Marathi Vyakaran Practice Questions & Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट - 7
Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण टेस्ट - 07
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात ?
▪️ वर्ण
▪️ अक्षर
▪️ शब्द
▪️ वाक्य
"गाय गुराख्याकडून बांधली जाते." या वाक्यातील प्रयोग कोणता ?
▪️ कर्तरी प्रयोग
▪️ कर्मकर्तरी प्रयोग
▪️ भावे प्रयोग
▪️ कर्मणी प्रयोग
खालीलपैकी प्रशंशा दर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणती आहेत ?
▪️ अरेच्चा , अबब
▪️ शाब्बास , वाहवा
▪️ अच्छा , जीहां
▪️ इश्श , छी
'चमचम' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे ?
▪️ गतिदर्शक
▪️ स्थिती दर्शक
▪️ प्रकार दर्शक
▪️ अनुकरण दर्शक
फणस हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?
▪️ कोकणी
▪️ तामिळी
▪️ पोर्तुगीज
▪️ उर्दू
'गीता , सीता पेक्षा उंच आहे' या वाक्यातील विभक्ती प्रतिरुपक अव्यय कोणते ?
▪️ पेक्षा
▪️ आहे
▪️ उंच
▪️ ला
' ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ' हे विधान कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ अनन्वय अलंकार
वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे ------------
▪️ वाक्य रूपांतर
▪️ वाक्य पृथक्करण
▪️ वाक्य संकलन
▪️ वाक्य संयोजन
' म्हैस ' या शब्दाचा अनेकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा
▪️ म्हैशी
▪️ म्हशी
▪️ म्हैसी
▪️ म्हसी
मुसळधार पाऊस पडला . या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा ?
▪️ पाऊस
▪️ मुसळधार
▪️ पडला
▪️ वाक्यात उद्देश विस्तार नाही
-------------- हा सामासिक शब्द आहे ?
▪️ धर्मशाळा
▪️ रसातळ
▪️ समीकरण
▪️ क्षेत्रफळ
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्या वाक्यास ------------- वाक्य म्हणतात ?
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ विध्यर्थी वाक्य
▪️ गौण वाक्य
▪️ केवल वाक्य
मुनीच्छा हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोट - शब्दांतून बनला आहे ?
▪️ मुनि + इच्छा
▪️ मुनी + इच्छा
▪️ मूनी + ईच्छा
▪️ मूनि + इच्छा
शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू , पदार्थ डोळ्यासमोर येतो ती शब्दशक्ती म्हणजे -------------
▪️ अभिधा
▪️ लक्षणा
▪️ व्यंजना
▪️ यापैकी नाही
' विधूर ' या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा ?
▪️ विधवा
▪️ विधूरी
▪️ विधाती
▪️ विधात्री
' या वयात तुला असे बोलणे शोभत नाही ' या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
▪️ धातुसाधित नाम
▪️ विशेषनाम
▪️ भाववाचक नाम
▪️ सामान्यनाम
तुम्ही सर्वजण येथेच थांबा या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
▪️ विशेषण
▪️ क्रियापद
▪️ सर्वनाम
▪️ नाम
'गाडीच्या डब्यात पेटती काडी हातात धरू नये.' अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा ?
▪️ धातुसाधित विशेषण
▪️ नामसाधित विशेषण
▪️ अव्ययसाधित विशेषण
▪️ सार्वनामिक विशेषण
'सुंदर स्त्रीचे रूप तेजस्वी मोत्यांमुळे अधिकच खुलते.' या वाक्यातील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप झाले आहे ?
▪️ स्त्रीचे
▪️ मोत्यांमुळे
▪️ अधिकच
▪️ खुलते
आत , बाहेर , अलिकडे , पलिकडे ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
▪️ गतीवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ विरोधवाचक
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल