उभयान्वयी अव्यय मराठी व्याकरण प्रश्न | Ubhyayanvayi Avyay Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 1

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला ------------------- अव्यय असे म्हणतात
▪️ केवलप्रयोगी अव्यय
▪️ समुच्चयबोधक अव्यय
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
Correct Answer: उभयान्वयी अव्यय
Question : 2
'तो म्हणाला की तो उद्या येईल.' या वाक्यात 'की' हे अव्यय कोणते कार्य करते ?
▪️ परिणाम
▪️ संकेत
▪️ स्वरूप
▪️ विकल्प
Correct Answer: स्वरूप
Question : 3
आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो - या वाक्यातील 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
▪️ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 4
अथवा , किंवा , अगर , की , ही - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 5
तिने खूप मेहनत केली परंतु यश मिळाले नाही - या वाक्यातील 'परंतु' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
▪️ समुच्चयबोधक
▪️ विकल्पबोधक
▪️ न्यूनत्वबोधक
▪️ परिणामबोधक
Correct Answer: न्यूनत्वबोधक
Question : 6
मी दवाखान्यात जातो जेणेकरून मला औषध मिळेल - या वाक्यातील 'जेणेकरून' हे कोणते अव्यय आहे ?
▪️ स्वरूपबोधक
▪️ संकेतबोधक
▪️ कारणबोधक
▪️ उद्देशबोधक
Correct Answer: उद्देशबोधक
Question : 7
परंतु , पण , बाकी , किंतु , परी - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
▪️ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 8
मरावे परी कीर्तिरुपे उरावे - या वाक्यातील 'परी' या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 9
त्याने चोरी केली सबब त्याला शिक्षा झाली - या वाक्यातील 'सबब' हे अव्यय कोणत्या पोटप्रकारात मोडते ?
▪️ उद्देशबोधक
▪️ परिणामबोधक
▪️ कारणबोधक
▪️ स्वरूपबोधक
Correct Answer: परिणामबोधक
Question : 10
तुला पास व्हायचे असेल तर अभ्यास कर - या वाक्यातील 'तर' हे कोणत्या प्रकारातील उभयान्वयी अव्यय आहे ?
▪️ स्वरूपबोधक
▪️ संकेतबोधक
▪️ विकल्पबोधक
▪️ न्यूनत्वबोधक
Correct Answer: संकेतबोधक
Question : 11
म्हणून , सबब , याकरिता , यास्तव , तेव्हा , तस्मात - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 12
मी शाळेत गेलो नाही कारण मी आजारी होतो - या वाक्यातील 'कारण' हे कोणत्या प्रकारातील अव्यय आहे ?
▪️ स्वरूपबोधक
▪️ संकेतबोधक
▪️ कारणबोधक
▪️ परिणामबोधक
Correct Answer: कारणबोधक
Question : 13
म्हणून , सबब , यास्तव , कारण - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 14
चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला - या वाक्यातील 'म्हणून' या अव्ययास काय म्हणतात
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 15
जर-तर , म्हणजे , की , तर - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 16
तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ - अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 17
म्हणून , म्हणजे , की , जे - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 18
खालील वाक्यातील स्वरूपदर्शक उभयान्वयी अव्यय ज्या वाक्यात आहे ते वाक्य कोणते ते सांगा ?
▪️ यश मिळो, की न मिळो आम्ही प्रयत्न करणार
▪️ माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन
▪️ तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले
▪️ लोकमान्य टिळक म्हणत, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
Correct Answer: लोकमान्य टिळक म्हणत, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
Question : 19
कारण , का-की - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: कारणबोधक उभयान्वयी अव्यय
Question : 20
उभयान्वयी अव्ययाचे मुख्य प्रकार किती आहेत
▪️ तीन
▪️ चार
▪️ दोन
▪️ पाच
Correct Answer: दोन
Question : 21
मला चहा आणि कॉफी दोन्ही आवडतात - या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा
▪️ मला
▪️ दोन्ही
▪️ आवडतात
▪️ आणि
Correct Answer: आणि
Question : 22
मला चांगले गुण मिळाले म्हणून मी पास झालो - या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा
▪️ स्वरूपबोधक
▪️ परिणामबोधक
▪️ उद्देशबोधक
▪️ कारणबोधक
Correct Answer: परिणामबोधक
Question : 23
मी अभ्यास करेन किंवा चित्रपट बघेन - या वाक्यातील 'किंवा' हे कोणते अव्यय आहे ?
▪️ समुच्चयबोधक
▪️ विकल्पबोधक
▪️ न्यूनत्वबोधक
▪️ कारणबोधक
Correct Answer: विकल्पबोधक
Question : 24
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली दोन्ही वाक्ये कशी असतात ?
▪️ एक गौण आणि एक प्रधान
▪️ दोन्ही परस्परावलंबी
▪️ अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आणि समान दर्जाची
▪️ दोन्ही क्रियापदांनी जोडलेली
Correct Answer: अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आणि समान दर्जाची
Question : 25
आणि , व , शिवाय , आणखी , अन् , आणिक - हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत
▪️ विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
Correct Answer: समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post