नामाचा लिंगविचार मराठी व्याकरण | Namacha Ling Vichar Marathi Vyakaran | प्रश्नसंच - 1

Practice Questions

नामाचा लिंगविचार मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
मीठ भाकर या शब्दाचे लिंग ओळखा ?
▪️ स्त्रीलिंग
▪️ उभयलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुंसकलिंग
Correct Answer: स्त्रीलिंग
Question : 2
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे ?
▪️ गवळी
▪️ शिक्षिका
▪️ कुंभार
▪️ इंजिनियर
Correct Answer: इंजिनियर
Question : 3
विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
▪️ विद्वत्ता
▪️ विद्या
▪️ विद्वानीण
▪️ विदुषी
Correct Answer: विदुषी
Question : 4
मुल या शब्दाचे लिंग ओळखा ?
▪️ स्त्रीलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुसकलिंग
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 5
' पागोटे ' हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात ?
▪️ पुल्लिंग
▪️ नपुसकलिंग
▪️ स्त्रीलिंग
▪️ उभयलिंग
Correct Answer: नपुसकलिंग
Question : 6
देव , तेली , तारीख , लाडू - या शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
▪️ देव
▪️ तेली
▪️ तारीख
▪️ लाडू
Correct Answer: तारीख
Question : 7
खाली दिलेल्या पर्यायातून विरुद्ध लिंगी शब्द निवडा - मेंढी
▪️ शेळी
▪️ मेंढरी
▪️ एडका
▪️ मेंढरू
Correct Answer: एडका
Question : 8
'श्रीमान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
▪️ श्रीयुत
▪️ सौभाग्यवती
▪️ श्रीमानी
▪️ श्रीमती
Correct Answer: श्रीमती
Question : 9
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
▪️ सुसर
▪️ गरुड
▪️ साप
▪️ सुरवंट
Correct Answer: सुसर
सुसर ('ती' सुसर) हा स्त्रीलिंगी शब्द आहे. गरुड ('तो' गरुड), साप ('तो' साप), सुरवंट ('तो' सुरवंट) हे पुल्लिंगी आहेत
Question : 10
विरुद्ध लिंगी शब्द निवडा - हंस
▪️ हंसी
▪️ हंसीण
▪️ हंसा
▪️ यापैकी नाही
Correct Answer: हंसी
हंस (पुल्लिंग) या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द हंसी (स्त्रीलिंग) आहे
Question : 11
पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
▪️ नपुंसकलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ स्त्रीलिंग
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
'पोर' हा शब्द (उदा. 'तो पोर', 'ती पोर', 'ते पोर') तीनही लिंगांसाठी वापरला जातो, म्हणून तो उभयलिंगी शब्द आहे
Question : 12
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा ?
▪️ सुरवंट - स्त्रीलिंग
▪️ पोर - नपुंसक लिंग
▪️ भाटी - स्त्रीलिंग
▪️ गरुड - पुल्लिंगी
Correct Answer: सुरवंट - स्त्रीलिंग
सुरवंट ('तो' सुरवंट) हा पुल्लिंगी शब्द आहे, त्यामुळे 'सुरवंट - स्त्रीलिंग' ही जोडी अयोग्य आहे
Question : 13
'विधूर' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा ?
▪️ विधवा
▪️ विधूरी
▪️ विधाती
▪️ विधात्री
Correct Answer: विधवा
'विधूर' (ज्याची पत्नी वारली आहे) चा विरुद्धलिंगी शब्द विधवा (ज्याचा पती वारला आहे) आहे
Question : 14
'पुरणपोळी' या शब्दाचे लिंग कोणते ?
▪️ स्त्रीलिंगी
▪️ पुल्लिंगी
▪️ उभयलिंगी
▪️ नपुंसकलिंगी
Correct Answer: स्त्रीलिंगी
Question : 15
पुढील शब्दातील स्त्रीलिंगी रूप ओळखा - वाघ्या
▪️ मुरळी
▪️ वाघिन
▪️ वाघी
▪️ मुरुळी
Correct Answer: मुरळी
'वाघ्या' (खंडोबाचा पुरुष भक्त) या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मुरळी आहे
Question : 16
खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द असलेला पर्याय निवडा ?
▪️ झाड
▪️ वृक्ष
▪️ रोपटे
▪️ झाडी
Correct Answer: वृक्ष
Question : 17
'कवी' या नामाचे विरुद्धलिंगी रूप ओळखा ?
▪️ कवयित्री
▪️ कवयत्री
▪️ कवयीत्री
▪️ कवईत्री
Correct Answer: कवयित्री
'कवी' (पुल्लिंग) या शब्दाचे शुद्ध स्त्रीलिंगी रूप कवयित्री आहे
Question : 18
'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
▪️ विदुषी
▪️ विद्वानी
▪️ विद्वाती
▪️ यापैकी नाही
Correct Answer: विदुषी
'विद्वान' (पुल्लिंग) या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप विदुषी आहे
Question : 19
खाली दिलेल्या पर्यायातून 'व्याही' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा ?
▪️ व्याह्या
▪️ व्याह्यीन
▪️ विहीण
▪️ वहिनी
Correct Answer: विहीण
'व्याही' (मुलाचा/मुलीचा सासरा) या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द विहीण (मुलाची/मुलीची सासू) आहे
Question : 20
'बोका' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ? अचूक पर्याय निवडा
▪️ बोकी
▪️ बोकीन
▪️ भाटी
▪️ मांजर
Correct Answer: भाटी
'बोका' (पुल्लिंग) या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप भाटी आहे
Question : 21
विरुद्ध लिंगी शब्द निवडा - सूत
▪️ सुता
▪️ पुत्र
▪️ सुती
▪️ यापैकी नाही
Correct Answer: सुता
सूत (पुल्लिंग - मुलगा) या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द सुता (स्त्रीलिंग - मुलगी) आहे
Question : 22
योग्य पर्याय निवडा ? सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते
▪️ स्त्रीलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुंसकलिंग
▪️ उभयलिंग
Correct Answer: स्त्रीलिंग
'सुया' (अनेकवचन) या शब्दाचे एकवचनी रूप 'सुई' ('ती' सुई) आहे, जे स्त्रीलिंगी आहे
Question : 23
'ससे' या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते ?
▪️ पुल्लिंग
▪️ स्त्रीलिंग
▪️ उभयलिंग
▪️ नपुंसकलिंग
Correct Answer: पुल्लिंग
'ससे' (अनेकवचन) या शब्दाचे मूळ रूप 'ससा' ('तो' ससा) आहे, जे पुल्लिंगी आहे
Question : 24
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ?
▪️ व्याधी
▪️ सुरवंट
▪️ मोटार
▪️ ग्रंथकर्ता
Correct Answer: व्याधी
'व्याधी' हा शब्द 'तो' व्याधी (पुल्लिंग) आणि 'ती' व्याधी (स्त्रीलिंग) अशा दोन्ही प्रकारे वापरला जातो, म्हणून तो उभयलिंगी आहे
Question : 25
वानर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ?
▪️ वानरी
▪️ वानरीन
▪️ माकड
▪️ माकडीन
Correct Answer: वानरी
वानर (पुल्लिंग) या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप वानरी आहे

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post