शब्दसमूहाबद्दल एक शब्द | Shabdasamuh Marathi Grammar | प्रश्नसंच - 4

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
लिहिता-वाचता न येणारा ------------
▪️ निरक्षर
▪️ साक्षर
▪️ अल्पशिक्षित
▪️ सुशिक्षित
Correct Answer: निरक्षर
Question : 2
देवावर विश्वास नसलेला ------------
▪️ आस्तिक
▪️ नास्तिक
▪️ वैज्ञानिक
▪️ श्रद्धाळू
Correct Answer: नास्तिक
Question : 3
ज्याला मरण नाही असा -------------
▪️ मरणशील
▪️ अमर
▪️ मृत
▪️ जिवंत
Correct Answer: अमर
Question : 4
ज्याला शत्रू नाही असा -----------
▪️ अजित
▪️ अजातशत्रू
▪️ निशस्त्र
▪️ अजेय
Correct Answer: अजातशत्रू
Question : 5
लोकांमध्ये प्रिय असलेली व्यक्ती
▪️ लोकमान्य
▪️ लोकप्रिय
▪️ लोककल्याण
▪️ लोकोपकार
Correct Answer: लोकप्रिय
Question : 6
ज्याला कशाचीही भीती वाटत नाही असा
▪️ निर्भय
▪️ भित्रा
▪️ साहसी
▪️ धाडसी
Correct Answer: निर्भय
Question : 7
ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा
▪️ विजयी
▪️ अजिंक्य
▪️ पराभूत
▪️ यशस्वी
Correct Answer: अजिंक्य
Question : 8
केलेले उपकार जाणणारा
▪️ कृतज्ञ
▪️ कृतघ्न
▪️ उपकार
▪️ उपकारी
Correct Answer: कृतज्ञ
Question : 9
भाषण ऐकणारे लोक -----
▪️ श्रोते
▪️ वक्ते
▪️ प्रेक्षक
▪️ सभासद
Correct Answer: श्रोते
Question : 10
देशासाठी प्राणार्पण करणारा
▪️ सैनिक
▪️ हुतात्मा
▪️ शहीद
▪️ देशभक्त
Correct Answer: हुतात्मा
Question : 11
जाणून घेण्याची इच्छा असणारा
▪️ ज्ञानी
▪️ जिज्ञासू
▪️ बुद्धिवान
▪️ विचारवंत
Correct Answer: जिज्ञासू
Question : 12
मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण
▪️ पाणपोई
▪️ जलगृह
▪️ जलाशय
▪️ तलाव
Correct Answer: पाणपोई
Question : 13
दोन नद्या एकत्र येतात ती जागा
▪️ संगम
▪️ त्रिस्थळ
▪️ प्रयाग
▪️ त्रिवेणी
Correct Answer: संगम
Question : 14
गाजरपारखी म्हणजे -
▪️ मंद बुद्धीचा
▪️ कसलीही पारख नसलेला
▪️ चाणाक्ष
▪️ भाजीपाला तज्ञ
Correct Answer: कसलीही पारख नसलेला
Question : 15
शब्दसमूहाबद्दल एक शब्द - अकरावा रुद्र
▪️ बुद्धिमान
▪️ सात्विक
▪️ तापट
▪️ मूर्ख
Correct Answer: तापट
Question : 16
विस्थापितांना पुन्हा वसविणे , या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता
▪️ विस्थापना
▪️ पुनर्रोपण
▪️ पुनर्वसन
▪️ पुन: स्थापना
Correct Answer: पुनर्वसन
Question : 17
धारवाडी काटा म्हणजे
▪️ बिनचूक वजनाचा काटा
▪️ धारवाडहून आणलेला वजनकाटा
▪️ पायात बोचलेला विशिष्ट काटा
▪️ कान टोचण्याचे साधन
Correct Answer: बिनचूक वजनाचा काटा
Question : 18
पडक्या घराच्या मोकळ्या जागेला काय म्हणतात
▪️ ओसरी
▪️ बखळ
▪️ वखार
▪️ अंगन
Correct Answer: बखळ
Question : 19
माकडाचा खेळ करणारा -
▪️ दरवेशी
▪️ गारुडी
▪️ मदारी
▪️ डोंबारी
Correct Answer: मदारी
Question : 20
मोफत कोरडा शिधा मिळण्याची ठिकाण म्हणजे
▪️ सदावर्त
▪️ अन्नछत्र
▪️ उपहारगृह
▪️ खानावळ
Correct Answer: सदावर्त
Question : 21
शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा - अस्वलाचा खेळ करणारा
▪️ सोंगाड्या
▪️ दरवेशी
▪️ मदारी
▪️ गारुडी
Correct Answer: दरवेशी
Question : 22
अपायकारक सहानुभूती म्हणजे ----
▪️ समजूत
▪️ नाईलाज
▪️ वानरकिवन
▪️ आसरा
Correct Answer: वानरकिवन
Question : 23
रात्री हिंडणारे या शब्दासमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा
▪️ उभयचर
▪️ भूचर
▪️ जलचर
▪️ निसाचर
Correct Answer: निसाचर
Question : 24
सत्यासाठी झगडणारा -
▪️ सत्यजित
▪️ सत्यवान
▪️ सत्याग्रही
▪️ सत्यधर्मी
Correct Answer: सत्याग्रही
Question : 25
अंगावर अलंकार नसलेली स्त्री -
▪️ भिकारीण
▪️ गरीब
▪️ मंदोदरी
▪️ लंकेची पार्वती
Correct Answer: लंकेची पार्वती

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post