मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
ज्या पद्यरचनेत यमक, चरण, यति, गण, मात्रा किंवा अक्षरांची संख्या यांचे कोणतेही बंधन नसते ते काव्यरूप कोणते ?
Correct Answer: मुक्तछंद
Question : 2
ज्या वृत्तात अक्षरांची संख्या व त्यांचे लघु-गुरू स्थान निश्चित असते,त्यास ------------------ म्हणतात
Correct Answer: अक्षरगणवृत्त
Question : 3
वृत्त किंवा छंद म्हणजे काय
Correct Answer: पद्यात जी विशिष्ट शब्द रचना आपण करतो
Question : 4
पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत ? म-स-ज-स-त-त-ग
Correct Answer: शार्दुलविक्रीडित
Question : 5
वृत्त ओळखा ? ' मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी, होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी तन्निः उवास श्रवुन रिझवी कोणत्याच्या जीवासी '
Correct Answer: मंदाकांता
Question : 6
पद्यात जी विशिष्ट शब्दरचना असते तिला काय म्हणतात ?
Correct Answer: चरण
Question : 7
वसंततिलका वृत्तात यती कितव्या अक्षरांवर येते
Correct Answer: आठव्या
Question : 8
वृत्ताच्या चरणात विशिष्ट ठिकाणी थांबण्याची जागा म्हणजे -------------
Correct Answer: यति
Question : 9
'न न म य य' हे कोणत्या वृत्ताचे गण-सूत्र आहे, ज्यात एकूण 15 अक्षरे असतात ?
Correct Answer: मालिनी
Question : 10
ज्या वृत्ताच्या प्रत्येक चरणात चार य गण (य य य य) येतात आणि एकूण 12 अक्षरे असतात, ते अक्षरगणवृत्त कोणते ?
Correct Answer: भुजंगप्रयात
Question : 11
उत्ताल येथें, तरुची वसंत-तिलका शोभे गमे या वना - या ओळीतील अक्षरगणवृत्ताचे नाव काय आहे ?
Correct Answer: वसंततिलका
Question : 12
ज्या वृत्तात एकूण १९ अक्षरे असतात आणि गणक्रम ' म स ज स त त ग ' असतो - ते वृत्त कोणते ?
Correct Answer: शार्दूलविक्रीडित
Question : 13
ज्या वृत्तात अक्षरांच्या संख्येपेक्षा मात्रांची संख्या निश्चित केलेली असते, त्यास कोणते वृत्त म्हणतात ?
Correct Answer: मात्रावृत्त
Question : 14
मात्रावृत्तातील 'गण' हे साधारणपणे किती मात्रांचे असतात ?
Correct Answer: चार मात्रांचे
Question : 15
आर्या वृत्ताच्या पहिल्या चरणात किती मात्रा असतात ?
Correct Answer: 12
Question : 16
आर्या वृत्ताच्या दुसऱ्या चरणात किती मात्रा असतात ?
Correct Answer: 18
Question : 17
साकी वृत्ताच्या प्रत्येक चरणात एकूण किती मात्रा असतात, आणि यति कोठे असतो ?
Correct Answer: 28 मात्रा, यति 16 व्या मात्रेनंतर
Question : 18
दिंडी वृत्ताच्या प्रत्येक चरणात एकूण किती मात्रा असतात ?
Correct Answer: 19
Question : 19
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी (वेळ) लागतो, त्यास काय म्हणतात ?
Correct Answer: मात्रा
Question : 20
ऱ्हस्व अक्षराची किती मात्रा मानतात ?
Correct Answer: एक
Question : 21
दीर्घ अक्षराच्या किती मात्रा मानतात ?
Correct Answer: दोन
Question : 22
वृत्तशास्त्रात ऱ्हस्व अक्षरांना कोणते नाव दिले आहे ?
Correct Answer: लघु
Question : 23
वृत्तशास्त्रात दीर्घ अक्षरांना काय म्हणतात ?
Correct Answer: गुरू
Question : 24
लघु अक्षर कोणत्या चिन्हाने दाखवतात ?
Correct Answer: अर्धचंद्राकृती ( U ) चिन्हाने
Question : 25
गुरू अक्षर कोणत्या चिन्हाने दर्शवितात ?
Correct Answer: आडव्या रेषेने ( - )
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या