Maha TET Online Test in Marathi | TET Exam Mock Test | महा टीईटी मॉक टेस्ट सिरीज
🎯 या ब्लॉग पोस्ट मध्ये आम्ही तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण Maha TET Online Practice Test in Marathi खाली दिलेल्या आहेत . मॉक टेस्ट व सराव प्रश्नसंच सोडवण्यासाठी - खालील लिंकवर क्लिक करा
🎓 Maharashtra Teacher Eligibility Test : ही राज्यातील शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची पात्रता परीक्षा आहे . या परीक्षेत यश मिळवून उमेदवारांना शाळांमध्ये शिक्षक पदासाठी पात्रता प्राप्त होते . त्यामुळे लाखो उमेदवार दरवर्षी Maha TET परीक्षेत सहभागी होतात
🌐 MPSC Battle द्वारे आम्ही विद्यार्थ्यांसाठी मोफत Maha TET Mock Test in Marathi उपलब्ध करून दिले आहेत . यामुळे तुम्ही घरबसल्या Maha TET परीक्षा सराव करू शकता
📋 प्रत्येक टेस्टमध्ये बालविकास आणि शैक्षणिक मनोविज्ञान, भाषा कौशल्य, गणित/विज्ञान, सामाजिक शास्त्र, शिक्षण तंत्र आणि तर्कशक्ती या घटकांवर आधारित निवडक व दर्जेदार 30 प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत
महा टीईटी परीक्षेचे स्वरूप
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी एक महत्त्वाची पात्रता परीक्षा आहे. या परीक्षेचा उद्देश पात्र आणि योग्य उमेदवारांची निवड करणे आहे. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतली जाते आणि यामध्ये दोन स्वतंत्र पेपर असतात : पेपर 1 आणि पेपर 2
पेपर 1 : इयत्ता पहिली ते पाचवीसाठी ( प्राथमिक स्तर )
हा पेपर अशा उमेदवारांसाठी आहे, ज्यांना इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना शिकवायचे आहे
- एकूण प्रश्न : 150 प्रश्न
- प्रत्येक प्रश्नाला 1 गुण
- एकूण वेळ : 2 तास 30 मिनिटे
- विषय (प्रत्येक विषयावर 30 प्रश्न) :
- बाल विकास आणि अध्यापनशास्त्र
- मराठी (भाषा 1)
- इंग्रजी (भाषा 2)
- गणित
- पर्यावरण अभ्यास
पेपर 2 : इयत्ता सहावी ते आठवीसाठी ( उच्च प्राथमिक स्तर )
हा पेपर अशा उमेदवारांसाठी आहे, ज्यांना इयत्ता सहावी ते आठवीच्या मुलांना शिकवायचे आहे
- एकूण गुण : 150 गुण
- एकूण वेळ : 2 तास 30 मिनिटे
- अनिवार्य विषय (प्रत्येकावर 30 प्रश्न)
- बाल विकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
- मराठी - 30 प्रश्न
- इंग्रजी - 30 प्रश्न
- उर्वरित 60 प्रश्न : उमेदवाराच्या शिक्षण शाखेनुसार निवडले जातात. उमेदवाराला पुढील दोन विकल्पांपैकी एक निवडावा लागतो
- गणित आणि विज्ञान - 60 प्रश्न (विकल्प 1)
- सामाजिक अभ्यास - 60 प्रश्न (विकल्प 2)
महा टीईटी परीक्षेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- दोन्ही पेपरमध्ये मल्टिपल चॉइस प्रश्न (MCQs)
- चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही नकारात्मक गुणांकन नाही
- प्रश्नपत्रिका मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असते
- पात्रता गुणक्रम (Pass Marks) :
- खुला प्रवर्ग (General) - 60% म्हणजे 150 पैकी 90 गुण
- आरक्षित प्रवर्ग (Reserved) - 55% म्हणजे 150 पैकी 82 गुण
⚠️ उमेदवारांसाठी सूचना : उमेदवारांनी परीक्षा आणि पात्रतेबाबतच्या अद्ययावत अधिकृत सूचना व अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तपासाव्यात
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या मोफत सिरीजचा फायदा घेता येईल.
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी नियमितपणे सराव प्रश्नसंच अपडेट करत असतो . दररोज नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा