वाक्याचे प्रकार - मराठी व्याकरण | Vakyanche Prakar Marathi Grammar Questions | उदाहरणे व सराव प्रश्नसंच - 3

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास --------------- म्हणतात
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ विध्यर्थी वाक्य
▪️ गौण वाक्य
▪️ केवल वाक्य
Correct Answer: केवल वाक्य
ज्या वाक्यात एकच उद्देश्य आणि एकच विधेय असते, त्याला केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणतात
स्पष्टीकरण :
1) उद्देश्य म्हणजे काय ? वाक्यात ज्याबद्दल काही सांगितले जाते ती व्यक्ती, वस्तू, प्राणी, स्थान म्हणजे उद्देश्य
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे राम हा उद्देश्य आहे कारण त्याच्याबद्दल काही सांगितले आहे
2) विधेय म्हणजे काय ?
वाक्यात उद्देश्याबद्दल काय सांगितले आहे, त्याला विधेय म्हणतात .
उदा. राम रोज क्रिकेट खेळतो
इथे रोज क्रिकेट खेळतो हे विधेय आहे कारण राम काय करतो हे सांगितले आहे
Question : 2
खाली दिलेल्या पर्यायातील बरोबर विधान असलेला पर्याय निवडा
▪️ अर्थानुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य
▪️ रचनेनुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य
▪️ आशयानुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य
▪️ भावार्थानुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य
Correct Answer: रचनेनुसार होणारा वाक्याचा प्रकार म्हणजे केवल वाक्य
Question : 3
खालील पर्यायी उत्तरातून केवल वाक्य कोणते ते सांगा
▪️ तो जोराने धावत होता आणि धावता - धावता तो पडला
▪️ तो चोराने धावत होता म्हणून तो पडला
▪️ तो जोराने धावत असताना पडला
▪️ तो जोराने धावत होता . तो पडला
Correct Answer: तो जोराने धावत असताना पडला
Question : 4
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा - दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली
▪️ केवल वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ मिश्र वाक्य
▪️ विधानार्थी वाक्य
Correct Answer: केवल वाक्य
Question : 5
पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा - व्यायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
Correct Answer: केवल वाक्य
Question : 6
केवल वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे ----
▪️ त्यात एकच उद्देश व दोन विधेय असतात
▪️ त्यात एकच उद्देश असते
▪️ त्यात दोन उद्देश व दोन विधेय असतात
▪️ त्यात एकच उद्देश व एकच विधेय असते
Correct Answer: त्यात एकच उद्देश व एकच विधेय असते
Question : 7
आम्ही जातो आमुच्या गावा - या वाक्याचा प्रकार कोणता
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
Correct Answer: केवल वाक्य
Question : 8
शेजारचे घर पावसाळ्यात गळते . या वाक्याचा प्रकार ओळखा
▪️ अज्ञार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ विधानार्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
Correct Answer: केवल वाक्य
Question : 9
जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययांनी जोडली तर ----------- वाक्य तयार होते
▪️ मिश्र वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ केवल वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
Correct Answer: संयुक्त वाक्य
Question : 10
पुढील वाक्य वाचा
1. संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्य एकत्र जोडलेली असतात
2. मिश्र वाक्यात प्रधान वाक्यावर गौण वाक्य अवलंबून असते
3. तुला कांदा आवडतो तर लसुन का आवडू नये हे संयुक्त वाक्याचे उदाहरण आहे
▪️ फक्त 1 चूक
▪️ 1 आणि 2 चूक
▪️ फक्त 3 चूक
▪️ 1 , 2 आणि 3 चूक
Correct Answer: फक्त 3 चूक
विधान - 1 बरोबर आहे . कारण -
संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवल वाक्ये किंवा प्रधान वाक्ये समान पातळीवर (अर्थासाठी एकमेकांवर अवलंबून नसलेली) असतात .
ही वाक्ये समानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. आणि, व, अन, किंवा, अथवा, पण, परंतु, म्हणून इ.) जोडलेली असतात .
उदाहरण : "त्याने अभ्यास केला आणि तो पास झाला." ( येथे दोन्ही वाक्ये स्वतंत्र आहेत )
विधान - 2 बरोबर आहे . कारण -
मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य (मुख्य अर्थ व्यक्त करणारे) आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य असते.
ही वाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडलेली असतात.
उदाहरण : "जर पाऊस आला, तर मी शाळेत जाणार नाही." ( येथे 'मी शाळेत जाणार नाही' हे प्रधान वाक्य 'जर पाऊस आला' या गौण वाक्यावर अवलंबून आहे )
विधान - 3 चूक आहे . कारण -
'तुला कांदा आवडतो तर लसूण का आवडू नये' हे वाक्य मिश्र वाक्य आहे.
या वाक्यात 'तर' या गौणत्वसूचक अव्ययाचा वापर केला गेला आहे. हे वाक्य एका विशिष्ट अटीवर किंवा तुलनेवर आधारित आहे, त्यामुळे ते मिश्र वाक्याचा प्रकार आहे.
'तर' हे उद्देश/परिणाम किंवा शर्त दर्शवते
Question : 11
संयुक्त वाक्यातील पोटवाक्य प्रधान वाक्याशी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात,उभयान्वयी अव्यय वेगळी केली की,सर्व पोटवाक्ये केवल वाक्ये राहतात . हे विधान ---
▪️ चूक आहे
▪️ बरोबर आहे
▪️ पूर्वार्ध चूक आहे
▪️ उत्तरार्ध चूक आहे
Correct Answer: बरोबर आहे
Question : 12
दोन केवल वाक्ये जेव्हा प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अशा जोड वाक्यास काय म्हणतात
▪️ नकारार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ मिश्र वाक्य
Correct Answer: संयुक्त वाक्य
Question : 13
पुढे दिलेल्या दोन वाक्यापासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा
1. उन्हाळा वाढत होता
2. पाऊस पडत नव्हता
▪️ उन्हाळा वाढल्यामुळे पाऊस पडत नव्हता
▪️ पाऊस पडत नसल्यामुळे उन्हाळा वाढत होता
▪️ उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नाही
▪️ उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता
Correct Answer: उन्हाळा वाढत होता आणि पाऊस पडत नव्हता
Question : 14
तो आजारी होता म्हणून तो शाळेत गैरहजर राहिला - या वाक्यातील प्रकार ओळखा
▪️ संयुक्त वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ मिश्र वाक्य
▪️ केवल वाक्य
Correct Answer: संयुक्त वाक्य
Question : 15
तो पडला आणि रडू लागला - दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
▪️ प्रधान वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
Correct Answer: 3
Question : 16
पुढे दिलेल्या दोन वाक्यापासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा
1. गीताने कबूतरे मोजून पाहिली
2. ती पंधराच होती
▪️ गीताने कबुतरे मोजली ती पंधरा होती
▪️ गीताने कबुतरे मोजली तेव्हा ती पंधरा होती
▪️ गीताने पंधरा कबुतरे मोजली
▪️ गीताने कबूतरे मोजली पण ती पंधराच होती
Correct Answer: गीताने कबूतरे मोजली पण ती पंधराच होती
Question : 17
पुढील विधान वाचा -
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात;तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्रवाक्य असतात
▪️ पूर्वार्ध बरोबर आहे
▪️ उत्तरार्ध बरोबर आहे
▪️ संपूर्ण विधान चूकीचे आहे
▪️ संपूर्ण विधान बरोबर आहे
Correct Answer: संपूर्ण विधान बरोबर आहे
Question : 18
पुढील विधाने वाचा
1. मिश्र वाक्यात एक मुख्य उद्देश व एक मुख्य विधेय असते
2. मिश्र वाक्यातील गौण वाक्य स्वतंत्र असते
3. मिश्र वाक्यात दोन किंवा अधिक क्रियापदे असतात
4. मिश्र वाक्यात क्रियापद नसते
▪️ 1 आणि 2 बरोबर
▪️ 1 , 2 आणि 4 बरोबर
▪️ फक्त 3 बरोबर
▪️ 1 आणि 3 बरोबर
Correct Answer: अ आणि क बरोबर
👉 विधान अ आणि क बरोबर आहे
स्पष्टीकरण :
मिश्र वाक्य (Complex Sentence) हे एक प्रधान वाक्य (मुख्य वाक्य) आणि त्यावर अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य (उपवाक्य) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी (उदा. जर-तर, जेव्हा-तेव्हा, कारण, म्हणून, की, जो-तो इ.) जोडून तयार होते.
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ बरोबर आहे . कारण -
जरी मिश्र वाक्यात एकापेक्षा जास्त उपवाक्ये (गौण वाक्ये) असली तरी, संपूर्ण वाक्य हे एकाच विधानाचा अर्थ व्यक्त करत असते .
त्यातील प्रधान वाक्य हेच त्या संपूर्ण वाक्याचे मुख्य उद्देश (कर्ता) आणि मुख्य विधेय (क्रिया) दर्शवते.
मिश्र वाक्य हे एकच संमिश्र वाक्य मानले जाते
विधान : ब चूक आहे . कारण -
गौण वाक्य हे नेहमी प्रधान वाक्यावर अर्थासाठी अवलंबून असते. ते स्वतंत्रपणे पूर्ण अर्थ व्यक्त करू शकत नाही.
उदाहरणार्थ : "जेव्हा पाऊस सुरू झाला" (गौण वाक्य) - याचा अर्थ पूर्ण होत नाही. पूर्ण अर्थासाठी "तेव्हा तळी वाहू लागली" (प्रधान वाक्य) हे आवश्यक असते.
विधान : क बरोबर आहे . कारण -
मिश्र वाक्य किमान दोन वाक्यांनी (एक प्रधान + एक गौण) बनलेले असते आणि प्रत्येक वाक्यात एक क्रियापद असते. त्यामुळे, मिश्र वाक्यात नेहमी दोन किंवा अधिक क्रियापदे असतात.
उदाहरणार्थ : "जो मेहनत करतो, तो यश मिळवतो." ( येथे 'करतो' आणि 'मिळवतो' ही दोन क्रियापदे आहेत )
विधान : ड पूर्णपणे चूक आहे . कारण -
मिश्र वाक्ये अनेक लहान वाक्यांनी मिळून बनलेली असतात आणि प्रत्येक वाक्यात (प्रधान किंवा गौण) अर्थ पूर्ण करण्यासाठी क्रियापद असणे आवश्यक असते
Question : 19
वाक्यविचारात मिश्रवाक्य या वाक्य प्रकाराचा विचार केला जातो . यात -
1. एकच केवल वाक्य असते
2. गौण वाक्याचा मुळीच विचार केला जात नाही
3. जे-ते , जेव्हा-तेव्हा या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो
4. केवळ प्रधान वाक्यावरच भागते
▪️ 1 आणि 3 योग्य
▪️ 2 , 3 आणि 4 योग्य
▪️ फक्त 3 योग्य
▪️ वरील सर्व योग्य
Correct Answer: फक्त क
👉 विधान क बरोबर आहे
स्पष्टीकरण
मिश्र वाक्य (Complex Sentence) हे एक प्रधान वाक्य आणि त्यावर अर्थासाठी अवलंबून असलेले एक किंवा अधिक गौण वाक्य यांनी मिळून बनलेले असते. ही वाक्ये एकमेकांना गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात .
दिलेल्या विधानांचे स्पष्टीकरण :
विधान : अ चूक आहे कारण -
केवल वाक्यात (Simple Sentence) एकच उद्देश व एकच विधेय असते . मिश्र वाक्यात प्रधान वाक्य आणि किमान एक गौण वाक्य असते, त्यामुळे ते केवळ एकच केवल वाक्य नसते.
विधान : ब चूक आहे . कारण -
मिश्र वाक्याच्या रचनेत गौण वाक्य हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. गौण वाक्याशिवाय मिश्र वाक्य पूर्ण होत नाही . (उदा. कारण, जर, जेव्हा, की इ.)
विधान : क बरोबर आहे . कारण -
'जे-ते' (संबंधबोधक) आणि 'जेव्हा-तेव्हा' (कालवाचक) ही गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यये आहेत.
ही अव्यये प्रधान वाक्य आणि गौण वाक्य यांना जोडून मिश्र वाक्य तयार करतात.
उदाहरणे :
जे अभ्यास करतात, ते पास होतात. (संबंधबोधक)
जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा आम्ही निघालो. (कालवाचक)
विधान : ड चूक आहे . कारण -
केवल प्रधान वाक्याने अर्थ पूर्ण झाला तर ते केवल वाक्य (Simple Sentence) किंवा संयुक्त वाक्याचा (Compound Sentence) भाग असू शकते.
मिश्र वाक्यात अर्थाची पूर्णता आणि विशिष्ट संबंध स्पष्ट करण्यासाठी गौण वाक्याची आवश्यकता असते. केवळ प्रधान वाक्यावर मिश्र वाक्य बनत नाही
Question : 20
मिश्र वाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे मिश्रण असते
▪️ केवल वाक्य + गौण वाक्य
▪️ प्रधान वाक्य + गौण वाक्य
▪️ साधे वाक्य + गौण वाक्य
▪️ संयुक्त वाक्य + गौण वाक्य
Correct Answer: प्रधान वाक्य + गौण वाक्य
Question : 21
जर पाऊस आला तर क्रिकेटचा सामना होणार नाही - हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे
▪️ केवल वाक्य
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ मिश्र वाक्य
Correct Answer: मिश्र वाक्य
Question : 22
माझा विश्वास आहे,की मी नक्की पास होईल - ही वाक्यरचना खाली दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे
▪️ केवल वाक्य
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ मिश्र वाक्य
Correct Answer: मिश्र वाक्य
Question : 23
खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा ?
▪️ तानाजी शत्रूशी लढता लढता रणांगणातच मेला
▪️ मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी
▪️ आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो
▪️ अबब ! केवढी प्रचंड गर्दी ही !
Correct Answer: आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो
Question : 24
पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते ? योग्य पर्याय निवडा
▪️ जितके आपल्या विचारांना महत्त्व आहे, तितकेच आपल्या भावनांनाही आहे
▪️ ती इतकी रडली की तिचे डोळे सुजले
▪️ मी काल जो मुलगा पाहिला तो हा
▪️ वरील सर्व वाक्य
Correct Answer: वरील सर्व वाक्य
Question : 25
ही गोष्ट फार प्राचीन काळातील आहे - या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा
▪️ ही गोष्ट फार प्राचीन काळातील नाही
▪️ ही गोष्ट फार अलीकडची आहे
▪️ ही गोष्ट अर्वाचीन काळातील आहे
▪️ ही गोष्ट फार प्राचीन काळातील आहे
Correct Answer: ही गोष्ट अर्वाचीन काळातील आहे
Question : 26
वाक्यातील क्रियापदाचे रूप आशीर्वाद, आज्ञा, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश याविषयी अर्थबोध घडवित असेल तर अशा वाक्यांना ------- म्हणतात
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ विधानार्थी वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
Correct Answer: आज्ञार्थी वाक्य
Question : 27
कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध देणाऱ्या क्रियापदाची योजना कोणत्या प्रकारच्या वाक्यात असते
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ अज्ञार्थी वाक्य
▪️ विध्यर्थी वाक्य
▪️ विधानार्थी वाक्य
Correct Answer: विध्यर्थी वाक्य

वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात .
शक्यतो अशा वाक्यांच्या क्रियापदाला वा / वि / वे प्रत्यय असतो .
उदाहरणार्थ - मुलांनी रांगेत उभे राहावे
Question : 28
पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य ओळखा
▪️ उद्या पाऊस येईल शाळेला सुट्टी होईल
▪️ उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल
▪️ उद्या पावसामुळे शाळेला सुट्टी होईल
▪️ उद्या पाऊस आल्यामुळे शाळेला सुट्टी होईल
Correct Answer: उद्या पाऊस आला तर शाळेला सुट्टी होईल
वाक्यात अट व्यक्त केली असेल तर ते संभाव्य अथवा शर्तार्थी / संकेतार्थी वाक्य असते . ( जर-तर आर्थाने जोडलेले वाक्य संकेतार्थी वाक्य असते )
उदाहरणार्थ - पाऊस आला तर आपण बाहेर जाणार नाही
Question : 29
अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता - या वाक्याचा प्रकार कोणता
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ विद्यर्थी वाक्य
▪️ मिश्र वाक्य
Correct Answer: संकेतार्थी वाक्य
Question : 30
योग्य जोड्या जुळवा
गट - अ
अ) मी आंबा खाल्ला
ब) तुला परीक्षेत यश मिळो
क) हे काय तोच करू जाणे
ड) जर त्याने मदत केली असती तर माझे काम झाले असते
गट - ब
1) आज्ञार्थी वाक्य
2) संकेतार्थी वाक्य
3) स्वार्थी वाक्य
4) विद्यर्थी वाक्य
▪️ अ - 4 , ब - 3 , क - 1 , ड - 2
▪️ अ - 3 , ब - 1 , क - 4 , ड - 2
▪️ अ - 2 , ब - 3 , क - 4 , ड - 1
▪️ अ - 1 , ब - 4 , क - 3 , ड - 2
Correct Answer: 1

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post