प्रयोग मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी लिंग, वचन, पुरुष याबाबतीत अन्वय / अनन्वय दर्शवणाऱ्या घटकाला काय म्हणतात
Correct Answer: प्रयोग
Question : 2
अ ) कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते
ब ) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो,
क ) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात
योग्य उत्तर कोणते ?
ब ) कर्मणी प्रयोगात कर्ता हा प्रथमान्त कधीच नसतो,
क ) भावे प्रयोगात कर्ता किंवा कर्म हे दोन्ही गौण असतात
योग्य उत्तर कोणते ?
Correct Answer: अ, ब व क बरोबर
Question : 3
"आजी दृष्ट काढते" या वाक्यातील प्रयोग ओळखा
Correct Answer: कर्तरी प्रयोग
Question : 4
"मांजर उंदीर पकडते" या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct Answer: कर्तरी प्रयोग
Question : 5
कर्तरी प्रयोगाबाबत योग्य विधाने कोणती
अ) कर्माप्रमाणे क्रियापद असते
ब) कर्ता प्रथमान्त असतो
क) कर्म असतेही किंवा नसतेही
ड) संकीर्ण प्रयोगातही असतो
अ) कर्माप्रमाणे क्रियापद असते
ब) कर्ता प्रथमान्त असतो
क) कर्म असतेही किंवा नसतेही
ड) संकीर्ण प्रयोगातही असतो
Correct Answer: (ब), (क) व (ड)
Question : 6
"विद्यार्थी अभ्यास करतो" या वाक्यातील प्रयोग कोणता
Correct Answer: सकर्मक कर्तरी
Question : 7
कर्तरी प्रयोगासंबंधी पुढील विधाने योग्य की अयोग्य ते सांगा
अ) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या लिंग-वचन-पुरुषानुसार बदलते
ब) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते
अ) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या लिंग-वचन-पुरुषानुसार बदलते
ब) कर्तरी प्रयोगात क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग-वचनानुसार बदलते
Correct Answer: केवळ अ बरोबर
Question : 8
‘पक्षी आकाशात उडाला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct Answer: अकर्मक कर्तरी प्रयोग
Question : 9
ज्या प्रयोगात क्रियापदाचे लिंग, वचन व पुरुष हे कर्माच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे असतात, त्यास कोणता प्रयोग म्हणतात
Correct Answer: कर्मणी प्रयोग
Question : 10
कर्मणी वाक्यांबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?
अ) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील व ती भिन्नलिंगी आणि भिन्नवचनात असतील तर वाक्यात शेवटच्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होते
ब) कर्मणी वाक्यात कर्मे एकापेक्षा अधिक असतील व ती भिन्नलिंगी आणि भिन्नवचनात असतील तर वाक्यात प्रथम येणाऱ्या कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप होते

Correct Answer: अ बरोबर व ब चूक
Question : 11
"गाईने गवत खाल्ले" या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct Answer: कर्मणी
Question : 12
‘पापात्मके पापे नरका जाईजे’ हे उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे
Correct Answer: प्राचीन कर्मणी
Question : 13
अ ) कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमान्त असतो
ब ) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात
क ) ‘त्याची गोष्ट लिहून झाली’ हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे
वरील विधानापैकी कोणती बरोबर आहेत
ब ) कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी असे म्हणतात
क ) ‘त्याची गोष्ट लिहून झाली’ हे समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण आहे
वरील विधानापैकी कोणती बरोबर आहेत
Correct Answer: फक्त ब व क बरोबर
Question : 14
खालीलपैकी कोणते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे
Correct Answer: मोर शिकाऱ्याकडून मारला जातो
Question : 15
------------- हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे
Correct Answer: नवीन कर्मणी प्रयोग
Question : 16
‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा
Correct Answer: नवीन कर्मणी प्रयोग
Question : 17
"गाय गुराख्याकडून बांधली जाते." या वाक्यातील प्रयोग कोणता
Correct Answer: कर्मकर्तरी प्रयोग
Question : 18
ज्या वाक्यातील कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग-वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही, त्याला काय म्हणतात
Correct Answer: भावे प्रयोग
Question : 19
भावे प्रयोगात क्रियापदाचे रूप ------------
Correct Answer: तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते
Question : 20
1. ज्या प्रयोगात क्रियापद स्वतंत्र, एकवचनी, तृतीयपुरुषी, नपुंसकलिंगी असते, तेव्हा भावे प्रयोग होतो
2.भावकर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो, कर्मही नसते
3. भावे प्रयोग सर्व काळात होतो
योग्य विधाने कोणती
2.भावकर्तरी प्रयोगात कर्ताही नसतो, कर्मही नसते
3. भावे प्रयोग सर्व काळात होतो
योग्य विधाने कोणती
Correct Answer: सर्व बरोबर
Question : 21
1. क्रियापद तृतीयपुरुषी एकवचनी असते
2. क्रियेचा भाव हाच कर्ता असतो
3. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया असते
ही लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत
2. क्रियेचा भाव हाच कर्ता असतो
3. कर्म असल्यास त्याची सप्रत्ययी द्वितीया असते
ही लक्षणे कोणत्या प्रयोगाची आहेत
Correct Answer: भावे प्रयोग
Question : 22
भावे प्रयोगात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
अ) क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही.
ब) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते.
क) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते
अ) क्रियापदाचे रूप कर्त्यांच्या किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही.
ब) क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते.
क) क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलते
Correct Answer: अ आणि ब
Question : 23
खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक भावे प्रयोग आहे
Correct Answer: दुष्यन्ताच्या शिपायांनी कोळ्याला मारले
Question : 24
खालील वाक्यांपैकी कोणती वाक्य भावे प्रयोगाची आहेत ?
अ) रामाने रावणास मारले
ब) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे
क) त्याने आता घरी जावे
ड) त्याला घरी आवडते
अ) रामाने रावणास मारले
ब) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे
क) त्याने आता घरी जावे
ड) त्याला घरी आवडते
Correct Answer: वरील सर्व पर्याय बरोबर आहेत
Question : 25
"सहलीला जाताना कात्रज जवळ उजाडले" या वाक्यातील प्रयोग कोणता
Correct Answer: भावकर्तरी प्रयोग
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /