वर्णमाला मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Question : 1
खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही
Correct Answer: ह्
'ह्' हे व्यंजन महाप्राणआहे, तर य्, र्, ल् हे अर्धस्वर आहेत (आधुनिक वर्णमालेत एकूण 4 अर्धस्वर/अंतस्थ आहेत - य् र् ल् व् )
Question : 2
स्वरांच्या ऱ्हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात . त्यानुसार खाली काही शब्द दिले आहेत. त्यापैकी चूकीची जोडी ओळखा ?
Correct Answer: सूर - देव
सुर (ऱ्हस्व 'उ') म्हणजे देव, तर सूर (दीर्घ 'ऊ') म्हणजे आवाज. त्यामुळे, 'सूर - देव' ही जोडी चुकीची आहे
Question : 3
एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना --------------- स्वर असे म्हणतात
Correct Answer: सजातीय
एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना 'सजातीय स्वर' असे म्हणतात. उदा. अ-आ , इ-ई , उ-ऊ
Question : 4
खालीलपैकी महाप्राण व्यंजनाचा गट ओळखा
Correct Answer: स् , फ् , ध्
स्, फ्, ध् हे सर्व महाप्राण व्यंजने आहेत.
Question : 5
खालीलपैकी सजातीय स्वरांच्या जोड्या सांगा
Correct Answer: वरील सर्व
वरील सर्व जोड्या (अ-आ, इ-ई, उ-ऊ) सजातीय स्वरांच्या आहेत, कारण त्यांचा उच्चार एकाच स्थानातून होतो.
Question : 6
ड् आणि ढ् ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा
Correct Answer: मृदू व्यंजने
ड् आणि ढ् ही मृदू व्यंजने आहेत.
Question : 7
खालीलपैकी घोष व्यंजन कोणते नाही
Correct Answer: थ्
थ् हे कठोर व्यंजन आहे, तर घ्, झ्, ढ् ही घोष व्यंजने आहेत.
Question : 8
ज्या व्यंजनांचा उच्चार करणे सोपे असते अशा व्यंजनांना ........ म्हणतात
Correct Answer: मृदू व्यंजन
ज्या व्यंजनांचा उच्चार सोपा असतो त्यांना 'मृदू व्यंजन' म्हणतात.
Question : 9
अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात
Correct Answer: नाक
अनुनासिकांचा उच्चार तोंडाबरोबर नाकातून होतो, म्हणून त्यांना 'नासिक्य' असेही म्हणतात.
Question : 10
अनुनासिकाला काय म्हणतात
Correct Answer: अनुस्वार
अनुनासिकाला 'अनुस्वार' असेही म्हणतात. दोन्ही संज्ञा नाकातून येणाऱ्या ध्वनीसाठी वापरल्या जातात
Question : 11
नाकातून होणाऱ्या ङ् , ण् , न् , म् , या वर्णांच्या उच्चाराला काय म्हणतात
Correct Answer: अनुनासिक
ङ्, ण्, न्, म् हे वर्ण नाकातून उच्चारले जातात, म्हणून त्यांना 'अनुनासिक' म्हणतात.
Question : 12
मराठी भाषेतील ' ळ ' या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते
Correct Answer: स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडीयन भाषा गट वर्ण
मराठी भाषेतील 'ळ' हा स्वतंत्र वर्ण मानला जातो, कारण तो द्रविडीयन भाषांतून मराठीत आला आहे.
Question : 13
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात
Correct Answer: औष्ठ्य
खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांना 'ओष्ठ्य' असे म्हणतात
Question : 14
खालीलपैकी कोणता वर्ण ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो
Correct Answer: भ्
भ् या वर्णाचा उच्चार ओठांनी होतो, म्हणून तो ओष्ठ्य वर्ण आहे.
Question : 15
खालीलपैकी ओष्ठ्य असलेले मृदू व्यंजन कोणते
Correct Answer: ब् , भ्
ओष्ठ्य वर्णांमध्ये 'ब्' आणि 'भ्' हे मृदू व्यंजने आहेत.
Question : 16
खालीलपैकी ओष्ठ्य असलेले अनुनासिक कोणते
Correct Answer: म्
ओष्ठ्य वर्गातील अनुनासिक 'म्' आहे.
Question : 17
खालीलपैकी कोणता स्वर ओष्ठ्य पद्धतीने उच्चारला जातो
Correct Answer: उ आणि ऊ
उ आणि ऊ या स्वरांचा उच्चार ओठांनी होतो, म्हणून ते ओष्ठ्य स्वर आहेत.
Question : 18
वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टीकोनातून पुढीलपैकी कोणता वर्णगट मूर्धन्य वर्णगट आहे
Correct Answer: ट् , ठ् , ढ् , ण् , र् , ष् , ळ्
ट्, ठ्, ढ्, ण्, र्, ष्, ळ् या वर्णांचा उच्चार करताना जीभ टाळूला स्पर्श करते, म्हणून त्यांना 'मूर्धन्य' वर्णगट म्हणतात.
Question : 19
वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टीकोनातून खाली दिलेल्या वर्णातून ' दंत्य ' वर्णगट ओळखा
Correct Answer: त् , थ् , द् ध् , न् , ल् , स्
त्, थ्, द्, ध्, न्, ल्, स् या वर्णांचा उच्चार दातांच्या सहाय्याने होतो, म्हणून त्यांना 'दंत्य' वर्णगट म्हणतात.
Question : 20
पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा - त् , थ्
Correct Answer: दंत्य
त् आणि थ् या वर्णांचा उच्चार दातांच्या सहाय्याने होतो, म्हणून ते 'दंत्य' वर्ण आहेत.
Question : 21
वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टीकोनातून पुढीलपैकी कोणता वर्ण गट कंठ्य वर्णगट आहे
Correct Answer: क् ख् ग् घ् ङ् ह्
क्, ख्, ग्, घ्, ङ्, ह् या वर्णांचा गट 'कंठ्य' आहे.
Question : 22
.......... हे स्वर कंठ्य वर्ण आहेत
Correct Answer: अ आणि आ
अ आणि आ या स्वरांचा उच्चार कंठातून होतो, म्हणून ते 'कंठ्य' स्वर आहेत.
Question : 23
वर्णांची उच्चार स्थाने या दृष्टिकोनातून पुढीलपैकी कोणता वर्ण तालव्य नाही
Correct Answer: र्
'र्' हा मूर्धन्य वर्ण आहे, तर श्, च्, छ् हे तालव्य वर्ण आहेत.
Question : 24
वर्णांची उच्चार स्थाने या दृष्टिकोनातून ' च् ' वर्गातील च् छ् ज् झ् या वर्णांचा उच्चार ......... असा दुहेरी होतो
Correct Answer: तालव्य व दंततालव्य
च्, छ्, ज्, झ् या वर्णांचा उच्चार तालव्य व दंततालव्य असा दुहेरी होतो
Question : 25
खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण ' ट ' वर्गातील आहे ?
Correct Answer: ण्
'ट' वर्गातील (ट्, ठ्, ड्, ढ्, ण्) ही व्यंजने आहेत , त्यापैकी 'ण्' हे अनुनासिक आहे . ( ट् , ठ् ) ही कठोर व्यंजने आहेत , तर ( ड् , ढ् ) ही मृदू व्यंजने आहेत
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या