Navodaya Online Test in Marathi 2026 | जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव चाचणी
🎯 येथे आम्ही तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण Navodaya Online Practice Test in Marathi खाली दिलेल्या आहेत
Navodaya Online Test in Marathi 2026 | जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव चाचणी
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) ही भारतातील ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे 'जवाहर नवोदय विद्यालये' चालवली जातात. इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नवोदय निवड चाचणी' (JNVST) अत्यंत स्पर्धात्मक असते
हजारो विद्यार्थ्यांमधून निवड होण्यासाठी केवळ अभ्यास असून चालत नाही, तर त्या अभ्यासाचा सराव असणे आवश्यक असते. 'सराव चाचणी' ही खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आणि त्यांच्यातील उणिवा दूर करणारी एक तालीम ठरते
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) 2026
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) ही इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी एक वस्तुनिष्ठ (Objective) स्वरूपाची परीक्षा आहे. या परीक्षेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करणे हा असतो.
नवोदय परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न मुख्यतः मानसशक्ती चाचणी (Mental Ability Test), गणितीय क्षमता (Arithmetic Test) आणि भाषिक चाचणी (Language Test) या तीन विभागांमध्ये विभागलेले असतात
नवोदय परीक्षेचे स्वरूप / Exam Pattern
नवोदय विद्यालयाचा पेपर एकूण 80 प्रश्नांचा असतो, ज्यासाठी 100 गुण निर्धारित केलेले असतात . परीक्षेसाठी एकूण 2 तास (120 मिनिटे) वेळ दिली जाते . प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 गुण दिले जातात
| अ.क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | वेळ |
|---|---|---|---|---|
| 1 | मानसिक क्षमता चाचणी | 40 | 50 | 60 मिनिटे |
| 2 | अंकगणित चाचणी | 20 | 25 | 30 मिनिटे |
| 3 | भाषा चाचणी | 20 | 25 | 30 मिनिटे |
| एकूण | 80 | 100 | 120 मिनिटे | |
2. विषयानुसार अभ्यासक्रम
अ) मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability Test)
हा विभाग विद्यार्थ्यांच्या तार्किक विचारांची परीक्षा घेतो. यात आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात
- वेगळी आकृती ओळखा
- जुळणारी आकृती शोधणे
- आकृती पूर्ण करणे
- मालिका पूर्ण करणे
- आरशातील प्रतिमा शोधणे
- कागदाची घडी घालणे व उलगडणे
ब) अंकगणित चाचणी (Arithmetic Test)
- संख्या आणि संख्या पद्धती : (संख्यांचे प्रकार, स्थानिक किंमत, दर्शनी किंमत)
- पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया : (बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार)
- अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया : (व्यवहारी आणि दशांश अपूर्णांक)
- लसावि आणि मसावि
- वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ
- दशांश अपूर्णांकांचे अंदाजीकरण
- मापन : लांबी, वस्तुमान, धारकता, वेळ आणि पैसा
- काळ, काम आणि वेग
- सरासरी
- शेकडेवारी
- नफा आणि तोटा
- सरळव्याज
- क्षेत्रफळ, परिमिती आणि घनफळ
क) भाषा चाचणी
- 4 उतारे दिले जातात
- प्रत्येक उताऱ्यावर 5 प्रश्न
- आकलनावर आधारित प्रश्न
- समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
3. महत्त्वाचे नियम
- सर्व प्रश्न MCQ प्रकारचे असतात
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1.25 गुण
- नकारात्मक गुण नाहीत
- परीक्षा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत देता येते
- OMR शीटवर निळ्या किंवा काळ्या पेनने उत्तर द्यावे
4. यशासाठी टिप्स
- सर्वात आधी मानसिक क्षमता विभाग सोडवा
- गणितासाठी सूत्रांचा नियमित सराव करा
- दररोज एक प्रश्नपत्रिका वेळ मर्यादेत सोडवा
🔂 जर तुम्हाला हा Navodaya Online Test in Marathi उपयुक्त वाटला असेल तर ही लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या मोफत सिरीजचा फायदा घेता येईल.
🌐 दररोज नवीन संच सोडवण्यासाठी आमच्या MPSC Battle ब्लॉगला नियमित भेट द्या
© MPSC Battle | Navodaya Online Test in Marathi | Navodaya Exam Question Paper 2026