Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 8
एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 08
Marathi Grammar Test & Marathi Vyakaran Practice Question | मराठी व्याकरण टेस्ट - 8
मुळे , करवी , द्वारा , कडून , हाती ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
▪️ संबंधवाचक
▪️ स्थलवाचक
▪️ करणवाचक
▪️ साहचर्यवाचक
खालील वाक्यातील काळ ओळखा ? लतादीदी सुरेल भावगीत गात होत्या
▪️ रिति वर्तमान काळ
▪️ चालू भूतकाळ
▪️ साधा भविष्यकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
बोलका पोपट उडून गेला . अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा ?
▪️ धातुसाधित
▪️ विशेषण
▪️ अनिश्चित
▪️ विशेषण नाही
' विद्वान ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
▪️ विदुषी
▪️ विद्वानी
▪️ विद्वाती
▪️ यापैकी नाही
खालीलपैकी कोणता एक सर्वनामाचा प्रकार नाही ?
▪️ भाववाचक सर्वनाम
▪️ दर्शक सर्वनाम
▪️ संबंधी सर्वनाम
▪️ अनिश्चित सर्वनाम
तुझ्या घरी कोण कोण आहे . अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ?
▪️ सप्तमी
▪️ षष्ठी
▪️ तृतीया
▪️ पंचमी
मराठीतील मूळ सर्वनामापैकी वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत ?
▪️ तीन
▪️ पाच
▪️ दोन
▪️ चार
भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा ?
▪️ नवल - नवेली
▪️ शूर - शौर्य
▪️ गंभीर - गांभीर्य
▪️ सुंदर - सौंदर्य
संधी करा : मिष्टान्न
▪️ मिष्ट + अन्न
▪️ मिष्टा + आन्न
▪️ मिष्टां + अन्न
▪️ मिष्ट + आंन्न
वैशालीचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे . या वाक्यातील अलंकार ओळखा ?
▪️ भ्रान्तिमान अलंकार
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
आम्ही पाची भावंडे पुण्यात शिकलो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा ?
▪️ गणनावाचक
▪️ पृथ्थकत्ववाचक
▪️ क्रमवाचक
▪️ आवृत्तीवाचक
मराठीत विभक्तीचे किती प्रकार मानले जातात ?
▪️ 8
▪️ 10
▪️ 6
▪️ 4
पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा - व्यायाम शरीरप्रकृतीस हितावह आहे ?
▪️ होकारार्थी वाक्य
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ नकारार्थी वाक्य
▪️ केवल वाक्य
आपला , बापडा , बेटे , वेडे , म्हणे - ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत ?
▪️ व्यर्थ उद्गारवाची अव्यय
▪️ शब्दयोग्य अव्यय
▪️ क्रियाविशेषण अव्यय
▪️ उभयान्वयी अव्यय
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास ......... म्हणतात
▪️ अक्षर समूह
▪️ वाक्य
▪️ वर्ण
▪️ शब्द
अभ्यास केला असता तर तो नापास झाला नसता या वाक्याचा प्रकार कोणता ?
▪️ संकेतार्थी वाक्य
▪️ आज्ञार्थी वाक्य
▪️ विद्यर्थी वाक्य
▪️ मिश्र वाक्य
‘पक्षी आकाशात उडाला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
▪️ भावे प्रयोग
▪️ कर्मणी प्रयोग
▪️ अकर्मक कर्तरी प्रयोग
▪️ सकर्मक कर्तरी प्रयोग
खालील शब्दातील क्रियाविशेषण ओळखा
▪️ दहा
▪️ परंतु
▪️ इथे
▪️ साठी
'अ' कारान्त पुल्लिंग नामाची सामान्य रूपे ............ होतात ?
▪️ 'आ' कारान्त
▪️ 'वा' कारान्त
▪️ 'इ' कारान्त
▪️ 'ऊ' कारान्त
भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला . या वाक्यातील विधेय कोणते ?
▪️ भारतीय
▪️ क्रिकेट
▪️ जिंकला
▪️ विश्वचषक
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा