वर्णमाला मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
Question : 1
खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते ? योग्य पर्याय निवडा
Correct Answer: त् + य् = त्य्
'त् + य् = त्य्' हे संयुक्त व्यंजनाचे योग्य उदाहरण आहे
Question : 2
भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना ........ स्वर म्हणतात
Correct Answer: विजातीय
भिन्न उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना 'विजातीय स्वर' असे म्हणतात . उदा. अ-इ , अ-उ , उ-ई , इ-ऊ
Question : 3
खालीलपैकी विजातीय स्वरांची / च्या जोडी / ड्या सांगा ?
Correct Answer: वरील सर्व
वरील सर्व जोड्या (अ-इ, अ-उ, उ-ई) विजातीय स्वरांच्या आहेत, कारण त्यांचे उच्चारस्थान भिन्न आहेत
Question : 4
पुढील स्वर जोड्यातून विजातीय स्वर जोडी असलेला पर्याय निवडा ?
Correct Answer: अ - ई
अ-ई ही जोडी विजातीय स्वरांची आहे, कारण दोन्ही स्वरांचे उच्चारस्थान वेगवेगळे आहे. बाकीच्या जोड्या (अ-आ, इ-ई, उ-ऊ) सजातीय आहेत
Question : 5
स्वरमालेतील अं आणि अ: या दोन वर्णाना काय म्हणतात ?
Correct Answer: स्वरादी
अं (अनुस्वार) आणि अः (विसर्ग) यांना 'स्वरादी' म्हणतात, कारण ते स्वरावर अवलंबून असतात
Question : 6
खालीलपैकी जोडाक्षराने युक्त अचूक शब्द ओळखा
Correct Answer: पत्नी
'पत्नी' या शब्दात 'त्' आणि 'न्' ही दोन व्यंजने एकत्र येऊन जोडाक्षर तयार झाले आहे.
Question : 7
ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना काय म्हणतात ?
Correct Answer: व्यंजन
Question : 8
मराठी भाषेतील आधुनिक वर्णमालेत एकूण किती व्यंजनांचा समावेश होतो ?
Correct Answer: 34
Question : 9
खालीलपैकी कोणते जोडाक्षर नाही
Correct Answer: कृ
'कृ' हे जोडाक्षर नाही. 'क' हे व्यंजन आणि 'ऋ' हा स्वर आहे.
Question : 10
व्यंजनास -------------- असेही म्हणतात
Correct Answer: परवर्ण
व्यंजनांना 'परवर्ण' किंवा 'स्वरान्त' असेही म्हणतात . कारण - त्यांचा उच्चार स्वरांवर अवलंबून असतो .
व्यंजनांचा उच्चार पूर्ण / स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते म्हणून त्यांना स्वरान्त म्हणतात . उदाहरणार्थ - त्+अ = त
वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत
व्यंजनांचा उच्चार पूर्ण / स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते म्हणून त्यांना स्वरान्त म्हणतात . उदाहरणार्थ - त्+अ = त
वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत
Question : 11
जोडाक्षर म्हणजे काय
Correct Answer: व्यंजन + व्यंजन
जोडाक्षर म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन स्वर मिसळणे
Question : 12
'क्ष' व 'ज्ञ' या संयुक्त व्यंजनांना वर्णमालेत कोणी स्थान दिले ?
Correct Answer: श्रीपात सबनीस
Question : 13
क्ष व ज्ञ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत ?
Correct Answer: संयुक्त व्यंजने
'क्ष' आणि 'ज्ञ' ही व्यंजने दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजने एकत्र येऊन तयार झाली आहेत, म्हणून ती 'संयुक्त व्यंजने' आहेत
उदाहरणार्थ - क्+ष्=क्ष् , द्+न्+य्=ज्ञ्
उदाहरणार्थ - क्+ष्=क्ष् , द्+न्+य्=ज्ञ्
Question : 14
खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती ?
Correct Answer: क्ष् + ज्ञ्
'क्ष्' (क् + ष्) आणि 'ज्ञ' (द् + न् + य्) हे संयुक्त व्यंजनांचे उदाहरण आहेत
Question : 15
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात ?
Correct Answer: द्वित्त
एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्याला 'द्वित्त' असे म्हणतात. उदा. क्क् (क्+क्)
Question : 16
' श्र ' हे जोडाक्षर कसे बनले
Correct Answer: श् + र् + अ
'श्र' हे जोडाक्षर 'श् + र् + अ' असे बनले आहे.
Question : 17
क् , च् , ट् , त् , प् या गटातील व्यंजनांना काय म्हणतात ?
Correct Answer: स्पर्श व्यंजने
क्, च्, ट्, त्, प् या वर्णांच्या उच्चार करताना जिभेचा तोंडातील विशिष्ट भागाला स्पर्श होतो, म्हणून त्यांना 'स्पर्श व्यंजने' म्हणतात.
आधुनिक वर्णमालेत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत
आधुनिक वर्णमालेत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत
Question : 18
आधुनिक वर्णमालेत एकूण किती स्पर्श व्यंजने आहेत ?
Correct Answer: 25
Question : 19
दोन एक सारखी व्यंजने एकत्र आली की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात ?
Correct Answer: द्वित्त
दोन एकसारखी व्यंजने एकत्र आली तर त्याला 'द्वित्त' म्हणतात. उदा. कच्चा. च्+च् = च्च्
Question : 20
ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीस काय म्हणतात ?
Correct Answer: मात्रा
Question : 21
गटात न बसणारा वर्ण कोणता ?
Correct Answer: च्
क्, ख्, ग् ही कंठ्य व्यंजने आहेत, तर च् हे तालव्य व्यंजन आहे. म्हणून च् हे गटात बसत नाही
Question : 22
दंड नसलेले व्यंजन पुढीलपैकी कोणते ?
Correct Answer: र्
'र्' या व्यंजनाला दंड नसतो
Question : 23
दिलेल्या पर्यायातून स्पर्श व्यंजन ओळखा ?
Correct Answer: ध्
ध् हे स्पर्श व्यंजन आहे, तर य्, र्, ल् हे अंतस्थ/अर्धस्वर आहेत .
वर्णमालेत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत व चार अर्धस्वर/अंतस्थ आहेत ( य् , र् , ल् , व् )
वर्णमालेत एकूण 25 स्पर्श व्यंजने आहेत व चार अर्धस्वर/अंतस्थ आहेत ( य् , र् , ल् , व् )
Question : 24
ज्या व्यंजनांचा उच्चार करणे कठीण असते अशा व्यंजनांना ........ म्हणतात
Correct Answer: कठोर व्यंजन
Question : 25
प् आणि फ् ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा ?
Correct Answer: कठोर व्यंजने
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
🔊 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
🌐 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडविण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या