शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण प्रश्न | Shabdyogi Avyay Marathi Grammar Question | प्रश्नसंच - 2

Practice Questions

शब्दयोगी अव्यय मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
शब्दयोगी अव्ययांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या
1. शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात
2. हे अव्यय क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात
3. त्यांचा उपयोग दोन शब्दांमधील संबंध दर्शवण्यासाठी होतो
▪️ केवळ विधान 1 आणि 2 योग्य
▪️ केवळ विधान 1 आणि 3 योग्य
▪️ केवळ विधान 2 आणि 3 योग्य
▪️ सर्व विधाने योग्य
Correct Answer: केवळ विधान 1 आणि 3 योग्य
Question : 2
शब्दयोगी अव्यय जेव्हा नामाला जोडले जाते, तेव्हा नामाच्या मूळ रूपात कोणता बदल होतो ?
▪️ कोणताही बदल होत नाही
▪️ नामाचे लिंग बदलते
▪️ नामाचे सामान्य रूप होते
▪️ नामाचे वचन बदलते
Correct Answer: नामाचे सामान्य रूप होते
Question : 3
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय 'मर्यादावाचक' संबंध दर्शवते ?
▪️ मुळे
▪️ पर्यंत
▪️ जवळ
▪️ शिवाय
Correct Answer: पर्यंत
Question : 4
तो माझ्या घरात आत बसला होता - या वाक्यातील 'आत' हे शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारचा बोध करते ?
▪️ कालवाचक
▪️ रीतिवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ हेतुवाचक
Correct Answer: स्थलवाचक
Question : 5
खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय 'विरोधवाचक' आहे ?
▪️ सारखा
▪️ विरुद्ध
▪️ सह
▪️ योगे
Correct Answer: विरुद्ध
Question : 6
शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात
▪️ नाम
▪️ क्रियापद
▪️ क्रियाविशेषण
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 7
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा ?
▪️ कुत्रासुद्धा
▪️ घराच्या बाहेर
▪️ गावोगावी
▪️ मांडवाखाली
Correct Answer: कुत्रासुद्धा
Question : 8
' दगडापरीस वीट मऊ ' अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा
▪️ योग्यतावाचक
▪️ कैवल्यवाचक
▪️ तुलनावाचक
▪️ संग्रहवाचक
Correct Answer: तुलनावाचक
Question : 9
सारखा , जोगा , योग्य , प्रमाणे , बरहुकूम , सम , समान - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ द्विकवाचक
▪️ योग्यतावाचक
▪️ कैवल्यवाचक
▪️ संग्रहवाचक
Correct Answer: योग्यतावाचक
Question : 10
पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा - सारखा
▪️ संग्रहवाचक
▪️ कालवाचक
▪️ योग्यतावाचक
▪️ हेतुवाचक
Correct Answer: योग्यतावाचक
Question : 11
शब्दयोगी अव्ययांच्या प्रकारांविषयी खालील विधाने विचारात घ्या
1. 'प्रमाणे', 'सारखा' हे शब्द योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहेत
2. 'बाहेरून', 'कडून' हे शब्द स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत
3. 'साठी', 'करिता' हे शब्द हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ केवळ विधान 1 आणि 2 योग्य आहे
▪️ केवळ विधान 1 आणि 3 योग्य आहे
▪️ केवळ विधान 2 आणि 3 योग्य आहे
▪️ सर्व विधाने योग्य आहेत
Correct Answer: सर्व विधाने योग्य आहेत
Question : 12
मला या विषया संबंधी काही शंका आहेत - या वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा संबंध कोणता ?
▪️ तुलनावाचक
▪️ कारणवाचक
▪️ संबंधवाचक
▪️ साहचर्यवाचक
Correct Answer: संबंधवाचक
Question : 13
जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येऊन वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात, त्यांना काय म्हणतात ?
▪️ क्रियापद
▪️ विशेषण
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ क्रियाविशेषण
Correct Answer: शब्दयोगी अव्यय
Question : 14
प्रत, प्रति, कडे, लागी ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ कैवल्यवाचक
▪️ विनिमयवाचक
▪️ द्विकवाचक
▪️ विरोधवाचक
Correct Answer: द्विकवाचक
Question : 15
'माझ्या करिता तू इथे थांबलास ?' या वाक्यात 'करिता' हे अव्यय कोणासाठी वापरले आहे ?
▪️ क्रियापदासाठी
▪️ काळासाठी
▪️ उद्देश/हेतूसाठी
▪️ स्थळासाठी
Correct Answer: उद्देश/हेतूसाठी
Question : 16
शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यातील फरकाबाबत खालील विधाने विचारात घ्या
1. जेव्हा शब्द स्वतंत्रपणे वापरला जातो, तेव्हा तो क्रियाविशेषण अव्यय असतो
2. जेव्हा शब्द नामाला जोडून येतो, तेव्हा तो शब्दयोगी अव्यय असतो
3. दोन्ही अव्यय वाक्यात सारखेच कार्य करतात
▪️ केवळ विधान 1 आणि 2 योग्य आहे
▪️ केवळ विधान 1 आणि 3 योग्य आहे
▪️ केवळ विधान 2 आणि 3 योग्य आहे
▪️ सर्व विधाने योग्य आहेत
Correct Answer: केवळ विधान 1 आणि 2 योग्य आहे
Question : 17
'सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतले' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा
▪️ सूर्य
▪️ पक्षी
▪️ परतले
▪️ नंतर
Correct Answer: नंतर
Question : 18
खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही
1. शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला जोडून येतात.
2. शब्दयोगी अव्यय हे क्रियापदाला जोडून येतात.
3. ‘पुढे’ हा शब्द काहीवेळा शब्दयोगी अव्यय आणि काहीवेळा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरला जातो
▪️ केवळ विधान 1 अयोग्य आहे
▪️ केवळ विधान 2 अयोग्य आहे
▪️ केवळ विधान 3 अयोग्य आहे
▪️ सर्व विधाने योग्य आहेत
Correct Answer: केवळ विधान 2 अयोग्य आहे
Question : 19
अविकारी शब्द म्हणजे काय
▪️ ज्यांच्या रूपात कोणताही बदल होत नाही असे शब्द
▪️ नाम , सर्वनाम , विशेषण व क्रियापद असलेले शब्द
▪️ वाक्यात शब्दाचे रूप बदलते असे शब्द
▪️ विकृती असलेले शब्द
Correct Answer: ज्यांच्या रूपात कोणताही बदल होत नाही असे शब्द
Question : 20
अव्ययालाच ---------- शब्द म्हणतात
▪️ विकारी शब्द
▪️ पद
▪️ अविकारी शब्द
▪️ विकृती
Correct Answer: अविकारी शब्द
Question : 21
जे शब्दयोगी अव्यये नामाला किंवा सर्वनामाला जोडल्यास त्या नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्यरूप होत नाही त्यांना ----------- म्हणतात
▪️ साधित शब्दयोगी अव्यय
▪️ शुद्ध शब्दयोगी अव्यय
▪️ धातू साधित अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
Correct Answer: शुद्ध शब्दयोगी अव्यय
Question : 22
तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ - या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ केवलप्रयोगी अव्यय
▪️ साधित शब्दयोगी अव्यय
▪️ शुद्ध शब्दयोगी अव्यय
Correct Answer: शुद्ध शब्दयोगी अव्यय
Question : 23
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत
1. स्थलवाचक 2.करणवाचक 3.हेतूवाचक 4.व्यतिरेकवाचक 5.तुलनावाचक 6.योग्यतावाचक
▪️ फक्त 1,3,6
▪️ फक्त 2,4,5,6
▪️ फक्त 1,3,4
▪️ वरील सर्व
Correct Answer: वरील सर्व
Question : 24
काही शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात ; तशी विभक्ती प्रत्ययेही स्वतंत्रपणे येऊ शकतात . उत्तरांचा योग्य पर्याय सांगा
▪️ संपूर्ण विधान चूक आहे
▪️ संपूर्ण विधान बरोबर आहे
▪️ विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
▪️ विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे
Correct Answer: विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे
Question : 25
शब्दयोगी अव्ययांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या
1. शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात.
2. शब्दयोगी अव्यये नसल्यास वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध जोडता येत नाही
3. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात
4. शब्दयोगी अव्यये अविकारी असतात
▪️ केवळ विधान 1 , 2 आणि 4 योग्य
▪️ केवळ विधान 2 आणि 3 योग्य
▪️ केवळ विधान 1 आणि 4 योग्य
▪️ सर्व विधाने योग्य
Correct Answer: सर्व विधाने योग्य
Question : 26
विशी , विषयी , संबंधी ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ कैवल्यवाचक
▪️ संग्रहवाचक
▪️ संबंधवाचक
▪️ साहचर्यवाचक
Correct Answer: संबंधवाचक
Question : 27
सह , बरोबर , सकट , सहित , निशी समवेत ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ साहचर्यवाचक
▪️ भागवाचक
Correct Answer: साहचर्यवाचक
Question : 28
पैकी , पोटी , आतून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ साहचर्यवाचक
▪️ भागवाचक
▪️ कालदर्शक
▪️ गतीवाचक
Correct Answer: भागवाचक
Question : 29
बद्दल, ऐवजी, जागी, बदली - ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ विनिमयवाचक
▪️ द्विकवाचक
▪️ योग्यतावाचक
▪️ कैवल्यवाचक
Correct Answer: विनिमयवाचक
Question : 30
पुढीलपैकी कोणते अव्यय 'शब्दयोगी अव्यय' या प्रकारात मोडते ?
▪️ अबब
▪️ अरेरे
▪️ अहाहा
▪️ करिता
Correct Answer: करिता

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post