मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ | Vakprachar Marathi Grammar Questions | सराव प्रश्नसंच - 1


📋 मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ : सराव प्रश्नसंच - एकूण २५ प्रश्न

हा प्रश्नसंच काळजीपूर्वक सोडवा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची परीक्षा घ्या . हे सराव प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे

🗒️ सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखण्यासाठी चार पर्याय दिले आहेत . सर्वात अचूक व योग्य उत्तराची निवड करा

🎯 तुमचा स्कोअर

तुमचे एकूण गुण : २५ पैकी ________
तुम्ही किती गुण मिळवले, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! तुमचा स्कोअर पाहून, तुमच्या तयारीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील भागांमध्ये आणखी उपयुक्त प्रश्नसंच तयार करता येतील

🔂 हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा


Practice Questions

वाक्प्रचार मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
'तमा नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ अंधार करणे
▪️ पर्वा न करणे
▪️ भूक न लागणे
▪️ काळजी करणे
Correct Answer: पर्वा न करणे
Question : 2
केसाने गळा कापणे - या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
▪️ हातमिळवणी करणे
▪️ विश्वासघात करणे
▪️ आत्मविश्वास गमावणे
▪️ पाळण्यात जोजावणे
Correct Answer: योगक्षेम चालवणे
Question : 3
काकदृष्टीने पाहणे - या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ बारकाईने पाहणे
▪️ वाईट नजरेने पाहणे
▪️ बेफामपणे पाहणे
▪️ खुशामत करणे
Correct Answer: बारकाईने पाहणे
Question : 4
तुणतुणे वाजवणे - या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे
▪️ स्तुती करणे
▪️ निंदा करणे
▪️ अवास्तव बोलणे
Correct Answer: तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे
Question : 5
'कंबक्ती भरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ माहिती सांगणे
▪️ मार खाण्याची वेळ येणे
▪️ अंदाज येणे
▪️ लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करणे
Correct Answer: मार खाण्याची वेळ येणे
Question : 6
'आकाशपाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ खूप परिश्रम करणे
▪️ भूकंप होणे
▪️ संकटास सामोरे जाणे
▪️ नैसर्गिक आपत्ती कोसळणे
Correct Answer: खूप परिश्रम करणे
Question : 7
'काहीच न बोलणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ बभ्रा करणे
▪️ ब्र न काढणे
▪️ बहर येणे
▪️ गळ्याला कोरड पडणे
Correct Answer: ब्र न काढणे
Question : 8
'हरभऱ्याच्या झाडावर चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ स्तुतीला भुलणे
▪️ गर्व होणे
▪️ धीर सोडणे
▪️ इच्छा धरणे
Correct Answer: स्तुतीला भुलणे
Question : 9
'सगळे मुसळ केरात' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ काम भरपूर, पण वेळ थोडा
▪️ सगळी मेहनत फुकट जाणे
▪️ शेतात तण जास्त होणे
▪️ घरातील मुसळ केरात टाकणे
Correct Answer: सगळी मेहनत फुकट जाणे
Question : 10
'आकाश फाटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ गळ्याला कोरड पडणे
▪️ अघटित घडणे
▪️ अपशकुन होणे
▪️ चारही बाजूंनी संकट येणे
Correct Answer: चारही बाजूंनी संकट येणे
Question : 11
पुढील उदाहरण हे कोणत्या वाक्प्रचाराचे आहे? 'निरुपाय होणे'
▪️ कोंडमारा होणे
▪️ कानावर पडणे
▪️ काणाडोळा करणे
▪️ खडे फोडणे
Correct Answer: कोंडमारा होणे
Question : 12
पुढील वाक्प्रचाराचा योग्य पर्याय निवडा - जिवाचे रान करणे
▪️ हाडाची काडे करणे
▪️ हाड झिजवणे
▪️ हाड मोडून पडणे
▪️ हाडाचे पाणी करणे
Correct Answer: हाड मोडून पडणे
Question : 13
'चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार' ओळखा
▪️ निगराणी करणे – काळजी घेणे
▪️ हाड झिजवणे – परिश्रम करणे
▪️ मंत्रमुग्ध होणे – भारावून जाणे
▪️ डोळे लावून बसणे – डोळे मिटून बसले
Correct Answer: डोळे लावून बसणे – डोळे मिटून बसले
Question : 14
'चहा करणे' या वाक्प्रचाराशी समानार्थी वाक्प्रचार कोणता ?
▪️ वाट लावणे
▪️ वाखणणी करणे
▪️ हात ओला करणे
▪️ लाच देणे
Correct Answer: वाखणणी करणे
Question : 15
'कुणकुण लागणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा
▪️ लाथ लागणे
▪️ लळा लागणे
▪️ चाहूल लागणे
▪️ डोळा लागणे
Correct Answer: चाहूल लागणे
Question : 16
स्वाभिमान सोडून शरण जाणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता ?
▪️ दाती तृण धरणे
▪️ दात दाखविणे
▪️ दाती बोट धरणे
▪️ दात पाडणे
Correct Answer: दाती तृण धरणे
Question : 17
'कच्छपी लागणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
▪️ व्यर्थ समजूत काढणे
▪️ एखाद्याच्या नादी लागणे
▪️ तहान लागणे
▪️ जबाबदारी दुसऱ्यावर सोपवणे
Correct Answer: एखाद्याच्या नादी लागणे
Question : 18
खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा
▪️ कास धरणे – मोठ्याच्या आश्रयाला जाणे
▪️ कोंबडे झुंजविणे – भांडण लावून मजा पाहणे
▪️ कळा पालटणे – रूप पालटणे
▪️ कणीक तिंबणे – डोके दुखू लागणे
Correct Answer: कणीक तिंबणे – डोके दुखू लागणे
Question : 19
'चालत्या गाड्याला खीळ घालणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
▪️ चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे
▪️ गाड्याचा वेग वाढविणे
▪️ गाड्याची नीट दुरुस्ती करणे
▪️ जुना गाडा बदलून टाकणे
Correct Answer: चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे
Question : 20
'भावनेचा बांध फुटणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ निर्भयपणे सामोरे जाणे
▪️ भांबावून जाणे
▪️ दाबून टाकलेली भावना उफाळून येणे
▪️ अतूट नातेसंबंध तोडणे
Correct Answer: दाबून टाकलेली भावना उफाळून येणे
Question : 21
'अठरा गुणांचा खंडोबा' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ दरिद्री माणूस
▪️ लबाड माणूस
▪️ सज्जन माणूस
▪️ साक्षर माणूस
Correct Answer: लबाड माणूस
Question : 22
'उंबराचे फूल' -------
▪️ रागीट स्वभाव
▪️ जेवणातील एक पदार्थ
▪️ क्वचित भेटणारी व्यक्ती
▪️ रामबाण औषध
Correct Answer: क्वचित भेटणारी व्यक्ती
Question : 23
कानोसा घेणे या वाक्प्रचारासाठी खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे ?
▪️ मोठ्याने बोलणे
▪️ कानाचे ऑपरेशन करणे
▪️ लक्ष देऊन ऐकणे
▪️ दुर्लक्ष करणे
Correct Answer: लक्ष देऊन ऐकणे
Question : 24
'राम नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे ?
▪️ खूप मोठे आणि बलवान असणे
▪️ अर्थ नसणे
▪️ देवाचे नामस्मरण करणे
▪️ दुसऱ्याला मदत करणे
Correct Answer: अर्थ नसणे
Question : 25
'जीभ चावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा
▪️ तिखट लागल्यामुळे जीभ चावणे
▪️ शांतपणे जेवण करणे
▪️ स्वतःच्या बोलण्याचा पश्चात्ताप होणे
▪️ जीभ दाखवणे
Correct Answer: स्वतःच्या बोलण्याचा पश्चात्ताप होणे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /


✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post