अलंकारिक शब्द मराठी व्याकरण प्रश्न | Alankarik Shabd Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 1


📋 अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ : सराव प्रश्नसंच - एकूण २५ प्रश्न

हा प्रश्नसंच काळजीपूर्वक सोडवा आणि तुमच्या अलंकारिक शब्दांच्या ज्ञानाची परीक्षा घ्या. हे केवळ सराव प्रश्न आहेत; प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे

🗒️ सूचना : खालील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या अलंकारिक शब्दाचा अर्थ किंवा योग्य वापर ओळखण्यासाठी चार पर्याय दिले आहेत. सर्वात अचूक व योग्य उत्तराची निवड करा.

🎯 तुमचा स्कोअर

तुमचे एकूण गुण : २५ पैकी ________
तुम्ही किती गुण मिळवले, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा! तुमचा स्कोअर पाहून, तुमच्या तयारीचा नेमका अंदाज येईल आणि त्यानुसार आम्हाला पुढील भागांमध्ये आणखी उपयुक्त प्रश्नसंच तयार करता येतील

🔂 हा प्रश्नसंच तुमच्या मित्रांना आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा


Practice Questions

अलंकारिक शब्द मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
उंबराचे फूल - या अलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा
▪️ वारंवार भेटणारी व्यक्ती
▪️ सहज उपलब्ध होणारी वस्तू
▪️ कधीही न दिसणारी दुर्मिळ गोष्ट
▪️ नित्य नियमाने घडणारी घटना
Correct Answer: कधीही न दिसणारी दुर्मिळ गोष्ट
Question : 2
अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा
गट - अ
अ) एरंडाचे गुऱ्हाळ
ब) झाकले माणिक
क) जमदग्नी
ड) गुळाचा गणपती
गट - ब
1) साधा पण गुणी मनुष्य
2) खूप रागीट माणूस
3) कंटाळवाणे भाषण करणारा
4) मंद बुद्धीचा
▪️ अ - 4, ब - 3, क - 1, ड - 2
▪️ अ - 3, ब - 1, क - 2, ड - 4
▪️ अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
▪️ अ - 1, ब - 4, क - 3, ड - 2
Correct Answer: अ - 3, ब - 1, क - 2, ड - 4
Question : 3
अक्षरशत्रू - या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ ओळखा
▪️ हुशार व्यक्ती
▪️ निरक्षर माणूस
▪️ मूर्ख व्यक्ती
▪️ शत्रूचा मित्र
Correct Answer: निरक्षर माणूस
Question : 4
अकरावा रुद्र - - - - - - - -
▪️ खूप शांत व्यक्ती
▪️ दयाळू व्यक्ती
▪️ खूप रागीट व तापट माणूस
▪️ खूप सज्जन व्यक्ती
Correct Answer: खूप रागीट व तापट माणूस
Question : 5
अडवा विंचू म्हणजे - - - - - - -
▪️ अडवणूक करणारी व्यक्ती
▪️ सापासारखी व्यक्ती
▪️ मदत करणारी व्यक्ती
▪️ खूप हुशार व्यक्ती
Correct Answer: अडवणूक करणारी व्यक्ती
Question : 6
योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा - 'अरण्यरुदन'
▪️ जंगलातील रडणे
▪️ निरर्थक प्रयत्न
▪️ मदतीची याचना
▪️ डोंगरातील दु:ख
Correct Answer: निरर्थक प्रयत्न
Question : 7
'अंडी उबविणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा
▪️ निष्फळ काम करणे
▪️ खूप मेहनत करणे
▪️ अंडी साठवणे
▪️ दुसऱ्यांना मदत करणे
Correct Answer: निष्फळ काम करणे
Question : 8
'अर्धचंद्र देणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा
▪️ अर्धा चंद्र देणे
▪️ गचांडी देणे
▪️ अर्धी वस्तू देणे
▪️ मदत करणे
Correct Answer: गचांडी देणे
Question : 9
'इडापिडा टळणे' या शब्दांसाठी योग्य पर्याय निवडा
▪️ संकट टळणे
▪️ इच्छा पूर्ण होणे
▪️ खूप आनंद होणे
▪️ दु:ख कमी होणे
Correct Answer: संकट टळणे
Question : 10
'उजव्या सोंडेचा गणपती' म्हणजे - - - - - - - -
▪️ खूप हुशार व्यक्ती
▪️ खूप सज्जन व्यक्ती
▪️ चांगली व्यक्ती
▪️ हट्टी व अडेल व्यक्ती
Correct Answer: हट्टी व अडेल व्यक्ती
Question : 11
'उचलबांगडी करणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा
▪️ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे
▪️ उचलून नेणे
▪️ अचानकपणे काढून टाकणे
▪️ खूप कष्ट करणे
Correct Answer: अचानकपणे काढून टाकणे
Question : 12
'कळसूत्री बाहुली' - - - - - - - -
▪️ नाचणारी व्यक्ती
▪️ दुसऱ्याच्या इच्छेनुसार वागणारी व्यक्ती
▪️ बाहुल्या गोळा करणारी व्यक्ती
▪️ खूप बोलणारी व्यक्ती
Correct Answer: दुसऱ्याच्या इच्छेनुसार वागणारी व्यक्ती
Question : 13
'कर्णाचा अवतार' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा
▪️ खूप मोठा योद्धा
▪️ दानशूर व्यक्ती
▪️ खूप लबाड माणूस
▪️ शत्रू
Correct Answer: दानशूर व्यक्ती
Question : 14
'कळीचा नारद' या शब्दाचा योग्य अर्थ काय ?
▪️ भांडणे लावणारी व्यक्ती
▪️ शांत स्वभाव असलेली व्यक्ती
▪️ नारदाचा भक्त
▪️ खूप ज्ञानी व्यक्ती
Correct Answer: भांडणे लावणारी व्यक्ती
Question : 15
'खापर फोडणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
▪️ भांडे फोडणे
▪️ खापर खाणे
▪️ दुसऱ्याला दोष देणे
▪️ मदत करणे
Correct Answer: दुसऱ्याला दोष देणे
Question : 16
'गरिब गाय' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा
▪️ गरीब व्यक्ती
▪️ गरीब घरात वाढलेली गाय
▪️ ढोंगी मनुष्य
▪️ सरळ व्यक्ती
Correct Answer: ढोंगी मनुष्य
Question : 17
'गाजर पारखी' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा
▪️ गाजराची पारख करणारा
▪️ गाजर विकणारा
▪️ चांगल्या गोष्टींची पारख नसणारा
▪️ निरर्थक काम करणारा
Correct Answer: चांगल्या गोष्टींची पारख नसणारा
Question : 18
'चोरावर मोर' या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा
▪️ चोराला पकडणारा
▪️ एकावर मात करणारा
▪️ दुसऱ्याला मदत करणारा
▪️ खूप हुशार माणूस
Correct Answer: एकावर मात करणारा
Question : 19
अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा
गट - अ
अ) घरकोंबडा
ब) बोकेसंन्याशी
क) खुशालचेंडू
ड) पाताळयंत्री
गट - ब
1) ढोंगी मनुष्य
2) चैनखोर माणूस
3) घराबाहेर न पडणारा
4) कारस्थान करणारा
▪️ अ - 4, ब - 3, क - 1, ड - 2
▪️ अ - 3, ब - 1, क - 2, ड - 4
▪️ अ - 2, ब - 3, क - 4, ड - 1
▪️ अ - 1, ब - 4, क - 3, ड - 2
Correct Answer: अ - 3, ब - 1, क - 2, ड - 4
Question : 20
अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
▪️ मारुतीची शेपूट - लांबत जाणारे काम
▪️ बिनभाड्याचे घर - तुरुंग
▪️ अष्टपैलू - सर्वगुणसंपन्न
▪️ मायेचा पूत - चैनखोर माणूस
Correct Answer: मायेचा पूत - चैनखोर माणूस
Question : 21
'शब्दांचे बुडबुडे' या अलंकारिक शब्दाचा नेमका अर्थ काय आहे ?
▪️ विचारांची स्पष्टता
▪️ महत्त्वाचे बोलणे
▪️ वायफळ बडबड
▪️ शांत राहणे
Correct Answer: वायफळ बडबड
Question : 22
'खडाष्टक' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे ?
▪️ खूप मोठे भांडण किंवा तीव्र वैर
▪️ खूप घट्ट मैत्री
▪️ मोठा उत्सव
▪️ नवीन सुरुवात
Correct Answer: खूप मोठे भांडण किंवा तीव्र वैर
Question : 23
'कर्णाचा अवतार' या शब्दाने कोणत्या व्यक्तीचे वर्णन केले जाते ?
▪️ खूप कंजूष व्यक्ती
▪️ अतिशय धूर्त व्यक्ती
▪️ खूप दानशूर व्यक्ती
▪️ कोणाचाही आदर न करणारा
Correct Answer: खूप दानशूर व्यक्ती
Question : 24
'कचखाऊ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा
▪️ धाडसी व शूर
▪️ लगेच हार मानणारा, भित्रा
▪️ खूप आळशी
▪️ स्वतःचा फायदा करून घेणारा
Correct Answer: लगेच हार मानणारा, भित्रा
Question : 25
'शुक्राचार्य' या अलंकारिक शब्दातून कोणता अर्थ सूचित होतो ?
▪️ नेहमी योग्य सल्ला देणारा
▪️ चुकीचा, वाईट सल्ला देणारा
▪️ अत्यंत धार्मिक माणूस
▪️ ज्योतिष सांगणारा
Correct Answer: चुकीचा, वाईट सल्ला देणारा

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /


✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post