📋 मराठी म्हणी व त्यांचे अर्थ : सराव प्रश्नसंच - एकूण २५ प्रश्न
हा प्रश्नसंच काळजीपूर्वक सोडवा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची परीक्षा घ्या. हे केवळ सराव प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे 🗒️ सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या म्हणीचा अर्थ ओळखण्यासाठी चार पर्याय दिले आहेत. सर्वात अचूक व योग्य उत्तराची निवड करा🎯 तुमचा स्कोअर
तुमचे एकूण गुण : 25 पैकी ________तुम्ही किती गुण मिळवले, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! तुमचा स्कोअर पाहून, तुमच्या तयारीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील भागांमध्ये आणखी उपयुक्त प्रश्नसंच तयार करता येतील 🔂 हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा
म्हणी व त्यांचे अर्थ सराव प्रश्नसंच
Question : 1
साखरेचे खाणार त्याला देव देणार - या म्हणीचा अर्थ काय ?
Correct Answer: जो चांगली इच्छा करतो, त्याला चांगला लाभ होतो
Question : 2
अर्धी टाकून सगळीसाठी धावू नये - या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
Correct Answer: सबंध वस्तू मिळविण्यासाठी मिळालेली अर्धी टाकू नये, परिणामी दोन्ही जातात
Question : 3
भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही - या म्हणीचा अर्थ काय ?
Correct Answer: भीक मागून कुणी श्रीमंत होत नाही
Question : 4
'असतील शिते तर जमतील भुते' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
Correct Answer: जवळ माया असेल तर नातेवाईक मंडळी जमतात
Question : 5
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा अचूक अर्थ कोणता
Correct Answer: अवनती होऊ लागली, की ती सर्व बाजूंनी होते
Question : 6
लोभाजीरावाने जास्त जमीन प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली; पण अती लोभाने त्याचा मृत्यू झाला' म्हणतात ना -----------
Correct Answer: अती तिथे माती
Question : 7
'दुभत्या गाईच्या लाथा गोड' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
Correct Answer: फायद्यासाठी अपमान सहन करणे.
Question : 8
'फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय' या अर्थाच्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण ओळखा
Correct Answer: ऐकावे जनाचे करावे मनाचे
Question : 9
'दाट पेरा, देईल नुसता चारा' या म्हणीचा अर्थ ओळखा
Correct Answer: खूप दाट पेरणी केल्यास केवळ गवतच हाती येईल. धान्य नाही.
Question : 10
'कृष्णाचे वडील आजारी पडले, त्यातच त्याच्या आईचा पाय मोडला' या म्हणीचा अर्थ ओळखा
Correct Answer: दुष्काळात तेरावा महिना
Question : 11
'कणगीत दाणा भिल्ल उताणा' या म्हणीचा अर्थ ओळखा
Correct Answer: स्वतः जवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे काम न करता बसून राहणे.
Question : 12
'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा' या म्हणीचा अर्थ ओळखा
Correct Answer: वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते.
Question : 13
'इकडे आड तिकडे विहीर' या म्हणीचा अर्थ ओळखा
Correct Answer: दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे.
Question : 14
'आपण नडलो म्हणजे प्रसंगी, मूर्खालादेखील वंदन करतो' या अर्थाची योग्य म्हण निवडा
Correct Answer: अडला हरी गाढवाचे पाय धरी
Question : 15
असतील शिते तर जमतील भूते - या म्हणीसाठी पर्यायी म्हण ओळखा
Correct Answer: हात ओला तर मित्र भला
Question : 16
वसंतरावांनी बँकेतली सगळी ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्तीची आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवली, पुढे कंपनीच बोगस निघाली आणि वसंतरावांचे होते नव्हते ते गेले - म्हणतात ना --------
Correct Answer: आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते
Question : 17
-------- 'पहावे बांधून, लग्न पाहावे करून' ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा
Correct Answer: घर
Question : 18
टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला ........ येत नाही – ही म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द निवडा
Correct Answer: देवपण
Question : 19
'जयचंदी घोडचूक' या म्हणीचा अर्थ काय -----
Correct Answer: देशद्रोही, फितुरी
Question : 20
'अनुकूलता असूनही तिचा उपयोग करता न येणे' या स्पष्टीकरणाचा अर्थ असलेली म्हण ओळखा
Correct Answer: गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी
Question : 21
'उधारीचे पोते सवा हात रिते' ही म्हण काय सुचवते
Correct Answer: उधारी अंतिमतः नुकसानीत नेते
Question : 22
'टिटवी देखील समुद्र आटवते' या म्हणीच्या विरुद्ध आशय सुचवणारी म्हण कोणती
Correct Answer: सरड्याची धाव कुंपणापर्यंत
Question : 23
उखळ पाण्याला खळखळाट फार - या म्हणीचा अर्थ काय
Correct Answer: ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारतो
Question : 24
'पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास बारा वाटा' या म्हणीतून काय व्यक्त होते
Correct Answer: चोरीची सुलभता व शोधाची कठीणता
Question : 25
सावकार बाबारावांचे निधन झाल्यावर शोकसभेत लोकांनी त्यांच्या कार्याबद्दल भरभरून बोलले – या प्रसंगासाठी कोणती म्हण लागू पडते ?
Correct Answer: मेलेल्या म्हशीला मणभर दूध
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या