Talathi Bharti Reasoning Practice Test | तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी
जर तुम्ही तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती परीक्षेची तयारी करत असाल, तर बुद्धिमत्ता चाचणी / Reasoning हा विषय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . या विषयामध्ये कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवण्याचे कौशल्य आवश्यक असते. योग्य सराव, प्रश्नांचा पॅटर्न समजून घेणे आणि नियमित Mock Test सोडवणे यामुळे तुम्ही Reasoning विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवू शकता
विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी Talathi Bharti Reasoning Practice Test Series उपलब्ध करून दिली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार विविध प्रकारच्या बुद्धिमत्ता चाचणी प्रश्नांचा सराव करता येईल
📋 प्रत्येक टेस्टमध्ये बुद्धिमत्ता चाचणी व तर्कशास्त्र या विषयावर आधारित निवडक व दर्जेदार 25 प्रश्न दिलेले आहेत, हे प्रश्न आगामी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी सराव टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
🟨
2, 6, 12, 20, 30, ------- या संख्या मालिकेतील पुढील पद कोणते येईल ?
❶ 40
❷ 42
❸ 44
❹ 46
एका सांकेतिक भाषेत "BOOK" हा शब्द "CPPL" असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत "READ" हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ SFBE
❷ SDBE
❸ TFBE
❹ SEBC
जर A ही B ची बहीण आहे, C ही B ची आई आहे, D हे C चे वडील आहेत, तर A चे D शी नाते काय असेल ?
❶ मुलगी
❷ बहीण
❸ नात
❹ आजी
एका रांगेत सुरेशचा डावीकडून 15 वा क्रमांक आणि उजवीकडून 18 वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले उभी आहेत ?
❶ 31
❷ 32
❸ 33
❹ 34
रमेश पश्चिमेकडे 10 किमी चालला, नंतर तो उजवीकडे वळून 5 किमी चालला. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून 10 किमी चालला, तर आता तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे ?
❶ 5 किमी, उत्तर
❷ 10 किमी, दक्षिण
❸ 5 किमी, पूर्व
❹ 10 किमी, उत्तर
3:30 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल ?
❶ 70°
❷ 65°
❸ 75°
❹ 80°
जर 15 ऑगस्ट 2023 रोजी मंगळवार होता, तर 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार असेल ?
❶ बुधवार
❷ गुरुवार
❸ शुक्रवार
❹ शनिवार
खालील दिलेल्या चार पर्यायांपैकी विसंगत पर्याय कोणता ?
❶ 27
❷ 64
❸ 125
❹ 144
B, E, H, K, N, ? या अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ?
❶ P
❷ Q
❸ R
❹ O
एका सांकेतिक भाषेत "CAT" = 24 आणि "DOG" = 26, तर त्याच भाषेत "PIG" साठी कोणता अंक येईल ?
❶ 31
❷ 32
❸ 33
❹ 34
शिक्षक , लेखक , संगीतकार यांच्यातील संबंध योग्यरीत्या दर्शवणारी वेन आकृती कोणती ?
❶ A
❷ B
❸ C
❹ D
विधाने : A) सर्व झाडे फुले आहेत. B) सर्व फुले फळे आहेत. निष्कर्ष : I) सर्व झाडे फळे आहेत. II) काही फळे झाडे आहेत. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा
❶ फक्त निष्कर्ष I बरोबर
❷ फक्त निष्कर्ष II बरोबर
❸ निष्कर्ष I आणि II दोन्ही बरोबर
❹ दोन्ही निष्कर्ष चूक
5, 11, 23, 47, 95, ----- या संख्या मालिकेतील पुढील संख्या शोधा
❶ 190
❷ 191
❸ 189
❹ 193
एका सांकेतिक भाषेत "123" म्हणजे "Bright Little Boy", "145" म्हणजे "Tall Big Boy" आणि "637" म्हणजे "Beautiful Little Flower" असा अर्थ होतो, तर त्याच भाषेत "Bright" साठी कोणता अंक वापरला आहे
❶ 1
❷ 2
❸ 3
❹ 4
जर एका सांकेतिक लिपीत '+' म्हणजे '×', '-' म्हणजे '÷', '×' म्हणजे '+' आणि '÷' म्हणजे '-', तर खालील समीकरणाची किंमत काय येईल : 20 + 2 - 4 × 5 ÷ 3
❶ 10
❷ 12
❸ 15
❹ 18
A, B, C, D आणि E हे पाच मित्र उत्तरेकडे तोंड करून एका बाकावर बसले आहेत. C हा मध्यभागी बसला आहे. A हा D च्या उजवीकडे आणि E हा B च्या डावीकडे आहे. जर B हा C च्या लगतच उजवीकडे बसला असेल, तर डाव्या टोकाला कोण बसले आहे ?
❶ A
❷ B
❸ D
❹ E
एका शेतात काही कोंबड्या आणि काही शेळ्या आहेत. सर्वांची मिळून एकूण डोकी 40 आहेत आणि एकूण पाय 100 आहेत, तर त्या शेतात एकूण किती कोंबड्या आहेत ?
❶ 10
❷ 20
❸ 30
❹ 15
8 : 64 :: 6 : ? या समसंबंधातील प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती येईल
❶ 36
❷ 216
❸ 30
❹ 48
एका रांगेत अनिता डावीकडून 9 व्या स्थानावर आहे आणि बबिता उजवीकडून 12 व्या स्थानावर आहे. जर त्यांनी आपापसात स्थानांची अदलाबदल केली, तर अनिता डावीकडून 22 व्या स्थानावर जाते. तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत ?
❶ 32
❷ 33
❸ 34
❹ 35
सायंकाळी 6 वाजता सूर्यास्ताच्या वेळी सुधीर उभा असताना त्याची सावली त्याच्या उजव्या हाताला पडत होती, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला होते ?
❶ पूर्व
❷ पश्चिम
❸ उत्तर
❹ दक्षिण
7, 14, 42, 168, ------ या संख्या मालिकेतील पुढचे पद कोणते येईल ?
❶ 504
❷ 840
❸ 672
❹ 720
जर एका सांकेतिक भाषेत "PENCIL" हा शब्द "NCLAHJ" असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत "ERASER" हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ CPYQCP
❷ CQYQCP
❸ COZQCP
❹ CPYPBO
विधाने : अ) काही पेन पेन्सिल आहेत. ब) काही पेन्सिल खोडरबर आहेत. निष्कर्ष : I) सर्व पेन खोडरबर आहेत. II) काही पेन खोडरबर आहेत. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे
❶ फक्त निष्कर्ष I बरोबर
❷ फक्त निष्कर्ष II बरोबर
❸ निष्कर्ष I किंवा II बरोबर
❹ दोन्ही निष्कर्ष असत्य
खालील संख्या संचातील विसंगत घटक ओळखा : 11, 13, 17, 19, 23, 27, 29, 31
❶ 23
❷ 27
❸ 29
❹ 31
1 जानेवारी 2018 रोजी सोमवार होता, तर 31 डिसेंबर 2018 रोजी कोणता वार असेल ?
❶ सोमवार
❷ मंगळवार
❸ रविवार
❹ शनिवार
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Talathi Bharti Reasoning Syllabus | तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी अभ्यासक्रम
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी विषयामध्ये खालील महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत :
अंकमालिका (Number Series)
अक्षरमालिका (Letter Series)
सांकेतिक भाषा / Coding-Decoding
समानता व संबंध (Analogy & Relationship)
वर्गीकरण (Classification / Odd One Out)
दिशा व अंतर (Direction Sense Test)
रक्तसंबंध (Blood Relation)
बसण्याची मांडणी (Seating Arrangement)
क्रम व रँकिंग (Ranking & Order)
घड्याळ व दिनदर्शिका (Clock & Calendar)
विधान व निष्कर्ष (Statement & Conclusion)
तर्कशक्ती प्रश्न (Logical Reasoning)
आरसा व पाण्यातील प्रतिमा (Mirror & Water Image)
आकृती आधारित प्रश्न (Non-Verbal Reasoning)
तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी टेस्ट सिरीज विद्यार्थ्यांना परीक्षा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. नियमित सराव केल्यास Reasoning विषयातील कठीण वाटणारे प्रश्न देखील सोपे वाटू लागतात
जर तुम्हाला Talathi Bharti Reasoning Online Test च्या माध्यमातून प्रभावी तयारी करायची असेल, तर ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल
दररोज सराव करा, स्वतःची तयारी तपासा आणि तलाठी भरती परीक्षेत यश मिळवण्यासाठी आजपासूनच सुरुवात करा
MPSC Battle - Buddhimatt Chachani Test | Talathi Bharti Reasoning Practice Test Series - 2026