वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न | Varnmala Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 2

Practice Questions

वर्णमाला मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच

Question : 1
खालीलपैकी कोणता वर्णमालेतील स्वराचा प्रकार नाही ?
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ अर्धस्वर
▪️ संयुक्त स्वर
Correct Answer: अर्धस्वर
'अर्धस्वर' हा स्वरांचा प्रकार नसून व्यंजनाचा प्रकार आहे. य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात.
Question : 2
अयोग्य जोडी ओळखा
1 ) ऱ्हस्व स्वर - अ , इ , उ , ऋ , ऌ
2 ) दीर्घ स्वर - आ , ई , ऊ
3 ) संयुक्त स्वर - ए , ऐ , ओ , औ
4 ) इंग्रजी स्वर - ॲ , ऑ
▪️ वरीलपैकी नाही
▪️ फक्त 3
▪️ 2 आणि 4
▪️ फक्त 4
Correct Answer: वरीलपैकी नाही
दिलेली सर्व जोड्या योग्य आहेत. ऱ्हस्व स्वर (अ, इ, उ, ऋ, ऌ), दीर्घ स्वर (आ, ई, ऊ), संयुक्त स्वर (ए, ऐ, ओ, औ) आणि इंग्रजी स्वर (ॲ, ऑ) यांच्या योग्य जोड्या आहेत.
Question : 3
योग्य जोड्या जुळवा
गट - अ
1) हृस्व स्वर
2) संयुक्त स्वर
3) सजातीय स्वर
4) अर्ध स्वर
गट - ब
A) य् - र्
B) अ - इ
C) ए - औ
D)अ - आ
▪️ 1-C , 2-B , 3-A , 4-D
▪️ 1-A , 2-B , 3-C , 4-D
▪️ 1-D , 2-A , 3-B , 4-C
▪️ 1-B , 2-C , 3-D , 4-A
Correct Answer: 1-B, 2-C, 3-D, 4-A
योग्य जोड्या: ऱ्हस्व स्वर (उच्चार कमी वेळ लागतो) - अ, इ. संयुक्त स्वर (दोन स्वरांपासून तयार झालेले) - ए, औ. सजातीय स्वर (एकाच उच्चारस्थानातून निघणारे) - अ, आ. अर्ध स्वर (अर्धा उच्चार स्वरासारखा) - य, र.
Question : 4
योग्य विधाने ओळखा
1 ) तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात
2 ) ध्वनीला किंवा आवाजाला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते
3 ) शब्द तयार होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते
4 ) अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात
▪️ 1 , 2 आणि 3
▪️ 2 आणि 3
▪️ 1 आणि 4
▪️ वरील सर्व योग्य
Correct Answer: वरील सर्व योग्य
दिलेली सर्व विधाने योग्य आहेत.
Question : 5
ज्या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो त्यांना ......... म्हणतात
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
Correct Answer: ऱ्हस्व स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात. उदा. अ, इ, उ, ऋ, ऌ.
Question : 6
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती ऱ्हस्व स्वर आहेत ?
▪️ चार
▪️ तीन
▪️ पाच
▪️ दोन
Correct Answer: पाच
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण पाच ऱ्हस्व स्वर आहेत: अ, इ, उ, ऋ, ऌ.
Question : 7
खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ?
▪️ अ - इ - उ - ऋ - ऌ
▪️ ए - ऐ - ओ - औ
▪️ आ - ई - ऊ
▪️ ॲ - ऑ
Correct Answer: अ - इ - उ - ऋ - ऌ
अ, इ, उ, ऋ, ऌ हे मराठीतील ऱ्हस्व स्वर आहेत.
Question : 8
योग्य शब्द लिहा : अ , इ , उ , ऋ , ऌ हे ......... स्वर आहेत
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दिर्घ स्वर
▪️ सजातीय
▪️ विजातीय
Correct Answer: ऱ्हस्व स्वर
अ, इ, उ, ऋ, ऌ हे ऱ्हस्व स्वर आहेत कारण त्यांच्या उच्चारास कमी वेळ लागतो.
Question : 9
खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता ?
▪️ आ
▪️ औ
▪️ ऐ
▪️ ऋ
Correct Answer: ऋ
ऋ हा एक ऱ्हस्व स्वर आहे.
Question : 10
ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना ......... म्हणतात
▪️ दीर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
▪️ ऱ्हस्व स्वर
Correct Answer: दीर्घ स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.
Question : 11
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती दीर्घ स्वर आहेत ?
▪️ पाच
▪️ चार
▪️ तीन
▪️ दोन
Correct Answer: तीन
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण तीन दीर्घ स्वर आहेत: आ, ई, ऊ.
Question : 12
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ इ
▪️ ऋ
▪️ ऌ
▪️ आ
Correct Answer: आ
आ हा एक दीर्घ स्वर आहे.
Question : 13
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ उ
▪️ ऋ
▪️ ई
▪️ ऌ
Correct Answer: ई
ई हा एक दीर्घ स्वर आहे.
Question : 14
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ ऊ
▪️ इ
▪️ ऋ
▪️ ऌ
Correct Answer: ऊ
ऊ हा एक दीर्घ स्वर आहे.
Question : 15
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणते
▪️ ए - ऐ - ओ - औ
▪️ आ - ई - ऊ
▪️ अ - इ - उ - ऋ - ऌ
▪️ ॲ - ऑ
Correct Answer: आ - ई - ऊ
आ, ई, ऊ हे दीर्घ स्वर आहेत कारण त्यांच्या उच्चारास जास्त वेळ लागतो.
Question : 16
योग्य शब्द लिहा : आ , ई , ऊ हे ......... स्वर आहेत
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दिर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
Correct Answer: दीर्घ स्वर
आ, ई, ऊ हे दीर्घ स्वर आहेत.
Question : 17
संयुक्त स्वर म्हणजे काय
▪️ दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ एकाच स्वराला संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ तीन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ एक स्वर व एक व्यंजन एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
Correct Answer: दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना 'संयुक्त स्वर' असे म्हणतात.
Question : 18
दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक ....... निर्माण होते
▪️ संयुक्त स्वर
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ अर्ध स्वर
Correct Answer: संयुक्त स्वर
दोन भिन्न उच्चारस्थानांतून येणाऱ्या स्वरांच्या एकत्रिकरणातून 'संयुक्त स्वर' तयार होतो.
Question : 19
संयुक्त स्वर हे .......... असतात
▪️ दीर्घ उच्चाराचे
▪️ कमी लांबीच्या उच्चाराचे
▪️ ऱ्हस्व उच्चाराचे
▪️ यापैकी नाही
Correct Answer: दीर्घ उच्चाराचे
संयुक्त स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रिकरणातून बनत असल्यामुळे त्यांचा उच्चार लांब, म्हणजेच दीर्घ असतो.
Question : 20
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती संयुक्त स्वर आहेत ?
▪️ तीन
▪️ पाच
▪️ चार
▪️ दोन
Correct Answer: चार
मराठीत एकूण चार संयुक्त स्वर आहेत: ए, ऐ, ओ, औ.
Question : 21
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ए
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
Correct Answer: ए
ए हा एक संयुक्त स्वर आहे, जो अ + इ/ई यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 22
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ऐ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
Correct Answer: ऐ
ऐ हा एक संयुक्त स्वर आहे, जो आ + इ/ई यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 23
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ओ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
Correct Answer: ओ
ओ हा एक संयुक्त स्वर आहे, जो अ + उ/ऊ यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 24
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ औ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
Correct Answer: औ
औ हा एक संयुक्त स्वर आहे, जो आ + उ/ऊ यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 25
पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ?
▪️ ए , ऐ , ओ , औ
▪️ अ , इ , ई , उ
▪️ अ , इ , उ , ऌ
▪️ आ , इ , ई , उ
Correct Answer: ए , ऐ , ओ , औ
ए, ऐ, ओ, औ हे सर्व संयुक्त स्वर आहेत.

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /


🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post