Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट - 9
Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण टेस्ट - 09
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे .........
▪️ अक्षर
▪️ शब्द
▪️ वाक्य
▪️ वर्ण
परीक्षा जवळ आल्यावर तरी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा - या वाक्याचा प्रकार ओळखा
▪️ प्रधानवाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ विध्यर्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्व बोधक अव्ययांनी जोडली तर ---------- वाक्य तयार होते
▪️ मिश्र वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
▪️ केवल वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
'कडा' या शब्दाचे सामान्य रूप ओळखा
▪️ कड्या
▪️ कड्यावर
▪️ कड्याला
▪️ कड्यावरून
"मांजर उंदीर पकडते" या वाक्यातील प्रयोग ओळखा
▪️ कर्तरी प्रयोग
▪️ कर्मणी प्रयोग
▪️ भावे प्रयोग
▪️ संकर प्रयोग
विधेय म्हणजे -----
▪️ कर्ता
▪️ कर्म
▪️ क्रियापद
▪️ विशेषण
पुढे दिलेल्या शब्दांतून शुद्ध रूप कोणते
▪️ प्रस्थावना
▪️ प्रास्तावना
▪️ प्रस्तावना
▪️ प्रास्थावना
अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे
▪️ अरबी
▪️ कानडी
▪️ तामिळी
▪️ फारसी
पिकलेले फळ खाली पडले. या वाक्यातील विशेषण ओळखा
▪️ पिकलेले
▪️ फळ
▪️ खाली
▪️ पडले
मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ? या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ यमक अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ उपमा अलंकार
सर्वनामांना --------- असे म्हणतात
▪️ प्रतिनामे
▪️ विशेष नाम
▪️ सामान्य नाम
▪️ सर्वनाम
मला टाचण्या आणून द्या . या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा
▪️ अनेकवचन
▪️ एकवचन
▪️ उभयवचन
▪️ यापैकी नाही
शब्दाचा प्रकार ओळखा ' सौंदर्य '
▪️ भाववाचक नाम
▪️ सर्वनाम
▪️ क्रियापद
▪️ क्रियाविशेषण
सहानुभूती या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते
▪️ सह + अनुभूती
▪️ सहा + अनुभूती
▪️ सहानु + भूती
▪️ सहा + नुभूती
छे छे , छट् , उंहू , हॅट - ही कोणत्या प्रकारची केवलप्रयोगी अव्यय आहेत
▪️ प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ संमतिदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय
▪️ तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय
'वारंवार' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे
▪️ आवृत्ती दर्शक
▪️ प्रश्नार्थक
▪️ स्थिती दर्शक
▪️ यापैकी नाही
'तो गाणे गात आहे.' हे वाक्य कोणत्या वर्तमान काळाचे उदाहरण आहे
▪️ साधा वर्तमान काळ
▪️ चालू वर्तमान काळ
▪️ पूर्ण वर्तमान काळ
▪️ रीती वर्तमान काळ
' बोका ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ? अचूक पर्याय निवडा
▪️ बोकी
▪️ बोकीन
▪️ भाटी
▪️ मांजर
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात
▪️ सामान्य रूप
▪️ संयुक्त व्यंजन
▪️ संधी
▪️ साधित शब्द
करिता , निमित्त , स्तव , प्रीत्यर्थ , अर्थी , कारणे ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत
▪️ संग्रहवाचक
▪️ हेतूवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल