IC38 Mock Test in Marathi | एल.आय.सी एजंट परीक्षा सराव प्रश्नसंच
जर तुम्ही LIC एजंट बनण्याची तयारी करत असाल किंवा IC 38 परीक्षा (Insurance Agent Exam) देणार असाल, तर योग्य सराव आणि मार्गदर्शन आवश्यक आहे . MPSC Battle या वेबसाईटच्या माध्यमातून — IC 38 Mock Test — पूर्णपणे मराठी भाषेत तयार केलेली फ्री ऑनलाइन टेस्ट, ज्यामुळे तुम्ही घरी बसून परीक्षेचा सराव करू शकता
📋 प्रत्येक टेस्टमध्ये विमा क्षेत्र, आर्थिक व्यवहार, ग्राहक सेवा आणि नियमावली, विमा उत्पादनांचे प्रकार, जीवन विम्याचे तत्त्वज्ञान, विमा योजनांचे तपशील आणि विमा व्यवसायिक आचारसंहिता यावर आधारित निवडक व दर्जेदार 50 प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत .
👉 नवीन पॅटर्ननुसार दर्जेदार प्रश्न
👉 सविस्तर उत्तर व स्पष्टीकरण
👉 वेळ व्यवस्थापन + संकल्पना स्पष्टता
👉 परफॉर्मन्स ॲनालिसिस रिपोर्ट
🎯 येथे आम्ही तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण IC38 Exam Mock Test in Marathi खाली दिलेल्या आहेत
टेस्ट सोडवण्यासाठी - खालील लिंकवर क्लिक करा आणि प्रश्नांचा सराव सुरू करा
IC 38 Exam Mock Test in Marathi
अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप
भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे घेतली जाणारी IC 38 परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खाली दिलेली माहिती अत्यंत महत्त्वाची आहे
1. परीक्षेचे स्वरूप
| घटक | तपशील |
|---|---|
| प्रश्नांचा प्रकार | बहुपर्यायी प्रश्न (MCQs) |
| एकूण प्रश्न | 50 प्रश्न |
| एकूण गुण | 50 गुण (प्रत्येक प्रश्नाला 1 गुण) |
| वेळ | 1 तास (60 मिनिटे) |
| नकारात्मक गुण | नाही (चुकलेल्या उत्तरासाठी गुण वजा केले जात नाहीत) |
| उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण | 50 पैकी 18 गुण |
| परीक्षेचे माध्यम | मराठी (किंवा तुम्ही निवडलेली प्रादेशिक भाषा) |
2. मुख्य अभ्यासक्रम
IC 38 च्या संपूर्ण पुस्तकाची विभागणी मुख्यत्वे 3 भागांमध्ये केली आहे :
भाग 1: सामान्य विमा परिचय
- विम्याची संकल्पना : विम्याचा इतिहास, जोखीम व्यवस्थापन आणि विम्याची गरज.
- ग्राहकांशी वर्तन : विमा एजंटची व्यावसायिक नैतिकता आणि ग्राहकांना द्यावयाची सेवा.
- कायदेशीर बाबी : IRDAI चे नियम आणि ग्राहक तक्रार निवारण मंच (लोकपाल)
भाग 2: जीवन विमा
- जीवन विमा उत्पादने : मुदतीचा विमा , एंडोमेंट प्लॅन, मनिबॅक आणि युलिप
- विमा प्रस्ताव प्रक्रिया : अंडररायटिंग, वैद्यकीय व बिगर-वैद्यकीय जोखीम तपासणी.
- पॉलिसी दस्तऐवज : पॉलिसी बाँड, अटी व शर्ती आणि विम्याचे फायदे.
- दावा प्रक्रिया : मृत्यू दावा आणि मॅच्युरिटी दावा व लागणारी कागदपत्रे.
भाग 3: आरोग्य विमा
- आरोग्य विमा परिचय : हेल्थ इन्शुरन्सचे प्रकार, कॅशलेस क्लेम प्रक्रिया आणि अपवर्जन
3. परीक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
- नकारात्मक गुण नसल्यामुळे सर्व 50 प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे
- विमा लोकपाल आणि ग्राहक संरक्षण कायद्याशी संबंधित प्रश्न नीट वाचा, यावर 3 ते 4 प्रश्न येतात.
- महत्त्वाच्या संज्ञा जसे की, 'विमाधारक' आणि 'विमाकर्ता' यांमधील फरक नीट समजून घ्या.
महत्त्वाची सुचना : या टेस्ट सिरीज मध्ये काही त्रुटी असतील किंवा IC 38 Mock Test सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . या पेजवर आम्ही तुमच्या तयारीसाठी फ्री मध्ये मॉक टेस्ट अपडेट करत असतो
🔂 या पेजची लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या फ्री मॉक टेस्ट सिरीजचा फायदा घेता येईल
FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1. IC38 मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का ?
उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 50 पैकी 18 गुण (35%) मिळवावे लागतील. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण मिळतो आणि त्यासाठी कोणतेही नकारात्मक गुण नाहीत
2. IC38 परीक्षा कशी द्यावी ?
नोंदणी फॉर्म भरल्यानंतर आणि आवश्यक शुल्क भरल्यानंतर, तुमची अधिकृतपणे IRDAI परीक्षेसाठी नोंदणी केली जाईल. तथापि, परीक्षा देण्यासाठी पात्र होण्यापूर्वी, तुम्हाला IRDAI ने विहित केलेले अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल . हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच तुम्ही विमा सल्लागार परीक्षेला बसू शकता
3. IC38 परीक्षा प्रमाणपत्राची वैधता किती आहे ?
IC38 परीक्षा प्रमाणपत्राची वैधता 3 वर्ष आहे
4. IC38 परीक्षेसाठी उत्तीर्ण गुण किती आहेत ?
विमा एजंटसाठी IRDAI परीक्षा ही 1 तासाची परीक्षा असते ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्नावली असते. प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असतो. विमा सल्लागार परवान्यासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला 40% गुण आवश्यक आहेत. विमा विक्री परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला 40% गुण मिळवावे लागतील
5. IC38 परीक्षेत किती प्रश्न असतात ?
यामध्ये 50 बहुपर्यायी प्रश्न असतात आणि उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 18 गुण मिळवणे आवश्यक आहे . ही परीक्षा वेळेनुसार असते, साधारणपणे एक तासाची असते, ज्यामुळे वेळ व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कौशल्य बनते

