समास व समासाचे प्रकार - मराठी व्याकरण | Samas Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 4

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
दोन किंवा अधिक शब्द जोडून एक जोडशब्द तयार करण्याच्या प्रक्रियेला ---------------- म्हणतात
▪️ संधी
▪️ प्रयोग
▪️ समास
▪️ अलंकार
Correct Answer: समास
Question : 2
ज्या समासात पूर्वपद प्रधान / महत्वाचे असते,तो समास कोणता
▪️ तत्पुरुष समास
▪️ द्वंद्व समास
▪️ अव्ययीभाव समास
▪️ बहुव्रीहि समास
Correct Answer: अव्ययीभाव समास
Question : 3
इतरेतर द्वंद्व समासाविषयी योग्य विधाने ओळखा
1. या समासाचा विग्रह करताना 'आणि', 'व' या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो
2. या समासातून तयार होणारे सामासिक पद नेहमी अनेकवचनी असतात
3. नवरा-बायको हे या समासाचे उदाहरण आहे
▪️ केवळ 1 आणि 2
▪️ केवळ 2 आणि 3
▪️ केवळ 1 आणि 3
▪️ सर्व
Correct Answer: सर्व
इतरेतर द्वंद्व समासात दोन्ही पदे महत्त्वाची असून ती 'आणि' किंवा 'व' ने जोडली जातात. 'आईवडील', 'नवरा-बायको' यांसारखी उदाहरणे अनेकवचनी असतात
Question : 4
वनभोजन या सामासिक शब्दाचा समास प्रकार ओळखा
▪️ अव्ययीभाव समास
▪️ तत्पुरुष समास (वनात भोजन)
▪️ द्वंद्व समास
▪️ बहुव्रीहि समास
Correct Answer: तत्पुरुष समास (वनात भोजन)
Question : 5
'प्रतिदिन' या शब्दाचा समास प्रकार कोणता ?
▪️ अव्ययीभाव समास
▪️ तत्पुरुष समास
▪️ द्वंद्व समास
▪️ बहुव्रीहि समास
Correct Answer: अव्ययीभाव समास
Question : 6
समाहार द्वंद्व समासाविषयी योग्य विधाने ओळखा
1. या समासाचा विग्रह करताना 'वगैरे', 'इत्यादी' या शब्दांचा उपयोग होतो
2. या समासातून तयार होणारा सामासिक शब्द नेहमी अनेकवचनी असतो
3. 'चहापाणी' हे या समासाचे उदाहरण आहे
▪️ फक्त 2
▪️ फक्त 1 आणि 3
▪️ फक्त 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
समाहार द्वंद्व समासात दोन शब्दांसोबत त्याच प्रकारच्या इतर गोष्टींचाही समावेश केला जातो. त्यामुळे विग्रहात 'वगैरे', 'इत्यादी' असे शब्द येतात .
'चहापाणी' म्हणजे 'चहा, पाणी आणि इतर आदरातिथ्याच्या वस्तू
Question : 7
'धर्मग्रंथ' या शब्दाचा समास प्रकार ओळखा
▪️ कर्मधारय
▪️ षष्ठी तत्पुरुष
▪️ पंचमी तत्पुरुष
▪️ द्वंद्व समास
Correct Answer: षष्ठी तत्पुरुष
Question : 8
'पक्षी' हा शब्द कोणत्या तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे ?
▪️ नञ् तत्पुरुष
▪️ उपपद तत्पुरुष
▪️ षष्ठी तत्पुरुष
▪️ अलुक् तत्पुरुष
Correct Answer: उपपद तत्पुरुष
Question : 9
'आजी-आजोबा' हे कोणत्या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे ?
▪️ वैकल्पिक द्वंद्व
▪️ इतरेतर द्वंद्व
▪️ समाहार द्वंद्व
▪️ कर्मधारय
Correct Answer: इतरेतर द्वंद्व
Question : 10
'गावोगाव' या अव्ययीभाव समासात कोणत्या शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे ?
▪️ नाम
▪️ क्रियापद
▪️ विशेषण
▪️ क्रियाविशेषण
Correct Answer: नाम
Question : 11
वैकल्पिक द्वंद्व समासाविषयी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा
1. या समासाचा विग्रह करताना 'किंवा', 'अथवा' , 'वा' यांसारख्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग होतो
2. या समासातील दोन्ही पदे परस्परविरोधी किंवा विरुद्धार्थी असतात
3. 'पाप-पुण्य' हे या समासाचे उदाहरण आहे
▪️ केवळ 1
▪️ केवळ 2 आणि 3
▪️ केवळ 3
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
वैकल्पिक द्वंद्व समासात दोन पर्यायांपैकी एकाची निवड दर्शवली जाते. त्यामुळे विग्रहात 'किंवा' , 'अथवा' , 'वा' अव्यय वापरले जाते.
यातील पदे बहुधा विरुद्धार्थी असतात, जसे पाप आणि पुण्य, न्याय किंवा अन्याय
Question : 12
ज्या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात, तो समास कोणता ?
▪️ अव्ययीभाव
▪️ तत्पुरुष
▪️ द्वंद्व
▪️ बहुव्रीहि
Correct Answer: द्वंद्व
Question : 13
ज्या समासात पहिले किंवा दुसरे कोणतेच पद महत्त्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तो समास कोणता ?
▪️ कर्मधारय
▪️ द्विगु
▪️ द्वंद्व
▪️ बहुव्रीहि
Correct Answer: बहुव्रीहि
Question : 14
'तोंडपाठ' हा कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाचा प्रकार आहे ?
▪️ चतुर्थी तत्पुरुष
▪️ पंचमी तत्पुरुष
▪️ तृतीया तत्पुरुष
▪️ षष्ठी तत्पुरुष
Correct Answer: तृतीया तत्पुरुष
Question : 15
चहापाणी हे कोणत्या द्वंद्व समासाचे उदाहरण आहे ?
▪️ इतरेतर द्वंद्व
▪️ वैकल्पिक द्वंद्व
▪️ समाहार द्वंद्व
▪️ अव्ययीभाव
Correct Answer: समाहार द्वंद्व
Question : 16
इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे द्वंद्व समासाचे उपप्रकार कोणत्या आधारावर ठरवले जातात
▪️ सामासिक शब्दातील पदांच्या संख्येनुसार
▪️ सामासिक शब्दाच्या लिंगानुसार
▪️ विग्रहात वापरलेल्या उभयान्वयी अव्ययांनुसार‌
▪️ यापैकी नाही
Correct Answer: विग्रहात वापरलेल्या उभयान्वयी अव्ययांनुसार‌
Question : 17
ज्या समासाचा विग्रह करताना 'किंवा' या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो, तो समास कोणता ?
▪️ समाहार द्वंद्व समास
▪️ वैकल्पिक द्वंद्व समास
▪️ इतरेतर द्वंद्व समास
▪️ अव्ययीभाव समास
Correct Answer: वैकल्पिक द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समासात दोन पर्यायांपैकी एकाची निवड अपेक्षित असते, त्यामुळे त्याचा विग्रह 'किंवा' किंवा 'अथवा' या अव्ययांनी केला जातो
Question : 18
ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण असते आणि त्यातून समूहाचा बोध होतो, तो समास कोणता ?
▪️ कर्मधारय समास
▪️ द्विगु समास
▪️ उपपद तत्पुरुष
▪️ नञ् तत्पुरुष
Correct Answer: द्विगु समास
Question : 19
खालीलपैकी योग्य विधान/ने असलेला पर्याय ओळखा
1. 'गजानन' हे समानाधिकरण बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे
2. 'दशमुख' या शब्दाचा विग्रह 'दहा आहेत मुखे ज्याला तो' असा होतो
3. समानाधिकरण बहुव्रीही समासात पहिले पद विशेषण व दुसरे पद नाम असते
▪️ 1 आणि 2
▪️ 2 आणि 3
▪️ फक्त 1
▪️ फक्त 4
Correct Answer: फक्त 4
गजानन' हे समानाधिकरण बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे . हे विधान अयोग्य आहे ; कारण - 'गजानन' या शब्दाचा विग्रह 'गजाचे आहे आनन ज्याला तो' असा होतो.
यामध्ये 'गजाचे' हे षष्ठी विभक्तीचे रूप आहे, तर 'आनन' हे प्रथमा विभक्तीत आहे.
जेव्हा दोन्ही पदे वेगवेगळ्या विभक्तीत असतात, तेव्हा तो व्याधिकरण बहुव्रीही समास असतो, समानाधिकरण नाही
Question : 20
आई-वडील या सामासिक शब्दाचा विग्रह करताना कोणते उभयान्वयी अव्यय वापरतात ?
▪️ व किंवा आणि
▪️ किंवा
▪️ अथवा
▪️ वा
Correct Answer: व किंवा आणि
Question : 21
त्रिभुवन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
▪️ कर्मधारय
▪️ द्विगु
▪️ द्वंद्व
▪️ बहुव्रीहि
Correct Answer: द्विगु
Question : 22
द्वंद्व समासात पदे जोडताना कोणत्या प्रकारचे अव्यय वापरले जाते ?
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
▪️ केवलप्रयोगी अव्यय
Correct Answer: उभयान्वयी अव्यय
द्वंद्व समासात दोन्ही पदे 'आणि', 'किंवा', 'अथवा', 'व' यांसारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात
Question : 23
बहुव्रीही समासाविषयी खालील विधानांचा विचार करा . व योग्य विधान/ ने असलेला पर्याय निवडा
1. या समासात दोन्ही पदे गौण असतात
2. या समासातून तयार होणाऱ्या सामासिक शब्दातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो
3. हा समास विग्रह करताना 'जो', 'जी', 'जे', 'तो', 'ती', 'ते', 'ज्याला', 'ज्याचे' यांसारख्या शब्दांचा वापर होतो
▪️ केवळ 1 आणि 2
▪️ केवळ 2
▪️ केवळ 1
▪️ सर्व विधाने योग्य
Correct Answer: सर्व विधाने योग्य
बहुव्रीही समासाचे हे मुख्य वैशिष्ट्य आहे. यात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच गोष्टीचा अर्थ व्यक्त होतो आणि विग्रहासाठी विशिष्ट सर्वनामांचा वापर केला जातो
Question : 24
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत (प्रथमा विभक्ती) असतात, तो समास कोणता ?
▪️ द्विगु समास
▪️ उपपद तत्पुरुष
▪️ कर्मधारय समास
▪️ नञ् तत्पुरुष
Correct Answer: कर्मधारय समास
Question : 25
खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
1. 'नीलकंठ' हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे
2. 'नीलकंठ' या शब्दाचा विग्रह 'निळा आहे कंठ ज्याचा तो' असा होतो
3. या उदाहरणातून 'शंकर' या तिसऱ्या पदाचा बोध होतो
▪️ फक्त 1
▪️ फक्त 2 आणि 3
▪️ फक्त 1 आणि 3
▪️ सर्व विधाने योग्य
Correct Answer: सर्व विधाने योग्य
नीलकंठ हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे, कारण 'निळा' आणि 'कंठ' या दोन्ही पदांपेक्षा 'शंकर' या तिसऱ्याच व्यक्तीचा बोध होतो. दिलेली विग्रहाची पद्धतही योग्य आहे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post