तलाठी भरती मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट सिरीज | Talathi Bharti Marathi Grammar Online Test
BY :MPSC Battle•
0
तलाठी भरती मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट सिरीज | Talathi Bharti Marathi Grammar Online Test
जर तुम्ही तलाठी भरती परीक्षेची तयारी करत असाल, तर मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . तलाठी भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये मराठी विषयाला विशेष महत्त्व दिले जाते . योग्य तयारी, नियमित सराव आणि प्रश्नांच्या पॅटर्नची माहिती असल्यास या विषयामध्ये 25 पैकी 25 गुण मिळवणे शक्य होते
याच उद्देशाने आम्ही तुमच्यासाठी Talathi Bharti Marathi Grammar Online Test Series उपलब्ध करून दिली आहे . या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला परीक्षेच्या स्वरूपाची माहिती मिळेल, तुमचा अभ्यास तपासता येईल आणि वेळेचे योग्य नियोजन करण्याचा सराव होईल
प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित निवडक व दर्जेदार 25 प्रश्न दिलेले आहेत . हे प्रश्न MPSC च्या नवीन Pattern नुसार तयार करण्यात आलेले असून आगामी तलाठी भरती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत
🟨
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांचा समावेश होतो ?
❶ 48
❷ 50
❸ 52
❹ 54
खालीलपैकी 'मूर्धन्य' वर्णांचा योग्य गट कोणता ?
❶ त्, थ्, द्, ध्, न्
❷ ट्, ठ्, ड्, ढ्, ण्
❸ प्, फ्, ब्, भ्, म्
❹ च्, छ्, ज्, झ्, ञ्
'सत् + जन = सज्जन' हा संधीचा कोणता प्रकार आहे ?
❶ स्वरसंधी
❷ विसर्गसंधी
❸ व्यंजनसंधी
❹ पररूप संधी
'श्रीमंतांना गर्व असतो' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती ?
❶ गुणविशेषण
❷ भाववाचक नाम
❸ विशेषणसाधित नाम
❹ सर्वनाम
'मी स्वतः त्याला पाहिले' या वाक्यातील 'स्वतः' हे कोणते सर्वनाम आहे ?
❶ दर्शक सर्वनाम
❷ संबंधी सर्वनाम
❸ पुरुषवाचक सर्वनाम
❹ आत्मवाचक सर्वनाम
'चांगला' या विकारी विशेषणाचे नपुंसकलिंगी अनेकवचनी रूप कोणते होईल ?
❶ चांगली
❷ चांगले
❸ चांगल्या
❹ चांगला
'आई मुलाला दूध पाजते' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
❶ प्रयोजक क्रियापद
❷ शक्य क्रियापद
❸ भावकर्तृक क्रियापद
❹ अकर्मक क्रियापद
'तो गाडीतून उतरला आणि निघून गेला' या वाक्यातील 'आणि' हे कोणते अव्यय आहे ?
❶ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
❷ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
❸ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
❹ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
खालीलपैकी 'विभक्ती' व तिचा 'कारकार्थ' यांची अयोग्य जोडी ओळखा ?
❶ द्वितीया - कर्म
❷ तृतीया - करण
❸ चतुर्थी - अपादान
❹ सप्तमी - अधिकरण
'घोडा' या नामाचे सामान्यरूप खालीलपैकी कोणते होईल ?
❶ घोडे
❷ घोड्या
❸ घोड्यांना
❹ घोडी
'रामाने रावणास मारले' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ कर्मणी प्रयोग
❸ भावे प्रयोग
❹ संकीर्ण प्रयोग
'पापपुण्य' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?
❶ इतरतर द्वंद्व समास
❷ वैकल्पिक द्वंद्व समास
❸ समाहार द्वंद्व समास
❹ तत्पुरुष समास
'मी रोज सकाळी योगासने करत असे' या वाक्यातील काळ ओळखा ?
❶ अपूर्ण भूतकाळ
❷ पूर्ण भूतकाळ
❸ रीती भूतकाळ
❹ साधा भूतकाळ
'ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू !' या ओळीतील अलंकार ओळखा ?
❶ उपमा
❷ उत्प्रेक्षा
❸ रूपक
❹ अपन्हुती
'भुजंगप्रयात' या वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात ?
❶ 11
❷ 12
❸ 14
❹ 17
'मुले बागेत खेळत आहेत' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते होईल ?
❶ मुले बागेत खेळत नाहीत.
❷ मुले बागेत शांत बसलेली नाहीत.
❸ मुले बागेत खेळणे बंद करत नाहीत.
❹ मुले बागेत न खेळता राहतात.
खालीलपैकी 'तत्सम' शब्द कोणता आहे ?
❶ कान
❷ हात
❸ भूगोल
❹ चाक
'समाजात वावरणारे असे कित्येक जयचंद आपल्या देशाचे नुकसान करतात' या वाक्यात 'जयचंद' शब्दाची कोणती शब्दशक्ती प्रकट होते ?
❶ अभिधा
❷ लक्षणा
❸ व्यंजना
❹ रसशक्ती
'आगीतून उठून फुफाट्यात पडणे' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ आगीपासून स्वतःचा बचाव करणे
❷ एका संकटातून निघून दुसऱ्या अधिक मोठ्या संकटात सापडणे
❸ जाणूनबुजून स्वतःचे नुकसान करून घेणे
❹ सर्व बाजूंनी संकटात घिरणे
खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा ?
❶ उज्वल
❷ उज्ज्वल
❸ उज्वल्य
❹ उज्वल्ल
बोलणाऱ्याच्या तोंडचे मूळ शब्द दाखविण्यासाठी कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो ?
❶ एकेरी अवतरण चिन्ह (' ')
❷ दुहेरी अवतरण चिन्ह (" ")
❸ अर्धविराम (;)
❹ अपसारण चिन्ह (—)
'शाश्वत' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ चिरंतन
❷ नश्वर
❸ अमर
❹ अखंड
'शृंगार' रसाचा स्थायीभाव खालीलपैकी कोणता आहे ?
❶ उत्साह
❷ शोक
❸ रती
❹ हास
'ज्याला कशाचीही उपमा देता येत नाही असा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
❶ अप्रतिम
❷ अनुपमेय
❸ अद्वितीय
❹ अगम्य
'आईने मुलीला शाळेत पाठविले' या वाक्यातील 'मुलीला' या शब्दाची विभक्ती कोणती ?
❶ प्रथमा
❷ द्वितीया
❸ तृतीया
❹ चतुर्थी
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🕛 25:00
Question : 1/0
Your Scorecard
Total Questions0
Solved Questions0
Correct Questions0
Wrong Questions0
Your Score : 0 / 0
Question Analysis
Talathi Bharti Marathi Grammar Online Test Series
जशा जशा नवीन टेस्ट अपलोड होतील, तशा लिंक्स येथे अपडेट केल्या जातील . त्यामुळे या पेजला वेळोवेळी भेट देत राहा
खाली दिलेल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही नियमित सराव करू शकता
Talathi Bharti Marathi Grammar Online Test
Talathi Bharti Marathi Grammar Test
Talathi Bharti Marathi Vyakaran Test
Talathi Bharti Marathi Grammar Online Test 2026
तलाठी भरती मराठी व्याकरण टेस्ट
तलाठी भरती मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट
Talathi Bharti Marathi Syllabus
Talathi Bharti Marathi Mock Test
Talathi Bharti Marathi Practice Test
Marathi Grammar Talathi Bharti
Talathi Bharti Marathi Grammar Questions
Talathi Bharti Marathi Grammar MCQ
Talathi Bharti Marathi Grammar Test Series
Talathi Bharti Marathi Online Test
तलाठी भरती मराठी शब्दसंग्रह टेस्ट
तलाठी भरती मराठी व्याकरण अभ्यासक्रम | Talathi Bharti Marathi Grammar Syllabus
तलाठी भरती परीक्षेत मराठी विषयामध्ये मुख्यतः व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन क्षमता आणि साहित्यविषयक माहिती यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
मराठी विषयातील खालील घटकांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे :
1) मराठी व्याकरण
मराठी व्याकरण हा परीक्षेतील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो
मुख्य उपघटक :
वर्णमाला
शब्दांच्या जाती – नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
काळ व काळाचे प्रकार
संधी व संधीचे प्रकार
समास व समासाचे प्रकार
अलंकार
प्रयोग
वाक्यप्रकार
विरामचिन्हे
लिंग, वचन, पुरुष
या घटकांवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात
2) शब्दसंग्रह
मराठी भाषेवरील पकड मजबूत करण्यासाठी शब्दसंग्रह महत्त्वाचा ठरतो
मुख्य उपघटक :
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
म्हणी आणि वाक्प्रचार
शब्दसमूहाबद्दल एक शब्द
शुद्ध-अशुद्ध शब्द
वाक्यप्रचारांचा अर्थ व उपयोग
योग्य शब्द निवडणे
शब्दसंग्रह विभागाचा नियमित सराव केल्यास परीक्षेत गुण वाढण्यास मदत होते
3) प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
या विभागामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक, कवी आणि लेखकांशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात
मुख्य उपघटक :
प्रसिद्ध मराठी लेखक
कवी व त्यांची साहित्यकृती
प्रसिद्ध पुस्तके
साहित्य क्षेत्रातील पुरस्कार
महाराष्ट्रातील साहित्यिक परंपरा
4) उताऱ्यावर आधारित प्रश्न
या प्रकारातील प्रश्नांमध्ये दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचून त्यावरील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडावी लागतात
मुख्य उपघटक :
परिच्छेद आकलन
योग्य निष्कर्ष काढणे
शब्दार्थ समजणे
माहितीचे विश्लेषण
योग्य पर्याय निवडणे
या विभागासाठी नियमित वाचनाची सवय उपयोगी ठरते
मराठी व्याकरण विषयात जास्त गुण मिळवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
दररोज किमान एक सराव टेस्ट सोडवा.
चुकीच्या प्रश्नांचे विश्लेषण करा.
लहान नोट्स तयार करा.
व्याकरणातील नियम लक्षात ठेवा.
वेळोवेळी रीविजन करा.
Talathi Bharti Marathi Grammar Online Test Series ही तलाठी भरती परीक्षेच्या तयारीसाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. नियमित सराव, योग्य अभ्यासक्रम आणि वेळेचे नियोजन यामुळे मराठी विषयात उत्कृष्ट गुण मिळवणे शक्य आहे
महत्त्वाची टीप : प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मराठी व्याकरणावर आधारित निवडक 25 प्रश्न दिलेले आहेत. नवीन टेस्टच्या अपडेट्ससाठी हे पेज नियमित तपासत राहा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा