Marathi Vyakaran Mock Test & Grammar Questions | मराठी व्याकरण टेस्ट - 5
Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण टेस्ट - 05
🎯 एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
📌 महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुमच्या कमजोर घटकांकडे लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾२० पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की शेअर करा
📝 टेस्ट सुरू करण्यासाठी खाली दिलेल्या स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
Marathi Grammar Test
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ..........
▪️ भाषा
▪️ लिपी
▪️ वाक्य
▪️ शब्द
"तू घरी जायचे होतेस" या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
▪️ भावे प्रयोग
▪️ कर्तृ-भाव संकर प्रयोग
▪️ कर्म-भाव संकर प्रयोग
▪️ कर्तृ-कर्म संकर प्रयोग
नंतर , आधी , पुढे , पुर्वी ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत ?
▪️ कालदर्शक
▪️ हेतूवाचक
▪️ व्यतिरेकवाचक
▪️ तुलनावाचक
'जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे .' या वाक्यातील सामान्य रूप ओळखा ?
▪️ सुंदर
▪️ वेलीला
▪️ जुईच्या
▪️ फूल
तुम्ही पुढे व्हा , मी आलोच . या विधानातील काळ ओळखा ?
▪️ वर्तमान काळ
▪️ भूतकाळ
▪️ भविष्यकाळ
▪️ रीती वर्तमान काळ
'दोनदा' हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
▪️ क्रमवाचक
▪️ आवृत्तीवाचक
▪️ सातत्यवाचक
▪️ गुणवाचक
गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल ? अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य तयार करा
▪️ गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबू शकणार नाही
▪️ गर्दीत म्हातारा जास्त वेळ थांबणार नाही
▪️ गर्दीत जास्त वेळ थांबणे म्हाताऱ्यास अशक्य आहे
▪️ गर्दीत म्हातारा किती वेळ थांबू शकणार आहे
पुढील वाक्यातील अलंकार ओळखा ? 'हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला
'गोविंदाचे बोलून झाले' या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा
▪️ षष्ठी
▪️ चतुर्थी
▪️ पंचमी
▪️ द्वितीया
ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो त्यास --------- वाक्य म्हणतात
▪️ प्रश्नार्थक वाक्य
▪️ मिश्र वाक्य
▪️ करणरूपी वाक्य
▪️ संयुक्त वाक्य
पुढील शब्दाचे अनेकवचन लिहा - गाय
▪️ गाई
▪️ गायी
▪️ गया
▪️ गाया
कलानंद या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते ?
▪️ आ + आ
▪️ अ + आ
▪️ अ + अ
▪️ आ + अ
कुत्र्याने चावा घेतला ? अधोरेखित शब्दाचे नाम ओळखा ?
▪️ कुत्रा
▪️ कुत्र्या
▪️ कुत्र्याने
▪️ कुत्र्याचा
लिंग हे नामाच्या ........... ओळखले जाते
▪️ रूपावरून
▪️ स्थानावरून
▪️ जातीवरून
▪️ अर्थावरून
चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला . या वाक्यातील ' म्हणून ' या अव्ययास काय म्हणतात ?
▪️ न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
' तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो ' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा ?
▪️ कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
▪️ प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय
'आकाशपाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
▪️ खूप परिश्रम करणे
▪️ भूकंप होणे
▪️ संकटास सामोरे जाणे
▪️ नैसर्गिक आपत्ती कोसळणे
🕛 20:00
Your Result
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score :
/
(%)
Question Analysis
🏷️ महत्त्वाची सुचना : या टेस्ट मध्ये काही त्रुटी असतील किंवा माॅक टेस्ट सुधारण्यासाठी सूचना असल्यास, कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला मराठी व्याकरण टेस्ट मध्ये योग्य तो बदल करता येईल
🌐 नियमित सरावासाठी आमच्या MPSC Battle संकेतस्थळाला दररोज भेट द्या . येथे आम्ही तुमच्या तयारीसाठी Marathi Grammar Test नियमितपणे अपडेट करत असतो. नवीन प्रश्नसंच सोडवा, चुका ओळखा आणि तुमची तयारी अधिक मजबूत करा
🔂 हि टेस्ट तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये शेअर करा,जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या फ्री Marathi Grammar Test चा फायदा घेता येईल