Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 27
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 27
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण सराव टेस्ट सिरीज
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Marathi grammar online test,Marathi grammar mock test,Marathi vyakaran online test,Marathi grammar quiz,Marathi vyakaran mock test,Marathi grammar test paper,Marathi grammar online test free,Free marathi grammar mock test,Marathi vyakaran practice set,Marathi grammar online quiz free,Marathi vyakaran test series free,Marathi grammar question paper pdf,TCS pattern marathi vyakaran online test series,TCS Pattern Marathi Vyakaran Mock Test,मराठी व्याकरण मॉक टेस्ट,मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,मराठी व्याकरण सराव पेपर,मराठी ग्रामर प्रश्न
भोंदू बाबांनी लोकांना लुबाडले' या वाक्यातील 'भोंदू' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
❶ गुणविशेषण
❷ धातुसाधित विशेषण
❸ अव्ययसाधित विशेषण
❹ नामसाधित विशेषण
मना सज्जना भक्तीपंथेचि जावे। या ओळींमधील 'सज्जना' या शब्दाची विभक्ती ओळखा ?
❶ द्वितीया
❷ चतुर्थी
❸ षष्ठी
❹ संबोधन
पुढीलपैकी कोणता शब्द 'काळोख' या शब्दाचा समानार्थी नाही ?
❶ तिमिर
❷ अंधार
❸ तम
❹ प्रकाश
दगडावर रचलेली पायऱ्यांची रांग या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
❶ घाट
❷ तट
❸ डोंगर
❹ पायवाट
'आईने मुलाला कडेवर घेतले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ कर्मणी प्रयोग
❸ सकर्मक भावे प्रयोग
❹ अकर्मक भावे प्रयोग
'तोंडात बोट घालणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय ?
❶ खूप भूक लागणे
❷ आश्चर्यचकित होणे
❸ तोंड बंद करणे
❹ दात दुखणे
'उंटाचा _____ असतो.' रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द भरा ?
❶ ताफा
❷ कळप
❸ लमाण
❹ गादी
शाब्बास ! तुझ्या प्रयत्नांना यश आले. या वाक्यातील 'शाब्बास !' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
❶ केवलप्रयोगी अव्यय
❷ शब्दयोगी अव्यय
❸ उभयान्वयी अव्यय
❹ क्रियाविशेषण अव्यय
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ कवीइत्री
❷ कवयित्री
❸ कवैत्री
❹ कविइत्री
'अनुज' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ अग्रज
❷ अनुजा
❸ लहान
❹ मोठा
'यशोधन' या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा ?
❶ यशो + धन
❷ यश + धन
❸ यशः + धन
❹ यशो + ऊधन
तो मुंबईला जाणार आहे. या वाक्यातील 'मुंबईला' या शब्दाचा कारकार्थ कोणता ?
❶ कर्ता
❷ कर्म
❸ अपादान
❹ अधिकरण
'सदाशिवराव अगदी कर्णाचा अवतार आहेत !' या वाक्यातील 'कर्णाचा अवतार' या उपमेचा अर्थ काय ?
❶ खूप पराक्रमी मनुष्य
❷ अत्यंत दानशूर व्यक्ती
❸ रागीट माणूस
❹ कपटी मनुष्य
'तो वेशीपाशी येताच थांबला.' या वाक्यातील 'पाशी' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?
❶ शब्दयोगी अव्यय
❷ उभयान्वयी अव्यय
❸ केवलप्रयोगी अव्यय
❹ क्रियाविशेषण अव्यय
'विद्यार्थी' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
❶ विद्यार्थिनी
❷ विद्यार्थी
❸ विद्यार्थ्यांनो
❹ विद्याथ्ये
'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ?
❶ वाघीण
❷ वाघींण
❸ वाघीन
❹ वाघ्या
'राम आंबा खातो.' या वाक्याचे 'कर्मणी' प्रयोगात रूपांतर करा ?
❶ रामाने आंबा खाल्ला.
❷ राम आंबा खाणार.
❸ रामाकडून आंबा खातो.
❹ रामाने आंबा खाल्ला होता.
'पिकत घातलेल्या आंब्यांची _____ असते.' रिकाम्या जागी योग्य शब्द भरा ?
❶ अढी
❷ गादी
❸ रास
❹ पेट्या
'आईने बाजारातून बटाटे, वांगी, टमाटे आणले.' या वाक्यात कोणत्या विरामचिन्हाचा वापर प्रामुख्याने होईल ?
❶ पूर्णविराम
❷ स्वल्पविराम
❸ अर्धविराम
❹ अपसरण चिन्ह
'चोरट्या पावलांनी येणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा ?
❶ चोरी करायला येणे
❷ कोणालाही न कळता किंवा सुगावा न लागू देता येणे
❸ पायात चप्पल न घालता येणे
❹ हळूहळू चालणे
'आजन्म' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ तत्पुरुष समास
❷ अव्ययीभाव समास
❸ द्वंद्व समास
❹ बहुव्रीहि समास
'तो क्रिकेट खेळत राहील.' या वाक्याचा काळ ओळखा ?
❶ अपूर्ण भविष्यकाळ
❷ पूर्ण भविष्यकाळ
❸ रीती भविष्यकाळ
❹ साधा भविष्यकाळ
'आई वडिलांचा मान राखावा.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ आज्ञार्थी वाक्य
❷ विधानार्थी वाक्य
❸ विद्यार्थी वाक्य
❹ संकेतार्थी वाक्य
'उंट' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
❶ उंटे
❷ उंट
❸ उंटानी
❹ उंट्या
'मरणात खरोखर जग जगते' या ओळीत कोणता अलंकार आहे ?
❶ श्लेष अलंकार
❷ विरोधाभास अलंकार
❸ रूपक अलंकार
❹ चेतनागुणोक्ती अलंकार
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा