आदिवासी विकास विभाग भरती 2026 | ( Group – D ) चौकीदार भरती सराव प्रश्नपत्रिका | Aadivasi Vikas Vibhag Chaukidar Bharti Question Paper
महाराष्ट्र राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत गट-ड (Group-D) चौकीदार पदासाठी एकूण 478 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे
कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ अभ्यास करणे पुरेसे नसते; तर त्या परीक्षेच्या प्रश्नांच्या स्वरूपाचा, वेळ व्यवस्थापनाचा आणि प्रश्न सोडवण्याच्या गतीचा सराव करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. याच उद्देशाने आम्ही तुमच्यासाठी विषयानुसार सराव टेस्ट खाली दिलेल्या आहेत
या सराव टेस्ट मालिकेमधील प्रत्येक विषयाच्या प्रश्नसंचामध्ये 25 निवडक प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रश्न इयत्ता 10 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असून, परीक्षेच्या स्वरूपानुसार सोपे ते मध्यम काठिण्य पातळीचे ठेवण्यात आले आहेत.
खाली चौकीदार भरती परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार विषयनिहाय लिंक्स दिल्या आहेत ⸺ लिंकवर क्लिक करा आणि सराव सुरू करा
विषयानुसार सराव पेपर सोडवा
आदिवासी विकास विभाग चौकीदार अभ्यासक्रम | Adivasi Vikas Vibhag Exam Pattern And Syllabus 2026
जर तुम्ही आदिवासी विकास विभागांतर्गत चौकीदार / Watchman / Guard या पदाची तयारी करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला Adivasi Vikas Vibhag Exam Pattern And Syllabus याची सविस्तर माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत होणाऱ्या गट-ड चौकीदार (Watchman) पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड Computer-Based Test (CBT) द्वारे केली जाते.
ही परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षेमध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातात. परीक्षेसाठी उमेदवारांना 120 मिनिटांचा कालावधी दिला जातो. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध असते
या परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या चार विषयांचा समावेश असतो . प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातात .
अंतिम गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी (Document Verification) प्रक्रिया होते .
| विषय | प्रश्नांची संख्या | एकूण गुण |
|---|---|---|
| मराठी व्याकरण | 25 | 50 |
| इंग्रजी व्याकरण | 25 | 50 |
| सामान्य ज्ञान | 25 | 50 |
| बौद्धिक चाचणी व अंकगणित | 25 | 50 |
| एकूण | 100 | 200 |
निवड प्रक्रिया | Aadivasi Vikas Vibhag Chaukidar Bharti Selection Process
या भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक असून ती संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेवर आधारित आहे
- ऑनलाईन परीक्षा : 200 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा.
- गुणवत्ता यादी : परीक्षेतील गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- किमान पात्रता गुण : अंतिम यादीत स्थान मिळवण्यासाठी किमान 45% गुण आवश्यक.
- कागदपत्र पडताळणी : पात्र उमेदवारांना मूळ कागदपत्र तपासणीसाठी बोलावले जाईल.
आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती अभ्यासक्रम | Chaukidar Bharti Detailed Syllabus
परीक्षा कोणतीही असो, तिचा अभ्यासक्रम हा यशाचा मुख्य पाया असतो. खालील विषयांचा योग्य सराव करून तुम्ही परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवू शकता.
1. मराठी व्याकरण
- मराठी व्याकरण
- नाम, सर्वनाम, क्रियापद, काळ, संधी
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाक्प्रचार
- शुद्ध-अशुद्ध शब्द
- उताऱ्यावरील प्रश्न
2. इंग्रजी व्याकरण
- Basic English Grammar
- Parts of Speech
- Tenses, Articles, Prepositions
- Vocabulary
- Idioms and Phrases
- Sentence Correction
3. सामान्य ज्ञान
- आदिवासी विकास विभागाची माहिती
- महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल
- भारताचे संविधान
- चालू घडामोडी
- सामान्य विज्ञान
4. बौद्धिक चाचणी व गणित
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
- सरासरी, टक्केवारी, नफा-तोटा
- काळ-काम-वेग
- Series, Coding-Decoding
- Blood Relation
- Direction Test
👉 पुढील सर्व सराव पेपर्सचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या ब्लॉगला Bookmark करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
© MPSC Battle ⸺ Aadivasi Vikas Vibhag | Chaukidar Bharti Question Paper
