शब्दशक्ती मराठी व्याकरण | ShabdaShakti Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 1

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
शब्दांच्या शक्तीविषयी खालील विधानांचा विचार करा . व योग्य विधाने असलेला पर्याय निवडा
1. शब्दांचा अर्थबोध करून देण्याच्या शक्तीला 'शब्दशक्ती' म्हणतात
2. शब्दशक्तीचे मुख्य तीन प्रकार आहेत : अभिधा, लक्षणा आणि व्यंजना
▪️ केवळ 1 योग्य
▪️ केवळ 2 योग्य
▪️ 1 आणि 2 दोन्ही योग्य
▪️ दोन्ही अयोग्य
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 2
ध्वन्यर्थ म्हणजे --------------
▪️ भाषेतील मूलध्वनीचा अर्थ
▪️ लक्षणा शब्दशक्तीमुळे जाणवणारा अर्थ
▪️ व्यंजना शक्तीमुळे सूचित होणारा अर्थ
▪️ अभिधा शक्तीमुळे जाणवणारा अर्थ
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 3
पुढील शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगा - घरदार सोडून निघून जाणे सर्व चीजवस्तू दान देण्यास सांगणे
▪️ घरावर तुळशीपत्र ठेवणे
▪️ घर गहाण टाकणे
▪️ संन्यास घेणे
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 4
कोल्हा - या शब्दातून कोणता लक्ष्यार्थ घेतला जातो . योग्य पर्यायी उत्तर निवडा ?
▪️ कोल्हा एक जंगली प्राणी आहे
▪️ माणसाचा धूर्त लबाड स्वभाव
▪️ मळ्याचा मका खाणारा
▪️ जंगलातील धूर्त प्राणी
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 5
गरज ही कल्पकतेची आई होय - या वाक्यातील आई या शब्दाचा लक्ष्यार्थ कोणता
▪️ जन्मदात्री
▪️ माऊली
▪️ उत्पत्तीचे कारण
▪️ माता
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 6
पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखा - हात कापून देणे
▪️ मदत करणे
▪️ लेखी करार करून देणे
▪️ हात आखडणे
▪️ धीर सोडणे
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 7
अभिधा शब्दशक्तीविषयी खालील विधानांचा विचार करा
1. या शक्तीमुळे शब्दाचा मुख्य, सरळ अर्थ समजतो
2. या शक्तीला 'वाच्यार्थ' किंवा 'अभिधेयार्थ' असेही म्हणतात
▪️ केवळ 1 योग्य
▪️ केवळ 2 योग्य
▪️ 1 आणि 2 दोन्ही योग्य
▪️ दोन्ही अयोग्य
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 8
शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू, पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे --------------
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 9
योग, रुढी, योगरूढ - हे कोणात्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत
▪️ अभिधा
▪️ व्यंजना
▪️ लक्षणा
▪️ गौणी
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 10
विशेषतः काव्याला सुचकता आणणारी व काव्य अधिक परिणामकारक ठरविणारी शब्दशक्ती कोणती ?
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ अभिधा
▪️ निरूढा
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 11
व्यंजना शक्तीविषयी खालील विधानांचा विचार करा
1. या शक्तीमुळे शब्दाचा मुख्य (अभिधा) किंवा गौण (लक्षणा) अर्थ सोडून तिसराच, सूचित अर्थ समजतो
2. या शक्तीला 'व्यंग्यार्थ' असेही म्हणतात
▪️ केवळ 1 योग्य
▪️ केवळ 2 योग्य
▪️ 1 आणि 2 दोन्ही योग्य
▪️ दोन्ही अयोग्य
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 12
काकणभर कमी नाही - या वाक्यात कोणत्या शब्दशक्तीचा वापर झाला आहे
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 13
खालील पर्यायी उत्तरांतून व्यंजना शब्दशक्तीचे उदाहरण ओळखा
▪️ तो पेला पिऊन टाक
▪️ साखर कारखान्याला एक दोन ट्रकच येऊन काय उपयोगाचे
▪️ सायंकाळचा देखावा छानच असतो
▪️ वत्सलाबाई आपल्या सुनेला म्हणाल्या, 'सुनबाई आता संध्याकाळ झाली'
Correct Answer: पर्याय क्र. 3
Question : 14
व्यंग्यार्थ वाक्य कोणते ते खाली दिलेल्या पर्यायी उत्तरातून शोधा
▪️ आम्ही फक्त बाजरीच खातो
▪️ देविकाबाई सुनेला म्हणाल्या, 'सूर्य अस्ताला गेला'
▪️ घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल
▪️ त्याच्या घरावरून गेले की मंदिर येते
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 15
उषःकाल होता होता काळरात्र झाली - या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो
▪️ लक्ष्यार्थ
▪️ वाच्यार्थ
▪️ शब्दार्थ
▪️ व्यंग्यार्थ
Correct Answer: पर्याय क्र. 3
Question : 16
घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले - या वाक्यातून शब्दशक्तीचा कोणता अर्थ व्यक्त होतो
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ निरूढा
▪️ व्यंजना
Correct Answer: पर्याय क्र. 3
Question : 17
समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत - शब्दशक्ती ओळखा
▪️ संकेतार्थ
▪️ व्यंगार्थ
▪️ वाच्यार्थ
▪️ लक्ष्यार्थ
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 18
खालील पर्यायी उत्तरातून व्यंजना शब्दशक्ती ओळखा
▪️ आम्ही गहू खातो
▪️ तो निव्वळ साप आहे
▪️ सायंकाळची शोभा काहीशी औरच असते
▪️ आज किती गाड्यांची आवक झाली
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 19
मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही . या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा
▪️ अभिधामूल व्यंजना
▪️ लक्षणामूल व्यंजना
▪️ लक्षण लक्षणा
▪️ सारोपा लक्षणा
Correct Answer: पर्याय क्र. 0
Question : 20
जेव्हा शब्दाचा मुख्य अर्थ घेण्यास अडचण येते आणि त्यातून संबंधित दुसरा अर्थ घेतला जातो, तेव्हा कोणती शब्दशक्ती कार्यरत असते
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 21
लक्षणा शब्दशक्तीविषयी खालील विधानांचा विचार करा
1. या शब्दशक्तीमध्ये शब्दाचा मुख्य अर्थ घेतला जात नाही
2. मुख्य अर्थाला बाधा आल्यास किंवा मुख्य अर्थ लागू पडत नसल्यास लक्षणा शक्तीचा वापर होतो
3. या शक्तीला 'व्यंगार्थ' किंवा 'वाच्यार्थ' असेही म्हणतात
▪️ केवळ 1 योग्य
▪️ केवळ 2 योग्य
▪️ 1 आणि 2 योग्य
▪️ 1, 2 आणि 3 अयोग्य
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 22
माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत - या वाक्यात कोणत्या शब्दशक्तीचा वापर झाला आहे
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ यांपैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 1
Question : 23
आम्ही गहू खातो . या वाक्यातील शब्दशक्ती कोणती
▪️ अभिधा
▪️ व्यंजना
▪️ लक्षणा
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 24
गंगेत गवळ्यांची वस्ती या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे
▪️ अभिधा
▪️ व्यंजना
▪️ लक्षणा
▪️ योगरुढ
Correct Answer: पर्याय क्र. 2
Question : 25
चला पानावर बसा . या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा
▪️ लक्षणा
▪️ अभिधा
▪️ व्यंजना
▪️ यापैकी नाही
Correct Answer: पर्याय क्र. 0

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post