केवलप्रयोगी अव्यय मराठी व्याकरण प्रश्न | Kevalprayogi Avyay Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 1

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना -------------- अव्यय असे म्हणतात
▪️ उभयान्वयी
▪️ शब्दयोगी
▪️ केवलप्रयोगी
▪️ क्रियाविशेषण
Correct Answer: केवलप्रयोगी
Question : 2
केवलप्रयोगी अव्यये ही --------------
▪️ दोन वाक्य जोडण्याचे काम करतात
▪️ आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात
▪️ केवलप्रयोगी अव्यय विकारी असतात
▪️ शब्दाचा वाक्याशी असलेला संबंध दर्शवितात
Correct Answer: आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात
Question : 3
केवलप्रयोगी अव्ययाविषयी विचार करा
1. केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरवतात
2. केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही बरोबर
▪️ 1 आणि 2 दोन्ही चूक
Correct Answer: फक्त 2 बरोबर
Question : 4
खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा
1. केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात
2. केवलप्रयोगी अव्यय भावनाप्रधान असतात
3. केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण नऊ प्रकार पडतात
4. केवलप्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसतात
▪️ केवळ 1 आणि 2 योग्य
▪️ केवळ 2 , 3 आणि 4 योग्य
▪️ केवळ 1 आणि 3 योग्य
▪️ सर्व विधाने योग्य
Correct Answer: सर्व विधाने योग्य
Question : 5
पर्यायी उत्तरांतील व्यर्थ उद्गारवाची वाक्य कोणते
▪️ माझं मन बेटे गप्प बसेना
▪️ शिव शिव हे व्हावयास नको होते
▪️ अरे, खरंच की, तू येणार होतास तर
▪️ चूप, तू बाहेर जा बरे
Correct Answer: माझं मन बेटे गप्प बसेना
Question : 6
तो म्हणे वेडा झाला - या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा
▪️ व्यर्थ उद्गारवाची अव्यय
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
Correct Answer: व्यर्थ उद्गारवाची अव्यय
Question : 7
खालीलपैकी प्रशंशा दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणती आहेत ?
▪️ अरेच्चा , अबब
▪️ शाब्बास , वाहवा
▪️ अच्छा , जीहां
▪️ इश्श , छी
Correct Answer: शाब्बास , वाहवा
Question : 8
पुढील केवलप्रयोगी अव्ययाची चुकीची जोडी ओळखा
▪️ मौनदर्शक - गप
▪️ संबोधनदर्शक - अगे
▪️ आश्चर्यकारक - अरेच्चा
▪️ प्रशंसादर्शक - बापरे
Correct Answer: प्रशंसादर्शक - बापरे
Question : 9
आपला , बापडा , बेटे , वेडे , म्हणे - ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत
▪️ व्यर्थ उद्गारवाची अव्यय
▪️ शब्दयोग्य अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
Correct Answer: व्यर्थ उद्गारवाची अव्यय
Question : 10
केवलप्रयोगी अव्ययाच्या पुढे कोणते चिन्ह वापरले जाते ?
▪️ स्वल्पविराम (,)
▪️ प्रश्नचिन्ह (?)
▪️ पूर्णविराम (.)
▪️ उद्गारवाचक चिन्ह (!)
Correct Answer: उद्गारवाचक चिन्ह (!)
Question : 11
खालीलपैकी कोणते अव्यय संबोधन दर्शवते ?
▪️ अरेरे
▪️ अहो
▪️ शी
▪️ ठीक
Correct Answer: अहो
Question : 12
अहाहा , आ-हा , वा-वा , ओ-हो - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Correct Answer: हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Question : 13
केवलप्रयोगी अव्यये वाक्यातील इतर शब्दांशी -----------------
▪️ त्यांचे क्रियापद म्हणून कार्य करतात
▪️ संबंधित असतात
▪️ संबंधित नसतात
▪️ त्यांना नाम म्हणून जोडतात
Correct Answer: संबंधित नसतात
Question : 14
हायहाय , आई गं , अगाई , अरेरे - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Correct Answer: शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Question : 15
केवलप्रयोगी अव्यये वाक्यात कोठे येतात ?
▪️ वाक्याच्या शेवटी
▪️ वाक्याच्या मध्ये
▪️ वाक्याच्या सुरुवातीला
▪️ कर्त्याच्या नंतर
Correct Answer: वाक्याच्या सुरुवातीला
Question : 16
अरे ! या केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग खालीलपैकी कोणत्या दोन प्रकारांसाठी होतो ?
▪️ हर्षदर्शक, शोकदर्शक
▪️ संमतीदर्शक, प्रशंसादर्शक
▪️ शोकदर्शक, संबोधनदर्शक
▪️ तिरस्कारदर्शक, मौनदर्शक
Correct Answer: शोकदर्शक, संबोधनदर्शक
Question : 17
खालीलपैकी केवलप्रयोगी अव्यय नसलेला शब्द ओळखा
▪️ अरे
▪️ वा वा
▪️ आणि
▪️ बापरे
Correct Answer: आणि
Question : 18
बापरे ! हे केवलप्रयोगी अव्यय कोणत्या भावनेचे सूचक आहे ?
▪️ हर्षदर्शक
▪️ संबोधनदर्शक
▪️ तिरस्कारदर्शक
▪️ आश्चर्य/भयदर्शक
Correct Answer: आश्चर्य/भयदर्शक
Question : 19
शोकदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे ?
▪️ भले
▪️ हाय!
▪️ शाब्बास
▪️ छे!
Correct Answer: हाय!
Question : 20
ऑ , अबब , बाप रे , अरेच्चा - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ मौनदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Correct Answer: आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Question : 21
अरे व्वा ! या उद्गारातून प्रामुख्याने कोणती भावना व्यक्त होते ?
▪️ संमती
▪️ तिरस्कार
▪️ हर्ष (आनंद)
▪️ विरोध
Correct Answer: हर्ष (आनंद)
Question : 22
खालीलपैकी कोणता केवळप्रयोगी अव्ययाचा प्रकार नाही ?
▪️ संबोधनदर्शक
▪️ कालदर्शक
▪️ प्रशंसादर्शक
▪️ विरोधदर्शक
Correct Answer: कालदर्शक
Question : 23
एखाद्या व्यक्तीला हाक मारताना किंवा लक्ष वेधून घेताना कोणते केवलप्रयोगी अव्यय वापरले जाते ? योग्य पर्याय निवडा
▪️ शी
▪️ अरे!
▪️ छान
▪️ छे!
Correct Answer: अरे!
Question : 24
छान , वाहवा , भले , शाब्बास - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
Correct Answer: प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
Question : 25
शाबास ! तू खूपच छान काम केलेस - या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय कोणता भाव दर्शवते ?
▪️ संमती
▪️ प्रशंसा
▪️ आश्चर्य
▪️ विरोध
Correct Answer: प्रशंसा

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post