समूह दर्शक शब्द मराठी व्याकरण | Samuh Darshak Shabd Marathi Grammar | प्रश्नसंच - 1

Practice Questions

समूह दर्शक शब्द मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
जसा पक्ष्यांचा थवा, तसा कागदाचा ------------
▪️ जुडगा
▪️ पुठ्ठा
▪️ गठ्ठा
▪️ संच
Correct Answer: गठ्ठा
Question : 2
खालीलपैकी योग्य समूहदर्शक जोडी ओळखा
▪️ गुरांचा - कळप
▪️ मुंग्यांची - रांग
▪️ जहाजांचा - काफिला
▪️ यापैकी सर्व
Correct Answer: यापैकी सर्व
Question : 3
जसा पक्ष्यांचा थवा, तसा गुलाबांचा -----------
▪️ घोस
▪️ ताटवा
▪️ रास
▪️ मोळी
Correct Answer: ताटवा
Question : 4
जसे शेळीचे करडू, तसे सिंहाचा ----------
▪️ बछडा
▪️ शावक
▪️ पिल्लु
▪️ छावा
Correct Answer: बछडा
Question : 5
हरिणांचा ----------- असतो
▪️ थवा
▪️ तांडा
▪️ कळप
▪️ छावा
Correct Answer: कळप
Question : 6
पिकत घातलेल्या आंब्यांची ------------
▪️ रास
▪️ थप्पी
▪️ अढी
▪️ गाथण
Correct Answer: अढी
Question : 7
समूहदर्शक शब्द लिहा - नाण्यांची -----------
▪️ थप्पी
▪️ चळत
▪️ उतरंड
▪️ चवड
Correct Answer: थप्पी
Question : 8
समूहदर्शक शब्द लिहा - आंब्यांच्या झाडांची -----------
▪️ राई
▪️ बेट
▪️ वृंद
▪️ जाळी
Correct Answer: राई
Question : 9
समूहदर्शक शब्द लिहा - करवंदाची -----------
▪️ जुडी
▪️ पेंढी
▪️ मोळी
▪️ जाळी
Correct Answer: मोळी
Question : 10
समूहदर्शक शब्द लिहा - भाकऱ्यांची -----------
▪️ जुडी
▪️ चवड
▪️ उतरंड
▪️ गाथण
Correct Answer: चवड
Question : 11
योग्य समूहदर्शक शब्द लिहा - फळांचा ---------------
▪️ घोस
▪️ ढिगारा
▪️ संच
▪️ तांडा
Correct Answer: घोस
Question : 12
समूहदर्शक शब्द लिहा - काजूंची -----------
▪️ लोंगर
▪️ रास
▪️ जुडी
▪️ गाथण
Correct Answer: गाथण
Question : 13
समूहदर्शक शब्द लिहा - साधूसंताचा -----------
▪️ काफिला
▪️ घोळका
▪️ मेळावा
▪️ जथा
Correct Answer: जथा
Question : 14
समूहदर्शक शब्द लिहा - गाय
▪️ तांडा
▪️ जमाव
▪️ कळप
▪️ ताफा
Correct Answer: कळप
Question : 15
किल्ल्यांचा जुडगा : तसा केळ्यांचा ------
▪️ झुबका
▪️ घोस
▪️ लोंगर
▪️ ढीग
Correct Answer: घोस
Question : 16
पक्षांचा थवा तसा तारकांचा ------
▪️ कळप
▪️ गट
▪️ पुंज
▪️ ढीग
Correct Answer: पुंज
Question : 17
गवताचा भारा तसा केसांचा ------
▪️ ढीग
▪️ झुबका
▪️ जुडगा
▪️ जथा
Correct Answer: झुबका
Question : 18
प्रवाशांची झुंबड तशी यात्रेकरूंची ------
▪️ घोळका
▪️ जमाव
▪️ जथा
▪️ जत्रा
Correct Answer: जथा
Question : 19
विमानांचा ताफा तसा जहाजांचा ------
▪️ काफिला
▪️ गट
▪️ थवा
▪️ तांडा
Correct Answer: काफिला
Question : 20
फुलांचा गुच्छ तसा केसांचा ------
▪️ पुंजका
▪️ ढिगारा
▪️ जुडगा
▪️ भारा
Correct Answer: पुंजका
Question : 21
मुलांचा गट तसा माणसांचा ------
▪️ जमाव
▪️ तांडा
▪️ कळप
▪️ संच
Correct Answer: जमाव
Question : 22
उसाची मोळी तशी धान्याची ------
▪️ ढिगारा
▪️ रास
▪️ जुडी
▪️ पुंजका
Correct Answer: रास
Question : 23
केळ्यांचा लोंगर : तसा द्राक्षांचा ------
▪️ ढीग
▪️ गठ्ठा
▪️ घड
▪️ जुडगा
Correct Answer: घड
Question : 24
विटांचा ढिगारा तसा पुस्तकांचा ------
▪️ जुडगा
▪️ ढीग
▪️ रास
▪️ गठ्ठा
Correct Answer: गठ्ठा
Question : 25
हरणांचा कळप तसा पक्षांचा ------
▪️ थवा
▪️ कळप
▪️ जुडगा
▪️ जमाव
Correct Answer: थवा
Question : 26
चोरांची टोळी तसा खेळाडूंचा ------
▪️ संघ
▪️ गट
▪️ जमाव
▪️ कळप
Correct Answer: संघ
Question : 27
बांबूंचे बेट तशी गवताची ------
▪️ ढिगारा
▪️ जुडगा
▪️ गंज
▪️ कडबा
Correct Answer: गंज
Question : 28
पक्ष्यांचा थवा तसा फुलझाडांचा ------
▪️ पुंजका
▪️ कुंज
▪️ ताटवा
▪️ जुडगा
Correct Answer: ताटवा
Question : 29
ऊंटाचा तांडा तसा हत्तींचा ------
▪️ जमाव
▪️ झुंबड
▪️ ताफा
▪️ कळप
Correct Answer: कळप
Question : 30
मडक्यांची उतरंड तशी पोत्यांची -----
▪️ थप्पी
▪️ उतरंड
▪️ रास
▪️ ढिगारा
Correct Answer: थप्पी

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post