वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न | Varnmala Marathi Grammar Questions | प्रश्नसंच - 2

Varnmala Marathi Grammar Question | वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न |Marathi grammar practice question|Marathi vyakaran Sarav paper

😄

वर्णमाला मराठी व्याकरण प्रश्न

Question : 1
खालीलपैकी कोणता वर्णमालेतील स्वराचा प्रकार नाही ?
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ अर्धस्वर
▪️ संयुक्त स्वर
📋 'अर्धस्वर' हा स्वरांचा प्रकार नसून व्यंजनाचा प्रकार आहे . य, र, ल, व यांना अर्धस्वर म्हणतात.
Question : 2
अयोग्य जोडी ओळखा
1 ) ऱ्हस्व स्वर - अ , इ , उ , ऋ , ऌ
2 ) दीर्घ स्वर - आ , ई , ऊ
3 ) संयुक्त स्वर - ए , ऐ , ओ , औ
4 ) इंग्रजी स्वर - ॲ , ऑ
▪️ फक्त 4
▪️ फक्त 3
▪️ 2 आणि 4
▪️ वरीलपैकी एकही नाही
📋 दिलेली सर्व जोड्या योग्य आहेत . ऱ्हस्व स्वर (अ, इ, उ, ऋ, ऌ), दीर्घ स्वर (आ, ई, ऊ), संयुक्त स्वर (ए, ऐ, ओ, औ) आणि इंग्रजी स्वर (ॲ, ऑ) यांच्या योग्य जोड्या आहेत.
Question : 3
योग्य जोड्या जुळवा
गट - अ
1) ऱ्हस्व स्वर
2) संयुक्त स्वर
3) सजातीय स्वर
4) अर्ध स्वर
गट - ब
A) य् - र्
B) अ - इ
C) ए - औ
D)अ - आ
▪️ 1-C , 2-B , 3-A , 4-D
▪️ 1-A , 2-B , 3-C , 4-D
▪️ 1-D , 2-A , 3-B , 4-C
▪️ 1-B , 2-C , 3-D , 4-A
📋 योग्य जोड्या : ऱ्हस्व स्वर (उच्चार कमी वेळ लागतो) - अ, इ.
संयुक्त स्वर (दोन स्वरांपासून तयार झालेले) - ए, औ.
सजातीय स्वर (एकाच उच्चारस्थानातून निघणारे) - अ, आ.
अर्ध स्वर (अर्धा उच्चार स्वरासारखा) - य, र.
Question : 4
योग्य विधाने ओळखा
1 ) तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मुलध्वनींना वर्ण असे म्हणतात
2 ) ध्वनीला किंवा आवाजाला चिन्ह किंवा खूण स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते
3 ) शब्द तयार होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते
4 ) अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात
▪️ 1 , 2 आणि 3 योग्य
▪️ 2 आणि 3 योग्य
▪️ 1 आणि 4 योग्य
▪️ वरील सर्व योग्य
📋 दिलेली सर्व विधाने योग्य आहेत
Question : 5
ज्या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो त्यांना ......... म्हणतात
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात . उदा. अ, इ, उ, ऋ, ऌ.
Question : 6
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती ऱ्हस्व स्वर आहेत ?
▪️ चार
▪️ तीन
▪️ पाच
▪️ दोन
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण पाच ऱ्हस्व स्वर आहेत : अ, इ, उ, ऋ, ऌ.
Question : 7
खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणते आहेत ?
▪️ अ - इ - उ - ऋ - ऌ
▪️ ए - ऐ - ओ - औ
▪️ आ - ई - ऊ
▪️ ॲ - ऑ
अ, इ, उ, ऋ, ऌ हे मराठीतील ऱ्हस्व स्वर आहेत.
Question : 8
योग्य शब्द लिहा : अ , इ , उ , ऋ , ऌ हे ......... स्वर आहेत
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दिर्घ स्वर
▪️ सजातीय
▪️ विजातीय
अ, इ, उ, ऋ, ऌ हे ऱ्हस्व स्वर आहेत कारण त्यांच्या उच्चारास कमी वेळ लागतो.
Question : 9
खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता ?
▪️ आ
▪️ औ
▪️ ऐ
▪️ ऋ
ऋ हा एक ऱ्हस्व स्वर आहे
Question : 10
ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो त्यांना ......... म्हणतात
▪️ दीर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
▪️ ऱ्हस्व स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करावयास जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.
Question : 11
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती दीर्घ स्वर आहेत ?
▪️ पाच
▪️ चार
▪️ तीन
▪️ दोन
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण तीन दीर्घ स्वर आहेत : आ, ई, ऊ.
Question : 12
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ इ
▪️ ऋ
▪️ ऌ
▪️ आ
आ हा एक दीर्घ स्वर आहे
Question : 13
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ उ
▪️ ऋ
▪️ ई
▪️ ऌ
ई हा एक दीर्घ स्वर आहे
Question : 14
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणता
▪️ ऊ
▪️ इ
▪️ ऋ
▪️ ऌ
ऊ हा एक दीर्घ स्वर आहे
Question : 15
खालीलपैकी दिर्घ स्वर कोणते
▪️ ए - ऐ - ओ - औ
▪️ आ - ई - ऊ
▪️ अ - इ - उ - ऋ - ऌ
▪️ ॲ - ऑ
आ, ई, ऊ हे दीर्घ स्वर आहेत कारण त्यांच्या उच्चारास जास्त वेळ लागतो.
Question : 16
योग्य शब्द लिहा : आ , ई , ऊ हे ......... स्वर आहेत
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दिर्घ स्वर
▪️ संयुक्त स्वर
▪️ अर्धस्वर
आ, ई, ऊ हे दीर्घ स्वर आहेत
Question : 17
संयुक्त स्वर म्हणजे काय
▪️ दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ एकाच स्वराला संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ तीन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
▪️ एक स्वर व एक व्यंजन एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात
जेव्हा दोन स्वर एकत्र येऊन एक नवीन स्वर तयार होतो, त्याला संयुक्त स्वर म्हणतात
◾ ऐ = आ + इ/ई
◾ औ = आ + उ/ऊ
Question : 18
दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक ....... निर्माण होते
▪️ संयुक्त स्वर
▪️ ऱ्हस्व स्वर
▪️ दीर्घ स्वर
▪️ अर्ध स्वर
दोन भिन्न उच्चारस्थानांतून येणाऱ्या स्वरांच्या एकत्रिकरणातून 'संयुक्त स्वर' तयार होतो.
Question : 19
संयुक्त स्वर हे .......... असतात
▪️ दीर्घ उच्चाराचे
▪️ कमी लांबीच्या उच्चाराचे
▪️ ऱ्हस्व उच्चाराचे
▪️ यापैकी नाही
📋 संयुक्त स्वर हे दोन स्वरांच्या एकत्रिकरणातून बनत असल्यामुळे त्यांचा उच्चार लांब, म्हणजेच दीर्घ असतो.
Question : 20
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती संयुक्त स्वर आहेत ?
▪️ तीन
▪️ पाच
▪️ चार
▪️ दोन
मराठीत एकूण चार संयुक्त स्वर आहेत : ए, ऐ, ओ, औ
Question : 21
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ए
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
📋 ए हा एक संयुक्त स्वर आहे, जो अ + इ/ई यांच्या एकत्रिकरणातून बनतो
Question : 22
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ऐ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
📋 ऐ हा एक संयुक्त स्वर आहे, जो आ + इ/ई यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 23
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ ओ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
◾ ओ हा एक संयुक्त स्वर आहे, जो अ + उ/ऊ यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 24
खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता ?
▪️ औ
▪️ आ
▪️ ऋ
▪️ ऌ
◾ औ हा एक संयुक्त स्वर आहे, जो आ + उ/ऊ यांच्या एकत्रिकरणातून बनतो.
Question : 25
पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते ?
▪️ ए , ऐ , ओ , औ
▪️ अ , इ , ई , उ
▪️ अ , इ , उ , ऌ
▪️ आ , इ , ई , उ
◾ ए, ऐ, ओ, औ हे सर्व संयुक्त स्वर आहेत

Your Scorecard

Total Questions 0
Solved Question 0
Correct 0
Wrong 0
Final Score :   0 / 0


मराठी व्याकरण सराव पेपर सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मराठी भाषेचा उगम व व्याकरण प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वर्णमाला प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
प्रश्नसंच - 5
प्रश्नसंच - 6
प्रश्नसंच - 7
संधी आणि संधीचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दांच्या जाती प्रश्नसंच - 1
नाम व नामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा वचनविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा लिंगविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
सामान्यरूप प्रश्नसंच - 1
सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विशेषण आणि विशेषणाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापद व क्रियापदाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापदाचे काळ व अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियाविशेषण अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
उभयान्वयी अव्यय प्रश्नसंच - 1
केवलप्रयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रयोग व प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यांचे प्रकार - वाक्य रूपांतर प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
समास व समासाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
अलंकार व अलंकाराचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
रस व प्रकार प्रश्नसंच - 1
वृत्ते आणि प्रकार प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यपृथक्करण प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - सिद्ध शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - साधित शब्द प्रश्नसंच - 2
शब्दांच्या शक्ती / शब्दशक्ती प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विरामचिन्हे प्रश्नसंच - 1
शुद्धलेखन प्रश्नसंच - 1
शुद्ध - अशुद्ध शब्द प्रश्नसंच - 1
समूहदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
ध्वनिदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसमूहाबद्दल एक शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
म्हणी व त्यांचे अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
वाक्प्रचार व अर्थ प्रश्नसंच - 1
समानार्थी शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
विरुद्धार्थी शब्द प्रश्नसंच - 1
अलंकारिक शब्द प्रश्नसंच - 1
साहित्यिक व त्यांची टोपण नावे प्रश्नसंच - 1
संत व त्यांची मूळ गावे प्रश्नसंच - 1
संत साहित्य प्रश्नसंच - 1
साहित्य व साहित्यकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2


🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्‍या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्‍यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा

🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या

© MPSC Battle — Marathi Grammar Practice Question | Marathi Vyakaran Sarav Paper

Post a Comment

Previous Post Next Post