचूक व योग्य उत्तराची निवड करा.

🎯 तुमचा स्कोअर

तुमचे एकूण गुण : 25 पैकी ________
तुम्ही किती गुण मिळवले, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! तुमचा स्कोअर पाहून, तुमच्या तयारीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील भागांमध्ये आणखी उपयुक्त प्रश्नसंच तयार करता येतील

🔂 हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा


Practice Questions

म्हणी व त्यांचे अर्थ सराव प्रश्नसंच

Question : 1
विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर - या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा
▪️ विधवाला घर नसल्याने त्याचं पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरावे लागते.
▪️ गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे.
▪️ आजार व संकट एकदम येणे.
▪️ दुसऱ्याच्या जीवावर बसून खाणे.
Correct Answer: गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे.
Question : 2
राजाला दिवाळी काय माहीत ? या म्हणीचा योग्य अर्थ द्या
▪️ राजाची दिवाळी रोजचीच असते
▪️ श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही
▪️ रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही
▪️ सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात
Correct Answer: रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही.
Question : 3
अडाण्याची मोळी ................. ही म्हण पूर्ण करा
▪️ भलत्यासच जाळी
▪️ भलत्यासच मारी
▪️ भलत्यासच टाळी
▪️ भलत्यासच गिळी
Correct Answer: भलत्यासच गिळी
Question : 4
पदरी पडले झोंड, .................. ही म्हण पूर्ण करा
▪️ हासून केले गोड
▪️ रडून केले खोंड
▪️ हसत झेलली धोंड
▪️ मारून केले गोड
Correct Answer: हासून केले गोड
Question : 5
जुने ते सोने' या म्हणीचा योग्य अर्थ द्या
▪️ जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात.
▪️ जुने सोने चांगले असते.
▪️ जुन्या वस्तू पिवळ्या पडून सोन्यासारख्या दिसतात.
▪️ सोने हे जुनेच असते.
Correct Answer: जुन्या वस्तूच चांगल्या व उपयुक्त असतात.
Question : 6
गाढवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य - या म्हणीचा योग्य अर्थ द्या
▪️ निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
▪️ मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते.
▪️ गाढवाला दान दिले तर पुण्य पदरात पडत नाही.
▪️ चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही.
Correct Answer: निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात.
Question : 7
गाव जळाला, मारूती गावानिराळा - या म्हणीचा अर्थ द्या
▪️ दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळा राहणे.
▪️ गावावर संकट आले, तरी देव धावला नाही.
▪️ दुसऱ्यांवर कुरघोडी करणारेच सुखी असतात.
▪️ दृष्ट कृत्य करणारे सहीसलामत सुटतात.
Correct Answer: दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळा राहणे.
Question : 8
भीक नको; पण कुत्रा आवर - या म्हणीचा अर्थ काय ----
▪️ चांगले करायला गेले असता वाईट घडणे.
▪️ भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर येणे.
▪️ उपकार नकोत, पण छळ आवर.
▪️ मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे.
Correct Answer: उपकार नकोत, पण छळ आवर.
Question : 9
दाम करी काम - म्हणजे -------
▪️ पैशांच्या साहाय्याने काम होणे.
▪️ सर्व सेवा पैशाने प्राप्त होतात.
▪️ पैशाचे आमिष दाखविल्याशिवाय काम न होणे.
▪️ दाम अधिक तर काम अधिक.
Correct Answer: पैशांच्या साहाय्याने काम होणे.
Question : 10
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - या म्हणीचा योग्य अर्थ द्या
▪️ एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात.
▪️ बोरी व बाभळी एकाच गावात असणे.
▪️ मूर्ख आणि शहाणा यांची गाठ पडणे.
▪️ जसे करावे तसे भरावे लागते.
Correct Answer: एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात.
Question : 11
थेंबे थेंबे तळे साचे - या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
▪️ तळे हे थेंब थेंब पाणी साठूनच तयार होते.
▪️ तळ्यात थेंब साठतात.
▪️ पावसाचे थेंब थेंब पाणी पडून तळे बनते.
▪️ कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो.
Correct Answer: कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठविल्याने तिचा मोठा संचय होतो.
Question : 12
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र - या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
▪️ हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे.
▪️ परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
▪️ स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे.
▪️ स्वार्थी वृत्तीने वागणे.
Correct Answer: परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे.
Question : 13
जसे करावे तसे भरावे - म्हणजे काय ?
▪️ आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
▪️ पापाला प्रायश्चित्त मिळणे.
▪️ जेवढे नुकसान तेवढी भरपाई.
▪️ वाईटाचे फळ वाईट मिळणे.
Correct Answer: आपल्या कृतीप्रमाणे आपणास फळ मिळणे.
Question : 14
नावडतीचे मीठ आळणी - या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ नावडतीचे मीठ आळणी असते.
▪️ नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.
▪️ नावडत्याने केलेले कार्य आळणी मिठासारखे असते.
▪️ वरीलपैकी एकही नाही.
Correct Answer: नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.
Question : 15
'पळसाला पाने तीनच' या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ पळसाची झाडे सर्व सारखीच दिसतात.
▪️ पळसाच्या देठाला तीनच पाने असतात.
▪️ पळसाच्या देठाला तीन पाने असली तरी झाड शोभून दिसते.
▪️ कोठेही गेले तरी तेथील परिस्थिती सामान्यतः सारखीच असते.
Correct Answer: कोठेही गेले तरी तेथील परिस्थिती सामान्यतः सारखीच असते.
Question : 16
'डोळ्यात केर आणि कानात फुंकर' या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ फुंकल्याने डोळ्यात केर जातो.
▪️ रोगावर अनेक उपाय.
▪️ रोग एक आणि उपाय निराळाच.
▪️ उपायाशिवाय रोग बरा होत नाही.
Correct Answer: रोग एक आणि उपाय निराळाच.
Question : 17
'उथळ पाण्याला खळखळाट फार' म्हणजे काय ?
▪️ उथळ पाणी खळखळ वाहते.
▪️ अल्पज्ञान; पण ताठा फार.
▪️ उथळ पाणी चांगले असते.
▪️ उतरणीवरून वाहणारे पाणी फार आवाज करते.
Correct Answer: अल्पज्ञान; पण ताठा फार.
Question : 18
काखेत कळसा गावाला वळसा - या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ काखेत कळशी घेऊन गावाला फेरी मारणे.
▪️ एखाद्या लहानशा कामासाठी गावभर फिरणे.
▪️ वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे.
▪️ नजीकच्या कामासाठी दूरचा मार्ग स्वीकारणे.
Correct Answer: वस्तू जवळच असूनही ती शोधीत फिरणे.
Question : 19
'दृष्टीआड सृष्टी' या म्हणीचा अर्थ कोणता ?
▪️ आपल्यामागे काय चालते, ते दिसू शकत नाही.
▪️ दृष्टीशिवाय सृष्टी दिसत नाही.
▪️ दुर्लक्ष करणे.
▪️ दृष्टीत दोष असणे.
Correct Answer: आपल्यामागे काय चालते, ते दिसू शकत नाही.
Question : 20
तोंड दाबून बुक्क्यांचा मार - या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ विनाकारण छळ सहन करणे.
▪️ अगतिक स्थिती होणे.
▪️ विनातक्रार छळ सहन करणे.
▪️ न बोलता मार सहन करणे.
Correct Answer: विनातक्रार छळ सहन करणे.
Question : 21
'तरण्याचे झाले कोळसे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे' या म्हणीचा अर्थ काय ?
▪️ तरुण म्हातारे दिसतात आणि म्हातारे तरुण दिसतात.
▪️ अस्वाभाविक; पण उलटा प्रकार आढळून येणे.
▪️ वृद्ध माणसे तजेलदार दिसतात.
▪️ तरुणपण आणि वृद्धत्व एकत्र दिसणे.
Correct Answer: अस्वाभाविक; पण उलटा प्रकार आढळून येणे.
Question : 22
कानामागून आली अन् तिखट झाली - या म्हणीचा अर्थ ओळखा
▪️ मागून येऊन वरचढ होणे
▪️ कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे
▪️ डोईजड होणे
▪️ मागून येऊन मोठेपणा मिळणे
Correct Answer: मागून येऊन वरचढ होणे
Question : 23
'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या म्हणीचा अर्थ ओळखा
▪️ दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
▪️ स्वतःचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
▪️ आईला बाईचा आधार असणे
▪️ आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते
Correct Answer: दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे
Question : 24
ये रे कुत्र्या, खा माझा पाय - या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा
▪️ भूतदया दाखविणे
▪️ आपणहून संकट ओढवून घेणे
▪️ एखाद्याला 'कुत्रा' म्हणून त्याचा अपमान करणे
▪️ त्याग करण्याची तयारी ठेवणे
Correct Answer: आपणहून संकट ओढवून घेणे
Question : 25
रात्र थोडी सोंगे फार - या म्हणीचा अर्थ ओळखा
▪️ सोंगे करायला रात्र पुरत नाही
▪️ रात्रीचा वेळ कामात चटकन जातो
▪️ कामे भरपूर; पण वेळ थोडा
▪️ रात्री कामे भरभर होत नाहीत
Correct Answer: कामे भरपूर; पण वेळ थोडा

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /


✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post