Marathi Grammar Test & Marathi Vyakaran Practice Question | मराठी व्याकरण टेस्ट - 1
Marathi Grammar Mock Test | Marathi Vyakaran Online Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 01
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे --------
▪️ भाषा
▪️ लिपी
▪️ वाक्य
▪️ शब्द
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास ----------- म्हणतात ?
▪️ वाक्य
▪️ वर्ण
▪️ शब्द
▪️ अक्षर
ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात ?
▪️ अक्षर
▪️ शब्द
▪️ संधी
▪️ जोडाक्षर
मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत सध्या किती वर्णांचा समावेश होतो ?
▪️ 36
▪️ 48
▪️ 52
▪️ 24
सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात ?
▪️ नाम
▪️ सर्वनाम
▪️ क्रियापद
▪️ विशेषण
खालीलपैकी नाम नसलेला शब्द कोणता ?
▪️ अजय
▪️ पुणे
▪️ हत्ती
▪️ सुंदर
'मी आंबा खातो' या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
▪️ मी
▪️ आंबा
▪️ खातो
▪️ वाक्य
'मुलगी सुंदर गाणे गाते' या वाक्यातील विशेषण कोणते ?
▪️ मुलगी
▪️ सुंदर
▪️ गाणे
▪️ गाते
'आम्ही' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?
▪️ प्रथम पुरुषवाचक
▪️ द्वितीय पुरुषवाचक
▪️ तृतीय पुरुषवाचक
▪️ दर्शक सर्वनाम
तो भरभर चालतो . या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा ?
▪️ तो
▪️ भरभर
▪️ चालतो
▪️ क्रिया
आई आणि वडील या शब्दांमधील 'आणि' हे कोणते अव्यय आहे ?
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
▪️ केवलप्रयोगी अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
अरे बापरे! या शब्दांमधून कोणती भावना व्यक्त होते ?
▪️ आनंद
▪️ दुःख
▪️ आश्चर्य
▪️ राग
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
▪️ चंद्र, चांदणी
▪️ रवी, भास्कर
▪️ पृथ्वी, आकाश
▪️ पवन, वायू
'ज्येष्ठ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
▪️ मोठा
▪️ धाकटा
▪️ लहान
▪️ कनिष्ठ
खालीलपैकी अनेकवचन शब्द कोणता ?
▪️ घर
▪️ झाड
▪️ मुले
▪️ पुस्तक
'राजा' या शब्दाचे लिंग ओळखा ?
▪️ स्त्रीलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुंसकलिंग
▪️ उभयलिंगी
मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते ?
▪️ रोमन लिपी
▪️ देवनागरी लिपी
▪️ मोडी लिपी
▪️ ब्राम्ही लिपी
समास म्हणजे काय ?
▪️ दोन किंवा अधिक शब्द जोडण्याची क्रिया
▪️ शब्दांची फोड करण्याची क्रिया
▪️ दोन वाक्यांना जोडण्याची क्रिया
▪️ शब्दांच्या जाती बदलण्याची क्रिया
'वनभोजन' या शब्दाचा विग्रह ओळखा
▪️ वन आणि भोजन
▪️ वनात केलेले भोजन
▪️ वन किंवा भोजन
▪️ वन व भोजन
मराठीतील 'उकार' कोणत्या स्वरूपात लिहितात ?
▪️ ं, ः
▪️ ा, ी
▪️ ु, ू
▪️ े, ै
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल
Om rahul dhende
ReplyDelete