Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 25
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 25
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण सराव टेस्ट सिरीज
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Marathi grammar online test,Marathi grammar mock test,Marathi vyakaran online test,Marathi grammar quiz,Marathi vyakaran mock test,Marathi grammar test paper,Marathi grammar online test free,Free marathi grammar mock test,Marathi vyakaran practice set,Marathi grammar online quiz free,Marathi vyakaran test series free,Marathi grammar question paper pdf,TCS pattern marathi vyakaran online test series,TCS Pattern Marathi Vyakaran Mock Test,मराठी व्याकरण मॉक टेस्ट,मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,मराठी व्याकरण सराव पेपर,मराठी ग्रामर प्रश्न
'भिकाऱ्याला त्याने एक रुपया दिला.' या वाक्यातील 'भिकाऱ्याला' या शब्दाचा कारकार्थ ओळखा ?
❶ कर्ता
❷ कर्म
❸ संप्रदान
❹ अपादान
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा ? मराठी महिने व ऋतू
❶ चैत्र-वैशाख : वसंत
❷ ज्येष्ठ-आषाढ : ग्रीष्म
❸ श्रावण-भाद्रपद : शरद
❹ अश्विन-कार्तिक : शरद
'ऐहिक' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ पारलौकिक
❷ लौकिक
❸ सांसारिक
❹ अनैहिक
खालीलपैकी कोणत्या वाक्यात 'परिणामबोधक' उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे ?
❶ तो उत्तीर्ण झाला कारण त्याने खूप अभ्यास केला होता
❷ विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली
❸ मरावे परी कीर्तीरूपे उरावे
❹ त्याने अहोरात्र मेहनत केली, म्हणून तो परीक्षेत पहिला आला
'खायला काळ, भुईला भार' या म्हणीचा अचूक अर्थ काय ?
❶ खूप जेवण करणारा माणूस.
❷ निरुपयोगी माणूस जो केवळ इतरांवर किंवा पृथ्वीवर बोजा ठरतो.
❸ शेती न करणारा माणूस.
❹ आळशी व्यक्ती.
'पुढीलपैकी कोणता शब्द 'सिंह' या शब्दाचा समानार्थी नाही ?'
❶ केसरी
❷ पंचानन
❸ मृगेंद्र
❹ कुंजर
'मनोरथ' या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा ?
❶ मनो + रथ
❷ मन + रथ
❸ मनः + रथ
❹ मनोः + रथ
उंट या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते ?
❶ उंटे
❷ उंट्या
❸ उंट
❹ उंटांना
'आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन' या म्हणीचा अचूक अर्थ काय ?
❶ अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक किंवा जास्त लाभ होणे.
❷ देवाची कृपा होणे.
❸ अंधळेपणा दूर होणे.
❹ उगीचच आनंद होणे.
'आईने बाळाला निजविले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
❶ शक्य क्रियापद
❷ प्रयोजक क्रियापद
❸ सिद्ध क्रियापद
❹ अनियमित क्रियापद
'पाणि' (ण ला पहिली वेलांटी) या शब्दाचा अर्थ काय होतो ?
❶ जल
❷ हात
❸ डोळा
❹ पाय
अमृत या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?
❶ पीयूष
❷ व्योम
❸ संजीवनी
❹ सुधा
'तो गावोगावी भटकत फिरला.' या वाक्यातील 'गावोगावी' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ तत्पुरुष समास
❷ द्वंद्व समास
❸ अव्ययीभाव समास
❹ बहुव्रीहि समास
'मुलांनो, सर्वांनी रांगेत उभे राहा.' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ विधानार्थी वाक्य
❷ संकेतार्थी वाक्य
❸ विद्यार्थी वाक्य
❹ आज्ञार्थी वाक्य
'पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा ?'
❶ उतिर्ण
❷ उत्तीर्ण
❸ ऊत्तीर्ण
❹ उतीर्न
'शब्दांच्या एकूण किती जाती आहेत ?'
❶ चार
❷ सहा
❸ आठ
❹ दहा
'भाजीपाला' या शब्दाचा समास ओळखा ?
❶ इतरेतर द्वंद्व समास
❷ समाहार द्वंद्व समास
❸ वैकल्पिक द्वंद्व समास
❹ मध्यमपदलोपी समास
'शेतकरी शेतात राबत होता.' या वाक्यातील काळ ओळखा ?
❶ साधा भूतकाळ
❷ रिती भूतकाळ
❸ पूर्ण भूतकाळ
❹ अपूर्ण भूतकाळ
'खग' या शब्दाचा अचूक अर्थ काय ?
❶ आकाश
❷ पक्षी
❸ हरीण
❹ बाण
'रामाने रावणाला बाणाने मारले.' या वाक्यातील 'बाणाने' या शब्दाचा कारकार्थ कोणता ?
❶ कर्ता
❷ कर्म
❸ करण
❹ अपादान
'स्वतःचे दोष न पाहता इतरांच्या दोषांवर बोट ठेवणे' या अर्थाची म्हण ओळखा ?
❶ आपलेच दात नि आपलेच ओठ
❷ घरोघरी मातीच्या चुली
❸ आंधळा दळतो नि कुत्रं पीठ खातं
❹ जात्यातले रडतात नि सुपातले हसतात
'कवी' या शब्दाचे अनेकवचन काय होईल ?
❶ कवी
❷ कवयित्री
❸ कवी वर्ग
❹ कव्या
'वारा' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?
❶ पवन
❷ मारुत
❸ अनिल
❹ सलील
'नवल वाटणे' या अर्थाचा योग्य वाक्प्रचार कोणता ?
❶ अचंबा वाटणे
❷ डोळे उघडणे
❸ आनंद गगनात न मावणे
❹ हात देणे
'आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
❶ केवळ वाक्य
❷ संयुक्त वाक्य
❸ मिश्र वाक्य
❹ प्रधान वाक्य
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा