Marathi Grammar Test | Marathi Vyakaran Quiz | मराठी व्याकरण टेस्ट - 2
Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण टेस्ट - 02
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?
● आठ
● बारा
● दहा
● चार
नाम , सर्वनाम , विशेषण , क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत ?
● एकवचनी
● अविकारी
● विकारी
● अनेकवचनी
खालील अलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा - अष्टपैलू
● सर्वगुणसंपन्न
● आठवडा
● आठ पैलू असलेला
● यापैकी नाही
'अज' या शब्दाचा एक अर्थ बोकड ; तर दुसरा अर्थ कोणता ?
● पाणी
● राक्षस
● गाढव
● ईश्वर
विरुद्ध अर्थाचे शब्द सांगा - अबोल
● वाचाळ
● नाशिवंत
● अवजड
● नापीक
सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा ?
● शेवट करणे
● ओनामा करणे
● समझोता करणे
● सोंग करणे
'कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात' ही म्हण कोणत्या बोली भाषेतील आहे ?
● वऱ्हाडी
● मालवणी
● सातारी
● हलबी
आयदाना या शब्दाचा अर्थ सांगा ?
● फुकटचे खाणारा
● मोफत पाणी मिळण्याची सोय
● जेवणासाठी लागणारी भांडी
● डोंगरात कोसळणारा धबधबा
पुढील शब्दातील भाषिकदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा ?
● गृहजावई
● बलाकमाला
● वैनतेय
● सच्छील
संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
● अपूर्ण विराम
● पूर्णविराम
● अर्धविराम
● स्वल्पविराम
' ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ' हे विधान कोणत्या अलंकाराचे आहे ?
● उत्प्रेक्षा अलंकार
● यमक अलंकार
● रूपक अलंकार
● उपमा अलंकार
कमीत कमी शब्दात सामासिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरण म्हणजे ---------
● समास
● विग्रह
● संधी
● वाक्य पृथक्करण
रामास वनवास मिळाला . अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा ?
● चतुर्थी
● द्वितीया
● सप्तमी
● षष्ठी
' खारीक ' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा ?
● खारका
● खारीक
● खारी
● खार्का
नामाच्या रूपावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
● स्त्रीलिंगी
● पुल्लिंगी
● नपुसकलिंगी
● उभयलिंगी
अबब ! केवढी प्रचंड आग ही ! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
● उद्गारार्थी
● प्रश्नार्थी
● आज्ञार्थी
● स्वार्थी
' मला जिना चढवतो ' या वाक्यातील प्रयोग कोणता ?
● शक्य कर्मणी
● समापन कर्मणी
● नवीन कर्मणी
● पुराण कर्मणी
संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरुन ओळखावीत ?
● किंवा-परंतु
● आणि-व
● जर-तर
● वा-अन्
खालील शब्दापैकी अविकारी शब्द कोणता ?
● आणि
● चांगला
● कोण
● हिमालय
नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात ?
● समास
● प्रयोग
● संधी
● विभक्ती
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल