मराठी व्याकरण प्रश्नसंच
Question : 1
वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ------------
Correct Answer: वाक्य रूपांतर
Question : 2
पुढीलपैकी चुकीची विधान/ने असलेला पर्याय निवडा
1. शब्दांच्या आठ जाती आहेत
2. शब्दांची कार्य आठ प्रकारची आहेत
3. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो
4. शब्दाची जात बदलली तरी अर्थ बदलत नाही
1. शब्दांच्या आठ जाती आहेत
2. शब्दांची कार्य आठ प्रकारची आहेत
3. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यात एकच कार्य करतो
4. शब्दाची जात बदलली तरी अर्थ बदलत नाही
Correct Answer: 3 आणि 4
Question : 3
खालीलपैकी वाक्याची अचूक व्याख्या कोणती
Correct Answer: एक पूर्ण विचार भाषेत व्यक्त करणाऱ्या शब्दसमुच्चयाचे वाक्य बनते
Question : 4
एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्यांचे तीन प्रकार पडतात - हे विधान ..............
Correct Answer: सत्य आहे
Question : 5
वाक्यातील विधानांच्या संख्येच्या आधारावर वाक्यांचे मुख्य तीन प्रकार कोणते ?
Correct Answer: केवल वाक्य , मिश्र वाक्य , संयुक्त वाक्य
Question : 6
पुढील विधाने वाचा
अ) होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात
ब) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात
क) क्रियापदाच्या रूपावरून शक्यता , योग्यता , इच्छा याविषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्य म्हणतात
अ) होकारार्थी वाक्यांना करणरूपी वाक्य म्हणतात
ब) वाक्यात अट असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात
क) क्रियापदाच्या रूपावरून शक्यता , योग्यता , इच्छा याविषयीचा बोध झाल्यास त्यांना स्वार्थी वाक्य म्हणतात
Correct Answer: फक्त अ बरोबर
विधान : ब चूकीचे आहे कारण - वाक्यात आज्ञा, विनंती, सल्ला किंवा सूचना व्यक्त केली असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात .
वाक्यात अट व्यक्त केली असेल तर ते संभाव्य अथवा शर्तार्थी / संकेतार्थी वाक्य असते . ( जर-तर आर्थाने जोडलेले वाक्य संकेतार्थी वाक्य असते )
उदाहरणार्थ - पाऊस आला तर आपण बाहेर जाणार नाही .
विधान : क चूकीचे आहे कारण - वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , योग्यता , शक्यता , इच्छा इत्यादी गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात .
शक्यतो अशा क्रियापदाला वा / वि / वे प्रत्यय असतो .
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असते .
उदाहरणार्थ - गिता शाळेत गेली
Question : 7
पुढील विधाने वाचा
अ) संयुक्त वाक्यात प्रधानात्व बोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात
ब) मिश्र वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी बनते
क) मिश्र-संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता नसते
अ) संयुक्त वाक्यात प्रधानात्व बोधक उभयान्वयी अव्यय वापरली जातात
ब) मिश्र वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी बनते
क) मिश्र-संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता नसते
Correct Answer: फक्त क चूक
मिश्र-संयुक्त वाक्यासाठी कोणत्याच उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता नसते – हे विधान चुकीचे आहे.
स्पष्टीकरण :
अ) संयुक्त वाक्य – दोन किंवा अधिक समान महत्त्वाची वाक्ये प्रधानत्व बोधक (आणि, पण, किंवा , म्हणून इ.) उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.
ब) मिश्र वाक्य – मुख्य वाक्य व उपवाक्य गौणत्व बोधक (जर, कारण, म्हणून, की इ.) उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.
क) मिश्र-संयुक्त वाक्य – यात संयुक्त व मिश्र वाक्यांची वैशिष्ट्ये असतात, म्हणून दोन्ही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता असते
स्पष्टीकरण :
अ) संयुक्त वाक्य – दोन किंवा अधिक समान महत्त्वाची वाक्ये प्रधानत्व बोधक (आणि, पण, किंवा , म्हणून इ.) उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.
ब) मिश्र वाक्य – मुख्य वाक्य व उपवाक्य गौणत्व बोधक (जर, कारण, म्हणून, की इ.) उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात.
क) मिश्र-संयुक्त वाक्य – यात संयुक्त व मिश्र वाक्यांची वैशिष्ट्ये असतात, म्हणून दोन्ही प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांची आवश्यकता असते
Question : 8
सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे ' वरील वाक्याचा प्रकार कोणता
Correct Answer: विधानार्थी वाक्य
Question : 9
'अबब ! केवढी प्रचंड आग ही ! ' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे
Correct Answer: उद्गगारार्थी वाक्य
Question : 10
हे गोपालचे अक्षर चांगले आहे का ? या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल
Correct Answer: काय अक्षर हे गोपालचे !
Question : 11
केवढी उंच इमारत ही ! या उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात योग्य वाक्य परिवर्तन केलेला पर्याय निवडा
Correct Answer: ही इमारत खूप उंच आहे
Question : 12
ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्या वाक्याला काय म्हणतात
Correct Answer: करणरूपी वाक्य
Question : 13
करणरुपी वाक्ये म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्ये
Correct Answer: होकारार्थी
Question : 14
होकारार्थी वाक्य म्हणजे काय
Correct Answer: होकार किंवा अस्तित्व दर्शविणारे वाक्य
Question : 15
होकारार्थी वाक्यात काय व्यक्त होते
Correct Answer: अस्तित्व किंवा स्वीकृती
Question : 16
होकारार्थी वाक्यांना काय म्हणतात
Correct Answer: करणरूपी वाक्य
Question : 17
होकारार्थी वाक्यात परिवर्तन करा - पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे .
Correct Answer: पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे
Question : 18
रंगरंगोटी शिवाय घर सुंदर दिसत नाही - या वाक्याचे होकारार्थी वाक्य तयार करा
Correct Answer: रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते
Question : 19
वाक्यांचे त्यांच्या अर्थानुरोधाने विविध प्रकार होतात , ते पुढीलप्रमाणे -
1. वाक्यातील होकारार्थी विधानाला अकरणरुपी वाक्य म्हणतात
2. माझे वडील परगावी गेले नाहीत हे उदाहरण करणरुपी वाक्य प्रकाराचे आहे
3. तू मुंबईस केव्हा जाणार आहेस ? हे विधानार्थी वाक्य आहे
1. वाक्यातील होकारार्थी विधानाला अकरणरुपी वाक्य म्हणतात
2. माझे वडील परगावी गेले नाहीत हे उदाहरण करणरुपी वाक्य प्रकाराचे आहे
3. तू मुंबईस केव्हा जाणार आहेस ? हे विधानार्थी वाक्य आहे
Correct Answer: वरील सर्व चूक
Question : 20
नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात
Correct Answer: अकरणरूपी वाक्य
Question : 21
अकरणरुपी वाक्ये म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य -----------
Correct Answer: नकारार्थी
Question : 22
पुढील वाक्याचे योग्य असे नकारार्थी वाक्य निवडा - दोन हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे
Correct Answer: दोन हजार रुपये ही काही लहान रक्कम नव्हे
Question : 23
जिच्या गळ्यात गंधार आहे असे दीनानाथ म्हणायचे,तीच ही स्वरसम्राज्ञी लता - या वाक्यातील गौण वाक्य कोणते
Correct Answer: जिच्या गळ्यात गंधार आहे असे दीनानाथ म्हणायचे
Question : 24
प्रधान वाक्यातील एखाद्या नामाशी किंवा सर्वनामाशी संबंध असणाऱ्या वाक्यास काय म्हणतात
Correct Answer: विशेषण वाक्य
Question : 25
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती - ही वाक्यरचना खालील दिलेल्यापैकी कोणत्या प्रकारची आहे
Correct Answer: स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य
Question : 26
पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही
Correct Answer: सगळेच शहाणे कसे असतील
Question : 27
' तुला पहिले बक्षीस मिळो ' या वाक्याचे विध्यर्थी वाक्यरूपांतर ओळखा
Correct Answer: तुला पहिले बक्षीस मिळावे
विध्यर्थी वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यात क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा व्यक्त होते . या वाक्यांमधील क्रियापदांच्या शेवटी वा/वी/वे असे प्रत्यय लागतात .
मूळ वाक्य : 'तुला पहिले बक्षीस मिळो'
हे वाक्य आज्ञार्थी प्रकारातील आहे, कारण यात 'मिळो' या क्रियापदाने एक प्रकारची इच्छा किंवा शुभेच्छा व्यक्त केली आहे.
वाक्यरूपांतर : 'तुला पहिले बक्षीस मिळावे'
या वाक्यातील 'मिळावे' हे क्रियापदाचे रूप शक्यता किंवा इच्छा/योग्यता दर्शवते.
'मिळावे' या रूपावरून असे लक्षात येते की, 'असे होणे योग्य आहे' किंवा 'असे होण्याची शक्यता आहे'. हेच विध्यर्थी वाक्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे
Question : 28
राजूला भूक लागली.तो इतरांच्या आधी जेवला - या वाक्यांचे रचनेनुसार केवल वाक्यात रूपांतर कसे होईल ? योग्य पर्याय निवडा
Correct Answer: भूक लागल्यामुळे राजू इतरांच्या आधी जेवला
Question : 29
पुढील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्यात रूपांतर करा - फुकट दिले तर कोणी नको म्हणणार नाही
Correct Answer: फुकट दिले तर कोण नको म्हणेल ?
Question : 30
गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल ? अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य तयार करा
Correct Answer: गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /