विशेषण मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
'दोनदा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे
Correct Answer: आवृत्तीवाचक
Question : 2
'सहावा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे संख्याविशेषण आहे
Correct Answer: क्रमवाचक
Question : 3
विशेषणाचा प्रकार ओळखा – 'काळा घोडा'
Correct Answer: गुणवाचक विशेषण
Question : 4
'त्याने सर्व पेरू खाल्ले' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: अनिश्चित संख्यावाचक
Question : 5
'गाडीच्या डब्यात पेटती काडी हातात धरू नये.' अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: धातुसाधित विशेषण
Question : 6
'बोलका पोपट उडून गेला.' अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: धातुसाधित
Question : 7
'माझा आनंद द्विगुणित झाला.' अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: आवृत्तीवाचक
Question : 8
आम्ही पाची भावंडे पुण्यात शिकलो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: गणनावाचक
Question : 9
काही पक्षी उडू शकतात. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा
Correct Answer: अनिश्चित संख्यावाचक
Question : 10
पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा
Correct Answer: पिकलेले
Question : 11
श्रीमंत माणसांना गर्व असतो. यामधील विशेषणाचे नाम करा
Correct Answer: श्रीमंतांना गर्व असतो.
Question : 12
'बागेत रंगीबेरंगी फुले उमलली होती.' या वाक्यातील विशेषण ओळखा
Correct Answer: रंगीबेरंगी
Question : 13
खालीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते
Correct Answer: पुढची गल्ली
Question : 14
विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला असे म्हणतात
Correct Answer: विशेष्य
Question : 15
अलिकडे वाहती नदी दिसतेच कुठे ? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा
Correct Answer: धातूसाधित विशेषण
Question : 16
खालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा
Correct Answer: वरील सर्व
Question : 17
खालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता
Correct Answer: शूर सैनिक
Question : 18
कार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते
Correct Answer: सुरेल
Question : 19
'माझ्या भावाचे कापड दुकान आहे.' अधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा
Correct Answer: नामसाधित
Question : 20
खालील शब्दापासून तयार झालेले योग्य विशेषण ओळखा
Correct Answer: सर्व बरोबर
Question : 21
खालीलपैकी आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणते आहे
Correct Answer: दसपट
Question : 22
'शहाणी मुले शिस्तीने वागतात' या वाक्यातील विशेषण ओळखा
Correct Answer: शहाणी
Question : 23
'पद्धत' शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा
Correct Answer: पद्धतशीर
Question : 24
'असला नवरा नको ग बाई!' या वाक्यातील 'असला' हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे
Correct Answer: सार्वनामिक विशेषण
Question : 25
पुढील शब्दापासून विशेषण तयार करा - शास्त्र
Correct Answer: शास्त्रीय
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /