Marathi Grammar Online Test & Vyakaran Question Paper | मराठी व्याकरण टेस्ट - 4
एमपीएससी राज्यसेवा, गट ब व गट क, वनरक्षक भरती, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण टेस्ट
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 04
Marathi Grammar Test & Marathi Vyakaran Practice Question | मराठी व्याकरण टेस्ट - 4
भाषा म्हणजे .............
▪️ विचार व्यक्त करण्याचे साधन
▪️ संभाषणाची कला
▪️ लिहिण्याची कला
▪️ बोलण्याची कला
' म्हणून , म्हणजे , की , जे ' हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?
▪️ उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ संकेतबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय
▪️ कारणबोधक उभयान्वयी अव्यय
'तो रोज व्यायाम करत असे.' हे वाक्य कोणत्या भूतकाळाचे उदाहरण आहे ?
▪️ अपूर्ण भूतकाळ
▪️ पूर्ण भूतकाळ
▪️ रीती भूतकाळ
▪️ साधा भूतकाळ
' सुया ' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?
▪️ स्त्रीलिंग
▪️ पुल्लिंग
▪️ नपुंसकलिंग
▪️ उभयलिंग
मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात ?
▪️ तीन
▪️ चार
▪️ पाच
▪️ दोन
पुढील वाक्यातील अधोरेखित केलेले नाम कोणत्या विभक्तीत आहे ते लिहा – मला परीक्षेची भीती वाटते
▪️ षष्ठी
▪️ सप्तमी
▪️ चतुर्थी
▪️ पंचमी
गाय : वासरु : तसे हरीण : ..........
▪️ लेकरु
▪️ करडु
▪️ शावक
▪️ रेडकू
मूळ वर्णमालेत वर्णांची संख्या किती होती ?
▪️ 48
▪️ 34
▪️ 52
▪️ 54
समूहदर्शक शब्द लिहा - नाण्यांची
▪️ थप्पी
▪️ चळत
▪️ उतरंड
▪️ चवड
खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?
▪️ विशिष्ट
▪️ विशिष्ठ
▪️ विशीष्ट
▪️ विशीष्ठ
बरेवाईट या शब्दाचा समास कोणता ?
▪️ वैकल्पिक द्वंद्व समास
▪️ समाहार द्वंद्व समास
▪️ इतरेतर द्वंद्व समास
▪️ यापैकी नाही
कठीण समय येता कोण कामास येतो ? या वाक्याचा प्रकार ओळखा
▪️ प्रधान वाक्य
▪️ प्रश्नार्थक वाक्य
▪️ विधानार्थी वाक्य
▪️ विध्यर्थी वाक्य
कुत्रे या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
▪️ कुत्री
▪️ कुत्रा
▪️ कूत्रि
▪️ कूत्रे
एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी नामापूर्वी सर्वनामाचा उपयोग केल्यास अशा सर्वनामास काय म्हणतात ?
▪️ नामसाधित विशेषण
▪️ आधि विशेषण
▪️ सर्वनामिक विशेषण
▪️ विधि विशेषण
कंसातील शब्दांचे सामान्य रूप निवडा ? माझ्या (अंगण) एक वडाचे झाड आहे
▪️ अंगणाला
▪️ अंगणाशी
▪️ अंगणाचे
▪️ अंगणा
काळाचे मुख्य किती प्रकार आहेत ?
▪️ चार
▪️ तीन
▪️ सहा
▪️ पाच
पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत ?
1. स्थलवाचक 2. करणवाचक 3. हेतूवाचक 4. व्यतिरेकवाचक 5. तुलनावाचक 6. योग्यतावाचक
▪️ फक्त 1,3,6
▪️ फक्त 2,4,5,6
▪️ फक्त 1,3,4
▪️ वरील सर्व
मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही . या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा ?