क्रियापद व क्रियापदाचे प्रकार मराठी व्याकरण प्रश्न | Kriyapad Marathi Grammar | प्रश्नसंच - 2

Practice Questions

क्रियापद मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
खालीलपैकी अयोग्य विधान/विधाने निवडा
(अ) ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते, ते सकर्मक क्रियापद असते
(ब) 'श्रावणीला थंडी वाजते' या वाक्यातील 'वाजते' हे क्रियापद अकर्मक आहे.
(क) 'गवळी धार काढतो' या वाक्यातील 'काढतो' हे सकर्मक क्रियापद आहे
▪️ फक्त (अ)
▪️ फक्त (ब)
▪️ (अ) आणि (क)
▪️ सर्व विधाने अयोग्य आहेत.
Correct Answer: ▪️ फक्त (अ)
Question : 2
पुढील विधानांपैकी योग्य विधान/विधाने निवडा
(अ) 'प्रयोजक क्रियापद' म्हणजे जेव्हा कर्ता स्वतः क्रिया करत नाही, तर दुसऱ्याकडून करवून घेतो.
(ब) 'आई मुलाला हसवते.' या वाक्यात 'हसवते' हे प्रयोजक क्रियापद आहे
(क) 'शक्य क्रियापद' म्हणजे कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे, हे दर्शविणारे क्रियापद
▪️ फक्त (अ)
▪️ फक्त (ब)
▪️ (ब) आणि (क)
▪️ सर्व विधाने योग्य आहेत.
Correct Answer: ▪️ सर्व विधाने योग्य आहेत.
Question : 3
खालील विधानांपैकी अयोग्य विधान/विधाने निवडा
(अ) 'मला आता चालवते.' या वाक्यातील 'चालवते' हे शक्य क्रियापद आहे
(ब) 'संयुक्त क्रियापद' म्हणजे मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद मिळून बनलेले क्रियापद
(क) 'पडणे', 'चालणे', 'खेळणे' ही सर्व संयुक्त क्रियापदे आहेत
▪️ फक्त (अ)
▪️ फक्त (ब)
▪️ फक्त (क)
▪️ सर्व विधाने अयोग्य आहेत
Correct Answer: ▪️ फक्त (क)
पडणे, चालणे, खेळणे ही सर्व संयुक्त क्रियापदे नाहीत. 'संयुक्त क्रियापद' म्हणजे मुख्य क्रियापद (main verb) आणि सहाय्यक क्रियापद (auxiliary verb) मिळून तयार होणारे क्रियापद. उदाहरणार्थ, 'तो अभ्यास करत आहे.' या वाक्यात 'करत' हे मुख्य क्रियापद आहे आणि 'आहे' हे सहाय्यक क्रियापद आहे. दुसरीकडे, 'पडणे', 'चालणे', 'खेळणे' ही साधी क्रियापदे (simple verbs) आहेत. कारण या क्रियापदांमध्ये फक्त एकच क्रियावाचक शब्द आहे
Question : 4
पुढील विधानांपैकी योग्य विधान/विधाने निवडा:
(अ) वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
(ब) क्रियापदाचे मुख्य कार्य कर्त्याची क्रिया किंवा स्थिती दर्शवणे आहे.
(क) क्रियापदाचे लिंग, वचन आणि पुरुष यानुसार रूप बदलते
▪️ फक्त (अ)
▪️ फक्त (ब)
▪️ फक्त (क)
▪️ सर्व विधाने योग्य आहेत
Correct Answer: ▪️ सर्व विधाने योग्य आहेत
Question : 5
क्रिया करणारा कर्ता तर क्रिया सोसणारा कोण असतो
▪️ कर्म
▪️ क्रियापद
▪️ विशेषण
▪️ नाम
Correct Answer: ▪️ कर्म
Question : 6
योग्य जोड्या जुळवा
गट - अ
अ) देवा मला पास कर
ब) तिने अभ्यास केला
क) पहिला नंबर आला , की पेढे वाटीन
ड) ती बहुदा शाळेत असावी
गट - ब
1) स्वार्थी क्रियापद
2) संकेतार्थी क्रियापद
3) आज्ञार्थी क्रियापद
4) विध्यर्थी क्रियापद
▪️ अ - 4 , ब - 3 , क - 1 , ड - 2
▪️ अ - 3 , ब - 1 , क - 2 , ड - 4
▪️ अ - 2 , ब - 3 , क - 4 , ड - 1
▪️ अ - 1 , ब - 4 , क - 3 , ड - 2
Correct Answer: ▪️ अ - 3 , ब - 1 , क - 2 , ड - 4
Question : 7
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य , शक्यता , योग्यता , इच्छा यांचा बोध होत असेल तर त्यास ------------- क्रियापद म्हणतात
▪️ संकेतार्थी
▪️ विध्यर्थी
▪️ स्वार्थी
▪️ अज्ञार्थी
Correct Answer: ▪️ विध्यर्थी
Question : 8
त्याने माझे काय केले असावे . या वाक्यातील क्रियापद --------- या गटातील आहे
▪️ अज्ञार्थी
▪️ संकेतार्थी
▪️ विध्यर्थी
▪️ स्वार्थी
Correct Answer: ▪️ विध्यर्थी
Question : 9
जा , ये , ऊठ , बस या मूळच्या धातूंना प्रत्यय लागून बनविलेल्या क्रियापदांना काय म्हणतात
▪️ संयुक्त क्रियापद
▪️ शक्य क्रियापद
▪️ साधित क्रियापद
▪️ सिद्ध क्रियापद
Correct Answer: ▪️ सिद्ध क्रियापद
Question : 10
नाम , विशेषण , धातू व अव्यय अशा विविध जातींच्या शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या क्रियापदांना काय म्हणतात
▪️ भावकर्तृक क्रियापद
▪️ शक्य क्रियापद
▪️ सिद्ध क्रियापद
▪️ साधित क्रियापद
Correct Answer: ▪️ साधित क्रियापद
Question : 11
मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता, ती क्रिया स्वतः करीत नसून दुसऱ्याकडून करवून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला ----------- म्हणतात
▪️ प्रयोजक क्रियापद
▪️ गौण क्रियापद
▪️ करणरूप क्रियापद
▪️ शक्य क्रियापद
Correct Answer: ▪️ प्रयोजक क्रियापद
Question : 12
ज्या क्रियापदामधील धातू निश्चितपणे सांगता येत नाही अशा क्रियापदांना ---------- म्हणतात
▪️ प्रयोजक क्रियापद
▪️ अनियमित किंवा गौण क्रियापद
▪️ शक्य क्रियापद
▪️ भावकर्तृक क्रियापद
Correct Answer: ▪️ अनियमित किंवा गौण क्रियापद
Question : 13
'आहे', 'नाही', 'नव्हे', 'नको','नये','पाहिजे' ही ----------- क्रियापदांची उदाहरणे आहेत
▪️ अनियमित/गौण
▪️ अकर्मक
▪️ अकरणरूप
▪️ प्रयोजक
Correct Answer: ▪️ अनियमित/गौण
Question : 14
'असे वागणे बरे नाही' . या वाक्यातील 'नाही' या क्रियापदास काय म्हणतात
▪️ अनियमित/गौण
▪️ अकर्मक
▪️ अकरणरूप
▪️ प्रयोजक
Correct Answer: ▪️ अनियमित/गौण
Question : 15
पुढील विधाने वाचा
1. भावकर्तृक क्रियापदांना स्वतंत्र , स्पष्टकर्ता नसतो
2. अनियमित धातूंना अख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत
3. प्रयोजक क्रियापदात कर्ता मूळ धातूतील क्रिया स्वतःच पार पाडतो
▪️ 1 आणि 2 बरोबर
▪️ 2 आणि 3 बरोबर
▪️ फक्त 2 बरोबर
▪️ वरील सर्व बरोबर
Correct Answer: ▪️ 1 आणि 2 बरोबर
Question : 16
एखाद्या वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर त्या क्रियापदाला ------------ असे म्हणतात
▪️ अज्ञार्थी क्रियापद
▪️ विध्यर्थी क्रियापद
▪️ स्वार्थी क्रियापद
▪️ संकेरार्थी क्रियापद
Correct Answer: ▪️ स्वार्थी क्रियापद
Question : 17
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा , विनंती , प्रार्थना , आशीर्वाद , सल्ला किंवा उपदेश यांचा बोध होत असेल तर त्यास ------------- क्रियापद म्हणतात
▪️ संकेतार्थी
▪️ विध्यर्थी
▪️ स्वार्थी
▪️ अज्ञार्थी
Correct Answer: ▪️ अज्ञार्थी
Question : 18
धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते
▪️ सहाय्यक क्रियापद
▪️ संयुक्त क्रियापद
▪️ प्रायोगिक क्रियापद
▪️ प्रायोजक क्रियापद
Correct Answer: ▪️ संयुक्त क्रियापद
Question : 19
जा , ये , कर , बस , बोल , पी यासारख्या मराठी भाषेतील मूळ धातूंना ------------ म्हणतात
▪️ देशी शब्द
▪️ तत्सम शब्द
▪️ सिद्ध धातू
▪️ साधित शब्द
Correct Answer: ▪️ सिद्ध धातू
Question : 20
'बाळ एवढा लाडू खाऊन टाक' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा
▪️ संयुक्त
▪️ सिद्ध
▪️ शक्य
▪️ अनियमित
Correct Answer: संयुक्त
Question : 21
धातूला प्रत्यय जोडून तयार होणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्यास ----------- म्हणतात
▪️ विशेषण
▪️ क्रियापद
▪️ धातुसाधित
▪️ धातू
Correct Answer: धातुसाधित
Question : 22
पुढीलपैकी कोणता प्रकार कृदन्ताचा नाही
▪️ णे-कृदन्त
▪️ ऊ-कृदन्त
▪️ ला-कृदन्त
▪️ क-कृदन्त
Correct Answer: क-कृदन्त
Question : 23
धातूंना विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दास काय म्हणतात
▪️ विशेषण
▪️ कृदन्ते
▪️ सर्वनाम
▪️ अव्यय
Correct Answer: कृदन्ते
Question : 24
खालीलपैकी अयोग्य विधान/विधाने निवडा:
(अ) 'धातुसाधित' हे क्रियापदाप्रमाणे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात.
(ब) 'येऊन' हा शब्द 'ये' या धातूपासून बनलेला धातुसाधित आहे.
(क) धातुसाधितांना 'कृदंत' असेही म्हणतात
▪️ फक्त (अ)
▪️ फक्त (ब)
▪️ फक्त (क)
▪️ सर्व विधाने अयोग्य आहेत.
Correct Answer: फक्त (अ)
Question : 25
वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात
▪️ धातू
▪️ क्रियाविशेषण
▪️ क्रियापद
▪️ धातू साधित
Correct Answer: क्रियापद
Question : 26
संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात
▪️ आख्यात
▪️ कार्यपद
▪️ कृदन्त
▪️ उद्देश
Correct Answer: आख्यात
Question : 27
पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा
1. क्रियापदांना काळ व अर्थ यांचे विकार होतात
2. कधी कधी वर्तमानकाळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो
3. संकेतार्थी क्रियापदे भूतकाळी असतात
▪️ फक्त 1 बरोबर
▪️ 2 आणि 3 बरोबर
▪️ 1 आणि 2 बरोबर
▪️ वरील सर्व बरोबर
Correct Answer: 1 आणि 2 बरोबर
संकेतार्थी क्रियापदे केवळ भूतकाळीच असतात, असे नाही. त्यांचे मुख्य कार्य अट, संकेत किंवा शंका दर्शवणे आहे आणि त्यांचा वापर वर्तमानकाळ, भूतकाळ किंवा भविष्यकाळातील घटनांसाठीही केला जाऊ शकतो.
वाक्यातील क्रियापदावरून जर-तर असा अर्थबोध होत असेल तर अशा क्रियापदास संकेतार्थी क्रियापद म्हणतात. सामान्यपणे वाक्य जोडण्यासाठी जर-तर, म्हणजे, की यांसारख्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो
Question : 28
पुढील विधाने वाचा व योग्य विधान/ने असलेला पर्याय निवडा
1. धातूला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना अपूर्ण क्रियापदे म्हणतात
2. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते
3. काही क्रियापदांना दोन कर्मे असतात
▪️ 1 आणि 2
▪️ 2 आणि 3
▪️ फक्त 2
▪️ वरील सर्व
Correct Answer: 2 आणि 3
विधान 1 (अयोग्य) : 'धातू'ला प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण आहे असे दर्शविणाऱ्या शब्दांना धातुसाधिते (उदा. खाऊन, वाचून) किंवा असमाप्य क्रियापदे म्हणतात, त्यांना 'अपूर्ण क्रियापदे' म्हणत नाहीत.
अपूर्ण क्रियापदे ही वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी इतर पूरक शब्दांची मदत घेतात . उदा. आहे, होता.
विधान २ (योग्य) : अकर्मक क्रियापदांना (Intransitive verbs) कर्माची आवश्यकता नसते. वाक्यातील क्रियापदाचा परिणाम कर्त्यावरच होतो, कर्मावर नाही. उदा. 'तो हसतो.' या वाक्यात 'हसणे' या क्रियेचा परिणाम कर्त्यावरच होतो.
विधान ३ (योग्य) : काही सकर्मक क्रियापदांना दोन कर्मे (Direct and Indirect Objects) असतात. अशा क्रियापदांना द्विकर्मक क्रियापदे (Ditransitive verbs) म्हणतात.
उदा. 'मी त्याला पेन दिले.' या वाक्यात 'पेन' हे प्रत्यक्ष कर्म तर 'त्याला' हे अप्रत्यक्ष कर्म आहे
Question : 29
ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची आवश्यकता असते त्यास ------------ क्रियापद म्हणतात
▪️ सकर्मक
▪️ अकर्मक
▪️ द्विकर्मक
▪️ संयुक्त
Correct Answer: सकर्मक
Question : 30
क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो तेव्हा ते ------------ क्रियापद असते
▪️ अकर्मक
▪️ सकर्मक
▪️ द्वीकर्मक
▪️ प्रयोजक
Correct Answer: सकर्मक
Question : 31
कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद ------------ असते
▪️ सकर्मक
▪️ द्विकर्मक
▪️ अकर्मक
▪️ प्रयोजक
Correct Answer: अकर्मक
Question : 32
ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते , त्यास ---------- क्रियापद म्हणतात
▪️ सकर्मक
▪️ द्विकर्मक
▪️ अकर्मक
▪️ उभयविध
Correct Answer: अकर्मक
Question : 33
जे क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्याला ----------- क्रियापद म्हणतात
▪️ संयुक्त
▪️ उभयविध
▪️ सिद्ध
▪️ साधित
Correct Answer: उभयविध
Question : 34
कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे - या क्रियापदांचा प्रकार कोणता
▪️ उभयविध
▪️ द्विकर्मक
▪️ सकर्मक
▪️ अकर्तृक
Correct Answer: उभयविध
Question : 35
मी गावाला जात आहे . या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा
▪️ सहाय्यक क्रियापद
▪️ संयुक्त क्रियापद
▪️ प्रायोगिक क्रियापद
▪️ प्रयोजक क्रियापद
Correct Answer: संयुक्त क्रियापद
Question : 36
श्रीकृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी - या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा
▪️ विध्यर्थी
▪️ स्वार्थी
▪️ अज्ञार्थी
▪️ संकेतार्थी
Correct Answer: विध्यर्थी
Question : 37
'गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात' या वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखा
▪️ सकर्मक
▪️ अकर्मक
▪️ द्विकर्मक
▪️ प्रश्नार्थक
Correct Answer: द्विकर्मक

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post