विशेषण व विशेषणाचे प्रकार मराठी व्याकरण प्रश्न | Visheshan Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 2

Practice Questions

विशेषण मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?
▪️ सर्वनाम
▪️ विशेषण
▪️ क्रियाविशेषण
▪️ क्रियापद
Correct Answer: विशेषण
जो शब्द नामाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतो, त्याला विशेषण (Adjective) म्हणतात. उदा. 'चांगला' मुलगा. 'मुलगा' या नामाची व्याप्ती 'चांगला' या शब्दाने मर्यादित केली आहे
Question : 2
योग्य पर्याय निवडा
1. विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करते
2. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते
3. विशेषण अविकारी असते
4. विशेषण नामप्रमाणे वापरता येत नाही
▪️ 1 आणि 2 बरोबर
▪️ 1 , 3 आणि 4 बरोबर
▪️ 2 आणि 4 बरोबर
▪️ वरील सर्व बरोबर
Correct Answer: 1 आणि 2 बरोबर
Question : 3
1. नामे , सर्वनामे , धातूसाधिते यांचा विशेषणाप्रमाणे वापर होतो
2. विशेषणे नामापूर्वी तसेच नामानंतर सुद्धा वापरता येतात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
Correct Answer: 1 आणि 2 दोन्ही बरोबर
1) नामसाधित (उदा. पुणेरी), सर्वनामिक (उदा. तो), आणि धातुसाधित (उदा. पिकलेला) विशेषणे वापरली जातात. 2) नामापूर्वी येणारे - अधि-विशेषण (उदा. 'मोठा' मुलगा) आणि नामानंतर येणारे - विधी-विशेषण (उदा. मुलगा 'मोठा' आहे)
Question : 4
एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास अशा सर्वनामास काय म्हणतात
▪️ नामसाधित विशेषण
▪️ आधि विशेषण
▪️ सर्वनामिक विशेषण
▪️ विधि विशेषण
Correct Answer: सर्वनामिक विशेषण
Question : 5
एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो तेव्हा त्यास ------------ विशेषण म्हणतात
▪️ नामसाधित विशेषण
▪️ धातुसाधित विशेषण
▪️ सर्वनामिक विशेषण
▪️ अव्ययसाधित विशेषण
Correct Answer: नामसाधित विशेषण
Question : 6
योग्य विधान निवडा
▪️ विशेषण हे विशेष्याच्या लिंग , वचनाप्रमाणे बदलते
▪️ विशेषण हे अविकारी आहे
▪️ विशेषण हे अव्यय आहे
▪️ क्रियाविशेषण हे नामाला लागते
Correct Answer: विशेषण हे विशेष्याच्या लिंग , वचनाप्रमाणे बदलते
विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते हे विधान योग्य आहे, कारण - विशेष्य म्हणजे असे नाम (noun) किंवा सर्वनाम (pronoun) ज्याबद्दल विशेषण अधिक माहिती देते.
दुसऱ्या शब्दांत, ज्या शब्दाचे वर्णन विशेषण करते त्याला विशेष्य म्हणतात.
उदाहरणार्थ : सुंदर मुलगा ( येथे : सुंदर - विशेषण आहे तर ; मुलगा - विशेष्य आहे).
विशेषण हे नामाबद्दल (विशेष्याबद्दल) अधिक माहिती देणारे शब्द आहेत.
मराठी व्याकरणाचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की, काही विशेषणे ही त्यांच्या विशेष्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलतात.
1. लिंगानुसार बदल : पुल्लिंग : चांगला मुलगा (चांगला - पुल्लिंगी विशेषण) स्त्रीलिंग : चांगली मुलगी (चांगली - स्त्रीलिंगी विशेषण) नपुंसकलिंग : चांगले घर (चांगले - नपुंसकलिंगी विशेषण)
2. वचनानुसार बदल : एकवचन : पिवळा झेंडा (पिवळा - एकवचनी विशेषण) अनेकवचन : पिवळे झेंडे (पिवळे - अनेकवचनी विशेषण) म्हणजे येथे नामाचे/विशेष्याचे लिंग किंवा वचन बदलले की विशेषणाचे रूप बदलते.
टीप : काही विशेषणे अशी आहेत जी लिंग आणि वचनानुसार बदलत नाहीत. त्यांना अविकारी विशेषणे म्हणतात.
उदाहरणार्थ : कठोर - कठोर माणूस, कठोर बाई, कठोर बोलणे सुंदर - सुंदर फूल, सुंदर फुले, सुंदर मुलगी.
या उदाहरणांवरून स्पष्ट होते की, नामाचे किंवा विशेष्याचे लिंग किंवा वचन बदलले तरी विशेषण बदलत नाही.
म्हणजेच काही विशेषणे विकारी असतात तर काही अविकारी असतात.
विशेषण हे अविकारी आहे. हे विधान अयोग्य आहे, कारण - काही विशेषणे अविकारी असली तरी, सर्वच विशेषणे अविकारी नाहीत. जी विशेषणे लिंग, वचनानुसार बदलतात त्यांना विकारी विशेषणे म्हणतात. विशेषण हे अव्यय आहे. हे विधान अयोग्य आहे, कारण - अव्यय म्हणजे ज्या शब्दांमध्ये लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार कोणताही बदल होत नाही. विशेषण हे अव्यय नसते, कारण ते विशेष्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलते.
क्रियाविशेषण हे नामाला लागते. हे विधान अयोग्य आहे. कारण - क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देते. ते नामाला लागत नाही
Question : 7
विशेषण या शब्दजातीमध्ये -----------
1‌. विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात
2. विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होतो
3. विशेषणांना लिंगवचनाचे विकार होतात
4. सर्व विशेषणे विकारी असतात
वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहे
▪️ फक्त 2
▪️ फक्त 1 आणि 3
▪️ फक्त 3
▪️ वरीलपैकी एकही नाही
Correct Answer: फक्त 1 आणि 3
Question : 8
पुढील विधाने वाचा
1. विशेषण ही विकारी शब्दजाती आहे तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंग वचनानुसार बदलत नाही
2. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला अधि विशेषण म्हणतात
3. वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते
▪️ 1 आणि 2 बरोबर
▪️ 1 आणि 3 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ वरील सर्व बरोबर
Correct Answer: 1 आणि 3 बरोबर
1. विशेषण ही विकारी शब्दजाती आहे, तथापि काही विशेषणे विशेषाच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. हे विधान योग्य आहे .
कारण - विशेषणे त्यांच्या नामाप्रमाणे (विशेष्याप्रमाणे) लिंग आणि वचनानुसार बदलतात, म्हणून त्यांना 'विकारी' म्हणतात.
उदा. चांगला मुलगा, चांगली मुलगी, चांगले घर.
परंतु, काही विशेषणे अशी आहेत जी कधीच बदलत नाहीत. त्यांना 'अविकारी विशेषणे' म्हणतात.
उदा. सुंदर फूल, सुंदर फुले. इथे 'सुंदर' विशेषण बदलत नाही. त्यामुळे हे विधान बरोबर आहे.
2. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला विधी विशेषण, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला अधि विशेषण म्हणतात.
हे विधान अयोग्य आहे. कारण - या व्याख्येच्या उलट विधान योग्य आहे. नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधि-विशेषण म्हणतात.
उदा. मोठा मुलगा. ('मोठा' हे विशेषण 'मुलगा' या नामापूर्वी आले आहे.)
नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधी-विशेषण म्हणतात.
उदा. तो मुलगा मोठा आहे. ('मोठा' हे विशेषण 'मुलगा' या नामानंतर आले आहे).
3. वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते. हे विधान योग्य आहे.
कारण - विशेषणाचे मुख्य कार्य नामाबद्दल (विशेष्याबद्दल) अधिक माहिती देणे आहे.
जर वाक्यात नामच नसेल, तर विशेषण कोणाबद्दल माहिती देणार ? म्हणून, जेथे नाम असते तेथेच विशेषण असू शकते
Question : 9
खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा
1. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्यास विशेषण म्हणतात
2. ज्या शब्दापासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापदे असे म्हणतात
3. सर्वनाम ही नामाप्रमाणे लिंग , वचन व विभक्ती विकार धारण करणारी शब्द जात नाही तर ती स्वतंत्र आहे
▪️ 1 आणि 2
▪️ 2 आणि 3
▪️ फक्त 2
▪️ वरील सर्व
Correct Answer: 1 आणि 2
Question : 10
विशेष्य म्हणजे -
▪️ विशेषण म्हणजे विशेष्य
▪️ विशेषण ज्या नामाची विशेष्य माहिती सांगते ते विशेष्य
▪️ नामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेष्य
▪️ यापैकी नाही
Correct Answer: विशेषण ज्या नामाची विशेष्य माहिती सांगते ते विशेष्य
Question : 11
योग्य विधान / विधाने असलेला पर्याय निवडा
1. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही असला तरी तो विशेषणच असतो
2. विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय वापरले जात नाहीत परंतु नाम म्हणून उपयोग केल्यास विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात
3. वाक्यात विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नाही म्हणून नामाचे जे लिंग व वचन असते तेच विशेषणाचे असते
▪️ 1 आणि 2
▪️ 2 आणि 3
▪️ फक्त 2
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
1. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात कोठेही असला तरी तो विशेषणच असतो .
हे विधान योग्य आहे . कारण - विशेषण हे नेहमी नामाबद्दल (विशेष्याबद्दल) अधिक माहिती देते. वाक्यात त्याचे स्थान बदलले तरी ते विशेषणच राहते. उदा. 'तो मुलगा मोठा आहे' या वाक्यात 'मोठा' हे विशेषण आहे, जे नामानंतर आले आहे.
परंतु, 'तो मोठा मुलगा आहे' या वाक्यात ते नामापूर्वी आले आहे. दोन्ही ठिकाणी तो विशेषणच आहे, मात्र त्याचे स्थान वेगवेगळे आहे. त्यामुळे 'कोठेही असला तरी ते विशेषणच असते.
2. विशेषणाला विभक्तीचे प्रत्यय वापरले जात नाहीत, परंतु नाम म्हणून उपयोग केल्यास विभक्तीचे प्रत्यय वापरले जातात .
हे विधान योग्य आहे. कारण - सामान्यतः विशेषणांना विभक्ती प्रत्यय लागत नाहीत.
उदा. 'मोठ्या मुलास' इथे 'मोठा' हे विशेषण आहे. इथे विशेषणाला प्रत्यय लागत नाही. परंतु, काही वेळा विशेषणाचा उपयोग नाम म्हणून केला जातो.
उदा. 'श्रीमंतानी गरिबांची काळजी घ्यावी.' येथे 'श्रीमंत' आणि 'गरिब' हे विशेषण असले तरी, त्यांचा उपयोग नाम म्हणून केला आहे आणि त्यांना विभक्ती प्रत्यय लागला आहे.
3. वाक्यात विशेषणाला स्वतंत्र असे स्थान नाही, म्हणून नामाचे जे लिंग व वचन असते तेच विशेषणाचे असते. हे विधान योग्य आहे .
कारण - विशेषण हे नेहमी नामाच्या (विशेष्याच्या) साथीने येते. त्याला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यामुळे, ज्या नामाबद्दल ते माहिती देते, त्याच नामाचे लिंग आणि वचन विशेषणाला लागू होते.
उदा. चांगला मुलगा येथे दोन्ही पुल्लिंगी आहेत. चांगली मुलगी येथे दोन्ही स्त्रीलिंगी आहेत
Question : 12
पिकलेला आंबा, रांगणारे मूल, वाहती नदी या शब्दातील पिकलेला, रांगणारे, वाहती हे शब्द त्यांच्यापुढे क्रमाने येणाऱ्या कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत
▪️ नामसाधित
▪️ धातुसाधित
▪️ सार्वजनिक
▪️ अव्ययसाधित
Correct Answer: धातुसाधित
Question : 13
'समीरने थंडगार पाणी पिले.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
▪️ समीर
▪️ थंडगार
▪️ पाणी
▪️ पिले
Correct Answer: थंडगार
Question : 14
'नागपुरी' हा विशेषणाचा पुढीलपैकी कोणता उपप्रकार आहे
▪️ नामसाधित
▪️ अव्ययसाधित
▪️ सार्वनामिक
▪️ धातुसाधित
Correct Answer: नामसाधित
Question : 15
'निलू नावाचा काळा कुत्रा होता.' या वाक्यातील विशेषण ओळखा.
▪️ निलू
▪️ नाव
▪️ काळा
▪️ कुत्रा
Correct Answer: काळा
Question : 16
'माझा घोडा फारच सुंदर आहे' या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा.
▪️ घोडा
▪️ माझा
▪️ सुंदर
▪️ फारच
Correct Answer: माझा
Question : 17
त्याला पुणेरी फेटा शोभून दिसतो. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा
▪️ नामसाधित विशेषण
▪️ अव्ययसाधित विशेषण
▪️ आवृत्तीवाचक
▪️ क्रमवाचक
Correct Answer: नामसाधित विशेषण
Question : 18
मांढरदेवीच्या यात्रेला पुष्कळ लोक आले होते. अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा
▪️ आवृत्ती वाचक
▪️ क्रमवाचक
▪️ गणनावाचक
▪️ अनिश्चित
Correct Answer: अनिश्चित
Question : 19
'शिपाई शूर होता' या वाक्यातील 'शूर' काय आहे
▪️ नाम
▪️ विशेषण
▪️ क्रियापद
▪️ सर्वनाम
Correct Answer: विशेषण
Question : 20
'तो घोडा शर्यतीत पहिला आला' या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा
▪️ घोडा
▪️ तो
▪️ पहिला
▪️ आला
Correct Answer: तो
Question : 21
पुढीलपैकी कोणता शब्द क्रमवाचक संख्या विशेषण आहे
▪️ चौपट
▪️ पहिला
▪️ एकेक
▪️ थोडी
Correct Answer: पहिला
Question : 22
पुढील चार शब्दांपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा
▪️ पांढरा
▪️ आंधळा
▪️ गंगायमुना
▪️ लबाड
Correct Answer: गंगायमुना
Question : 23
'आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत.' या वाक्यातील विशेषण ओळखा
▪️ शूर
▪️ शिपाई
▪️ देश
▪️ आम्ही
Correct Answer: शूर
Question : 24
पुढील अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा – म्हाताऱ्या माणसांचा आदर करावा
▪️ गुणविशेषण
▪️ सार्वजनिक विशेषण
▪️ संख्या विशेषण
▪️ यापैकी एकही नाही
Correct Answer: गुणविशेषण
Question : 25
'माझे घर कोकणात आहे.' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा
▪️ धातुसाधित विशेषण
▪️ संख्या विशेषण
▪️ सार्वनामिक विशेषण
▪️ विशेषण
Correct Answer: सार्वनामिक विशेषण
Question : 26
'तो चांगला माणूस आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा
▪️ तो
▪️ चांगला
▪️ माणूस
▪️ आहे
Correct Answer: चांगला
Question : 27
उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन. या वाक्यातील विशेषण ओळखा
▪️ उभा
▪️ जन्म
▪️ सेवा
▪️ लोक
Correct Answer: उभा
Question : 28
नामानंतर येणारे विशेषण म्हणजे
▪️ पूर्वविशेषण
▪️ सर्वनामिक विशेषण
▪️ विधिविशेषण
▪️ अधिविशेषण
Correct Answer: विधिविशेषण
Question : 29
'खेडे' या नामापासून बनलेले विशेषण कोणते
▪️ खेडूत
▪️ खेडवळ
▪️ खेडी
▪️ खेडेकरी
Correct Answer: खेडवळ
Question : 30
खालीलपैकी आवृत्तीधारक संख्याविशेषण कोणत्या पर्यायामध्ये आहे
▪️ पहिला वर्ग
▪️ एकेक मुलगा
▪️ सर्व रस्ते
▪️ चौपट मुली
Correct Answer: चौपट मुली

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post