Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 6
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 06
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण सराव टेस्ट सिरीज
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Marathi grammar online test,Marathi grammar mock test,Marathi vyakaran online test,Marathi grammar quiz,Marathi vyakaran mock test,Marathi grammar test paper,Marathi grammar online test free,Free marathi grammar mock test,Marathi vyakaran practice set,Marathi grammar online quiz free,Marathi vyakaran test series free,Marathi grammar question paper pdf,TCS pattern marathi vyakaran online test series,TCS Pattern Marathi Vyakaran Mock Test,मराठी व्याकरण मॉक टेस्ट,मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,मराठी व्याकरण सराव पेपर,मराठी ग्रामर प्रश्न
'क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणतात ?
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
▪️ केवलप्रयोगी अव्यय
'हात टेकणे' या वाक्प्रचाराचा अचूक व्यावहारिक अर्थ काय ?
▪️ हाताला आधार देणे
▪️ शरण याणे
▪️ नमस्कार करणे
▪️ जमिनीवर हात ठेवणे
'नदी' या नामाचे अनेकवचनी रूप खालीलपैकी कोणते होईल ?
▪️ नद्या
▪️ नदीच
▪️ नद्यांना
▪️ नद्यां
'अतिवृष्टी' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा
▪️ महापूर
▪️ अनावृष्टी
▪️ सुवृष्टी
▪️ कमी पाऊस
'समुद्र' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?
▪️ रत्नाकर
▪️ सिंधू
▪️ सागर
▪️ सरिता
खालील अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा - जमदग्नी
▪️ थोर पुरुष
▪️ हडकुळा
▪️ खूप रागीट माणूस
▪️ बावळट
सर्वनामाचा प्रकार ओळखा : 'जो'
▪️ दर्शक सर्वनाम
▪️ अनिश्चित सर्वनाम
▪️ पुरुषवाचक सर्वनाम
▪️ संबंधी सर्वनाम
विभक्तीच्या रूपामुळे वाक्यातील शब्दा - शब्दांमधील जे संबंध जोडले जातात त्यांना काय म्हणतात ?
▪️ विभक्तीचे अर्थ
▪️ उपपदविभक्ती
▪️ उपपदसंबंध
▪️ यापैकी नाही
शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?
▪️ संधी
▪️ अलंकार
▪️ समास
▪️ शब्दसिद्धी
कवीच्छा या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?
▪️ इ + इ
▪️ ई + ई
▪️ इ + ई
▪️ ई + इ
'त्याने सर्व पेरू खाल्ले' या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा
▪️ अनिश्चित संख्यावाचक
▪️ संख्यावाचक
▪️ गणनावाचक
▪️ यापैकी नाही
पासून , पर्यंत , मधून , खालून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
▪️ कालदर्शक
▪️ हेतूवाचक
▪️ गतिवाचक
▪️ तुलनावाचक
पुढील नकारार्थी वाक्याचे अचूक होकारार्थी वाक्य तयार करा - अपमान केल्यास कुणाला राग येत नाही
▪️ अपमान केल्यास राग येतो
▪️ अपमानाने प्रत्येकाला राग येत असतो
▪️ अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच
▪️ अपमानाने सर्वांना राग येतो
पहिले पद प्रमुख असणाऱ्या समासास कोणता समास म्हणतात ?
▪️ द्वंद्व समास
▪️ अव्ययीभाव समास
▪️ तत्पुरुष समास
▪️ बहुव्रीही समास
तो म्हणे वेडा झाला . या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा ?
▪️ व्यर्थ उद्गारवाची अवयय
▪️ शब्दयोगी अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने किती प्रकार होतात ?
▪️ 9
▪️ 2
▪️ 6
▪️ 2
शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला - ' शहाण्याला शब्दाचा मार '
▪️ शहाण्या माणसाला शब्दाचा मार समजतो
▪️ शब्दाचा मार शहाण्याला समजतो
▪️ शहाण्याला शब्दाचा मार समजतोच
▪️ यापैकी नाही
पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
▪️ नपुंसकलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ स्त्रीलिंग
▪️ वरील सर्व
दिवाळीत पणत्या लावतात . या वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा
▪️ बहुवचन
▪️ एकवचन
▪️ द्विवचन
▪️ अनाम वचन
'जो येईल तो पाहिलं' या वाक्यातील 'जो-तो' हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे ?
▪️ आत्मवाचक सर्वनाम
▪️ दर्शक सर्वनाम
▪️ पुरुषवाचक सर्वनाम
▪️ संबंधी सर्वनाम
नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात ?
▪️ सर्वनाम
▪️ विशेषण
▪️ क्रियाविशेषण
▪️ क्रियापद
पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वा-कारान्त सामान्य रूप होते ?
▪️ बंधु
▪️ मोठी
▪️ सासू
▪️ कावळा
मधु लाडू खात असतो . या वाक्याचे रीती भविष्यकाळी रूप कोणते ?
▪️ मधु लाडू खातो
▪️ मधु लाडू खात असे
▪️ मधुने लाडू खाल्ला असेल
▪️ मधू लाडू खात जाईल
क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुनः पुन्हा हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
▪️ कालदर्शक
▪️ सातत्यदर्शक
▪️ आवृत्तीदर्शक
▪️ वारंवारिता
कर्मणीप्रयोग कर्तरीप्रयोगाचे मिश्रण होते म्हणून याला कोणता प्रयोग म्हणतात ?
▪️ कर्म-भाव संकर प्रयोग
▪️ कर्तृ-कर्म-संकर प्रयोग
▪️ कर्तृ-भाव-संकर प्रयोग
▪️ पुराण कर्मणी प्रयोग
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा