शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabdasamuh Marathi Grammar | प्रश्नसंच - 2

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
फार दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना -
▪️ उंबराचे फूल
▪️ डोळ्याचे पारणे फिटणे
▪️ कपिलाषष्ठीचा योग
▪️ गंगेत घोडे न्हाणे
Correct Answer: कपिलाषष्ठीचा योग
Question : 2
एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे कोणते
▪️ बांधव
▪️ मातृभूमी
▪️ जुळे
▪️ सहोदर
Correct Answer: सहोदर
Question : 3
केंद्रीय कायदेमंडळातील सभाध्यक्षांचे पदनाम कोणते
▪️ कुलध्यक्ष
▪️ राष्ट्राध्यक्ष
▪️ पंतप्रधान
▪️ लोकसभाध्यक्ष
Correct Answer: लोकसभाध्यक्ष
Question : 4
'वाटाघाटी' म्हणजे काय
▪️ मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
▪️ सामोपचार
▪️ वाटणे व घाटणे
▪️ समान भाग करणे
Correct Answer: मतभेद मिटविण्यासाठी केलेली बोलणी
Question : 5
'लढण्याची इच्छा असणारा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
▪️ सैनिक
▪️ युद्धकंदन
▪️ युतुत्सु
▪️ युद्धनिपुण
Correct Answer: युतुत्सु
Question : 6
ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा -
▪️ हुशार
▪️ विद्वान
▪️ बहुश्रुत
▪️ ज्ञानी
Correct Answer: बहुश्रुत
Question : 7
'जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा' कोण
▪️ निरक्षर
▪️ अशिक्षित
▪️ सनातनी
▪️ आज्ञाधारक
Correct Answer: सनातनी
Question : 8
शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा - विड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार
▪️ अडकित्ता
▪️ कोयता
▪️ कुऱ्हाड
▪️ नारकत
Correct Answer: नारकत
Question : 9
'कबुतराप्रमाणे अन्नसंचय करून अल्पकाळात त्याचा उपयोग करण्याची वृत्ती' या आशयासाठी योग्य शब्द कोणता
▪️ स्वार्थी वृत्ती
▪️ कंजूष वृत्ती
▪️ लबाड वृत्ती
▪️ कपोत वृत्ती
Correct Answer: कपोत वृत्ती
Question : 10
'रोग्याची शुश्रूषा करणारी' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
▪️ निवेदिता
▪️ दाई
▪️ उपचारिका
▪️ परिचारिका
Correct Answer: परिचारिका
Question : 11
७५ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवासाठी कोणता शब्द वापरतात
▪️ रौप्य महोत्सव
▪️ सुवर्ण महोत्सव
▪️ हीरक महोत्सव
▪️ अमृत महोत्सव
Correct Answer: अमृत महोत्सव
Question : 12
'दगडावर केलेले कोरीव काम' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
▪️ शिलालेख
▪️ शिल्प
▪️ शिलान्यास
▪️ शिलास्तंभ
Correct Answer: शिल्प
Question : 13
नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत यासाठी पर्यायी शब्द कोणता
▪️ अभंग
▪️ नांदी
▪️ स्वगत
▪️ भरतवाक्य
Correct Answer: नांदी
Question : 14
'पतिनिधनानंतर स्त्रीने केलेले आत्मदहन' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
▪️ सहयात्रा
▪️ सहवास
▪️ सहचर
▪️ सहगमन
Correct Answer: सहगमन
Question : 15
'ज्याला सीमा नाही असा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता
▪️ अमर्याद
▪️ अपार
▪️ असीम
▪️ अनंत
Correct Answer: असीम
Question : 16
दुआब म्हणजे -
▪️ दोन घटकांमधील आदान प्रदान
▪️ दोन नद्यांमधील जागा
▪️ दोन व्यक्तींमधील हेवेदावे
▪️ यापैकी नाही
Correct Answer: दोन नद्यांमधील जागा
Question : 17
मृत्यूवर विजय मिळवणारा -
▪️ अजातशत्रू
▪️ मृत्युंजय
▪️ अमर
▪️ अजिंक्य
Correct Answer: मृत्युंजय
Question : 18
आधी जन्मलेला - या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात
▪️ अनुज
▪️ अज्ञात
▪️ आजन्म
▪️ अग्रज
Correct Answer: अग्रज
Question : 19
सरदार व जमिनदार यांचे वर्चस्व असणारे राज्य शासन -
▪️ राजेशाही
▪️ सामंतशाही
▪️ सावकारशाही
▪️ लोकशाही
Correct Answer: सामंतशाही
Question : 20
ज्यास कधी मास्तरपण येत नाही असा -
▪️ अजर
▪️ अजातशत्रू
▪️ आजन्मी
▪️ अनुज
Correct Answer: अजर
Question : 21
उपळी म्हणजे काय -
▪️ डोंगरातून कोसळणारा धबधबा
▪️ समुद्राला आलेली भरती
▪️ जमिनीतून पाझरून निघणारा झरा
▪️ डोंगरातून उगम पावणारी नदी
Correct Answer: जमिनीतून पाझरून निघणारा झरा
Question : 22
त्याने घरातील भांडणे चव्हाट्यावर आणली . यातील चव्हाटा शब्दाचा योग्य अर्थ काय
▪️ ग्रामपंचायती समोरची जागा
▪️ चार रस्ते एकत्र येतात ती जागा
▪️ गावातील पाणी भरण्याचे ठिकाण
▪️ चकाट्यासाठी असलेली जागा
Correct Answer: चार रस्ते एकत्र येतात ती जागा
Question : 23
दररोज प्रसिद्ध होणारे
▪️ मासिक
▪️ त्रैमासिक
▪️ दैनिक
▪️ वार्षिक
Correct Answer: दैनिक
Question : 24
अबदारखाना म्हणजे काय ----------
▪️ स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा
▪️ धान्य साठविण्याची जागा
▪️ दारूगोळा ठेवण्याची जागा
▪️ लाकूड फाटा ठेवण्याची जागा
Correct Answer: स्वच्छ गार पाणी ठेवण्याची जागा
Question : 25
दुसऱ्यावर उपकार करणारा
▪️ कृतघ्न
▪️ परोपकारी
▪️ स्वार्थी
▪️ उपकारी
Correct Answer: परोपकारी

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post