संत साहित्य मराठी व्याकरण प्रश्न | Sant Sahitya MCQ Question

साहित्यविषयक प्रश्न,साहित्यिकार व त्यांचे साहित्य,Marathi Sahitya Questions,Sahityikaar ani Tyanche Sahitya,मराठी साहित्य सराव प्रश्नसंच

साहित्यविषयक प्रश्न,साहित्यिकार व त्यांचे साहित्य,Marathi Sahitya Questions,Sahityikaar ani Tyanche Sahitya,मराठी साहित्य सराव प्रश्नसंच

संत साहित्य मराठी व्याकरण

Question : 1
'भारूड' हा रचनाप्रकार कोणी रूढ केला ?
❶ संत ज्ञानेश्वर
❷ संत तुकाराम
❸ संत एकनाथ
❹ संत जनाबाई
📝 स्पष्टीकरण : मराठी साहित्यात 'भारूड' हा काव्यप्रकार प्रामुख्याने संत एकनाथ यांनी मोठ्या प्रमाणावर रूढ आणि लोकप्रिय केला. भारुडाच्या माध्यमातून त्यांनी जनमानसात नैतिक आणि आध्यात्मिक जागृती घडवून आणली
Question : 2
'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' हे वचन कोणाचे आहे
❶ संत ज्ञानेश्वर
❷ संत तुकाराम
❸ समर्थ रामदास
❹ तुकडोजी महाराज
📝 स्पष्टीकरण : 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले' हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे अत्यंत प्रसिद्ध वचन आहे. ज्या व्यक्तीच्या बोलण्यात आणि कृतीत एकवाक्यता असते, तीच व्यक्ती आदरास पात्र ठरते, असा संदेश त्यांनी यातून दिला आहे
Question : 3
'शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।' हे कोणी म्हटले आहे
❶ संत एकनाथ
❷ संत ज्ञानेश्वर
❸ समर्थ रामदास
❹ संत नामदेव
📝 स्पष्टीकरण : 'शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ।' या ओळी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवाप्रत्यर्थ लिहिल्या आहेत. त्यांनी शिवरायांच्या कर्तृत्वाचा आणि जाज्वल्य प्रतापाचा महिमा या ओळींमधून गायला आहे.
Key Points :
 ◾ समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन संत होते.
 ◾ त्यांनी 'दासबोध' आणि 'मनाचे श्लोक' या प्रसिद्ध ग्रंथांची रचना केली.
 ◾ त्यांनी तरुणांमध्ये शक्तीची उपासना वाढीस लावण्यासाठी ठिकठिकाणी हनुमान मंदिरांची आणि मठांची स्थापना केली.
Question : 4
ग्रंथ व ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या जुळवा :

गट - अ | ग्रंथ गट - ब | ग्रंथकार
अ) रुक्मिणी स्वयंवर 1) दामोदर पंडित
ब) ज्ञानबोध 2) नरेंद्र कवी
क) सह्याद्री वर्णन 3) विश्वनाथ बाळपूरकर
ड) वस्त्रहरण 4) खळोव्यास
❶ अ - 4 , ब - 3 , क - 1 , ड - 2
❷ अ - 3 , ब - 1 , क - 2 , ड - 4
❸ अ - 2 , ब - 3 , क - 4 , ड - 1
❹ अ - 1 , ब - 4 , क - 3 , ड - 2
महानुभाव पंथाचे 7 प्राचीन मराठी ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत :
 ◾रुक्मिणी स्वयंवर - नरेंद्र कवी
 ◾ज्ञानबोध - विश्वनाथ बाळपूरकर
 ◾सह्याद्री वर्णन - खळोव्यास
 ◾वस्त्रहरण - दामोदर पंडित
 ◾ऋद्धिपुरवर्णन - नारोव्यास
 ◾एकादशग्रंथ - कवी भास्करभट्ट
 ◾शिशुपालवध - भास्करभट्ट बोरीकर
Question : 5
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा :
❶ ग्रामगीता - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
❷ गीताई - विनोबा भावे
❸ माझी जन्मठेप - स्वातंत्र्यवीर सावरकर
❹ माझे सत्याचे प्रयोग - डॉ‌. एपीजे अब्दुल कलाम
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या पर्यायांपैकी चौथी जोडी अयोग्य आहे . 'माझे सत्याचे प्रयोग' (The Story of My Experiments with Truth) हे महात्मा गांधी यांचे जगप्रसिद्ध आत्मचरित्र आहे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाही.
Key Points :
 ◾ 'माझे सत्याचे प्रयोग' या ग्रंथात महात्मा गांधींनी त्यांच्या बालपणापासून ते 1921 पर्यंतच्या जीवनाचा आणि सत्य, अहिंसेच्या प्रयोगांचा आढावा घेतला आहे.
 ◾ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव 'अग्निपंख' (Wings of Fire) हे आहे.
 ◾ इतर सर्व जोड्या (ग्रामगीता - तुकडोजी महाराज, गीताई - विनोबा भावे, माझी जन्मठेप - सावरकर) पूर्णपणे बरोबर आहेत
Question : 6
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
 1. समर्थ रामदास - दासबोध
 2. संत तुकाराम - अभंगगाथा
 3. संत ज्ञानेश्वर - चांगदेव पासष्टी
 4. संत तुलसीदास - रामचरित मानस
❶ फक्त 2 आणि 3
❷ फक्त 1 आणि 2
❸ फक्त 3 आणि 4
❹ वरीलपैकी एकही नाही
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या सर्व जोड्या अत्यंत योग्य आणि अचूक आहेत. समर्थ रामदास यांनी 'दासबोध', संत तुकाराम यांनी 'अभंगगाथा', संत ज्ञानेश्वर यांनी 'चांगदेव पासष्टी' आणि संत तुलसीदास यांनी 'रामचरितमानस' या ग्रंथांची रचना केली आहे. त्यामुळे अयोग्य जोडी कोणतीही नसल्याने उत्तर 'वरीलपैकी एकही नाही' असे येईल
Key Points :
 ◾ 'चांगदेव पासष्टी' मध्ये संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना उपदेश केलेले 65 ओव्यांचे पत्र समाविष्ट आहे .
 ◾ 'दासबोध' हा ग्रंथ समर्थ रामदासांनी रायगड जिल्ह्यातील शिवथरघळ येथे लिहिला . त्याचबरोबर मनाचे श्लोक व करुणाष्टके ही त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती आहे
 ◾ 'रामचरितमानस' हा अवधी भाषेतील अत्यंत लोकप्रिय ग्रंथ आहे
Question : 7
शाहीर व त्यांचे जन्मस्थान - योग्य जोड्या जुळवा ?

गट - अ | शाहीर गट - ब | जन्मस्थान
अ) शाहीर होनाजी बाळा 1) सासवड (पुणे)
ब) शाहीर पठ्ठे बापूराव 2) वाळवा (सांगली)
क) शाहीर कृष्णराव साबळे 3) पसरणी (सातारा)
ड) शाहीर रामदास गुंड 4) पारनेर (अहिल्यानगर)
❶ अ - 4 , ब - 3 , क - 1 , ड - 2
❷ अ - 3 , ब - 1 , क - 2 , ड - 4
❸ अ - 2 , ब - 3 , क - 4 , ड - 1
❹ अ - 1 , ब - 2 , क - 3 , ड - 4
📝 महाराष्ट्रातील शाहीर व त्यांचे जन्मस्थान / मूळ गाव (जिल्हा) खालीलप्रमाणे :
 1) शाहीर अनंत फंदी | संगमनेर - अहिल्यानगर
 2) शाहीर होनाजी बाळा | सासवड - पुणे
 3) शाहीर राम जोशी | सोलापूर
 4) शाहीर प्रभाकर | गंगापूर - नाशिक
 5) शाहीर परशुराम | राजाची बावी - नाशिक
 6) शाहीर सगनभाऊ | जेजुरी - पुणे
 7) शाहीर अज्ञानदास | वाई - सातारा
 8) शाहीर तुळशीदास | पुणे
 9) शाहीर पठ्ठे बापूराव | रेठरे हरनाक्ष, वाळवा - सांगली
 10) शाहीर अमर शेख | बार्शी - सोलापूर
 11) शाहीर अण्णा भाऊ साठे | वाटेगाव - सांगली
 12) शाहीर द. ना. गव्हाणकर | कुडाळ - सिंधुदुर्ग
 13) शाहीर साबळे (कृष्णराव साबळे) | पसरणी - सातारा
 14) शाहीर लिलाधर हेगडे | मुंबई
 15) शाहीर आत्माराम पाटील | पेण - रायगड
Question : 8
काव्यग्रंथ व कवी यांच्या योग्य जोड्या जुळवा ?

गट - अ | काव्यग्रंथ गट - ब | कवी
अ) यथार्थदीपिका 1) संत ज्ञानेश्वर
ब) दासबोध 2) विशाखादत्त
क) भावार्थदीपिका 3) समर्थ रामदास
ड) मुद्राराक्षस 4) वामन पंडित
❶ अ - 3 , ब - 1 , क - 2 , ड - 4
❷ अ - 4 , ब - 3 , क - 1 , ड - 2
❸ अ - 2 , ब - 3 , क - 4 , ड - 1
❹ अ - 1 , ब - 4 , क - 3 , ड - 2
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या काव्यग्रंथ आणि कवी यांच्या योग्य जोड्या पुढीलप्रमाणे आहेत :
यथार्थदीपिका - वामन पंडित
दासबोध - समर्थ रामदास
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) - संत ज्ञानेश्वर
मुद्राराक्षस - विशाखादत्त
Key Points :
 ◾ वामन पंडित हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंडित कवी होते, ज्यांनी भगवद्गीतेवर 'यथार्थदीपिका' ही टीका लिहिली.
 ◾ संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर लिहिलेल्या टीकेला 'भावार्थदीपिका' किंवा 'ज्ञानेश्वरी' म्हटले जाते.
 ◾ 'मुद्राराक्षस' हे विशाखादत्त यांनी लिहिलेले संस्कृत ऐतिहासिक नाटक आहे, ज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्याच्या काळातील राजकारणाचे वर्णन आहे
Question : 9
अयोग्य जोडी ओळखा :
❶ शाहीर आनंद फंदी - अहिल्यानगर
❷ शाहीर राम जोशी - सोलापूर
❸ शाहीर प्रभाकर - नाशिक
❹ शाहीर अमर शेख - सांगली
📝 स्पष्टीकरण : शाहीर अमर शेख यांचा जन्म सांगली नव्हे, तर बार्शी (सोलापूर) येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल असे होते. त्यामुळे ही जोडी अयोग्य आहे
Key Points :
◾ शाहीर आनंद फंदी यांचे मूळ गाव संगमनेर (अहिल्यानगर)
◾ शाहीर राम जोशी - सोलापूर
◾ शाहीर प्रभाकर यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड असले, तरी त्यांचा जन्म गंगापूर (नाशिक) येथे झाला होता
Question : 10
अयोग्य जोडी ओळखा :
❶ शाहीर परशराम - नाशिक (सिन्नर)
❷ शाहीर अण्णाभाऊ साठे - सांगली (वाटेगाव)
❸ शाहीर होनाजी बाळा - पुणे (जेजुरी)
❹ शाहीर विठ्ठल उमप - मुंबई
📝 स्पष्टीकरण : शाहीर होनाजी बाळा यांचा जन्म जेजुरी येथे नव्हे, तर सासवड (पुणे) येथे झाला होता. त्यांचा काळ 1754 ते 1844 असा होता. त्यांनी अनेक प्रसिद्ध लावण्यांची रचना केली आहे
Question : 11
खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ?
❶ शाहीर आनंद फंदी - संगमनेर
❷ शाहीर सगनभाऊ - जेजुरी
❸ शाहीर परशराम - गंगापूर
❹ शाहीर कृष्णाराव साबळे - पसरणी
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या पर्यायांपैकी तिसरी जोडी अयोग्य आहे. शाहीर परशराम यांचे जन्मस्थान/कार्यस्थान नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (राज्याची बाबी) हे होते, गंगापूर नाही. गंगापूर हे शाहीर प्रभाकर यांचे जन्मस्थान आहे.
📌 Key Points :
◾ शाहीर आनंद फंदी हे संगमनेर (अहिल्यानगर) येथील होते, त्यांनी 'फटका' हा काव्यप्रकार लोकप्रिय केला.
◾ शाहीर सगनभाऊ हे जेजुरी येथील प्रसिद्ध शाहीर होते
◾ शाहीर कृष्णाराव साबळे (शाहीर साबळे) हे पसरणी, वाई (सातारा) येथील होते. त्यांनी गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राचे राज्यगीत आहे
Question : 12
अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा
 1. मोरोपंत - केकावली
 2. रवींद्रनाथ टागोर - गीतांजली
 3. लोकमान्य टिळक - गीतारहस्य
 4. वि‌.वा शिरवाडकर - नटसम्राट
❶ फक्त 1
❷ फक्त 1 आणि 4
❸ फक्त 2 आणि 3
❹ वरीलपैकी एकही नाही
📝 स्पष्टीकरण : दिलेल्या पर्यायांमध्ये सर्वच्या सर्व (1, 2, 3 आणि 4) जोड्या पूर्णपणे सत्य व योग्य आहेत. त्यामुळे अयोग्य जोडी कोणतीही नसल्याने पर्याय क्रमांक 4 'वरीलपैकी एकही नाही' हे अचूक उत्तर आहे
Key Points :
◾ पंडित कवी मोरोपंत यांची 'केकावली' ही रचना प्रसिद्ध आहे
◾ रवींद्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहाला 1913 मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता
◾ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना 'गीतारहस्य' हा कर्मयोगावर आधारित ग्रंथ लिहिला
◾ वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचे 'नटसम्राट' हे मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेले नाटक आहे

Your Scorecard

Total Question 0
Solved Question 0
Correct 0
Wrong 0
Final Score :   0 / 0


मराठी व्याकरण सराव पेपर सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मराठी भाषेचा उगम व व्याकरण प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वर्णमाला प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
प्रश्नसंच - 5
प्रश्नसंच - 6
प्रश्नसंच - 7
संधी आणि संधीचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दांच्या जाती प्रश्नसंच - 1
नाम व नामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा वचनविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
नामाचा लिंगविचार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विभक्ती कारकार्थ व उपपदार्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
सामान्यरूप प्रश्नसंच - 1
सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विशेषण आणि विशेषणाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापद व क्रियापदाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियापदाचे काळ व अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
क्रियाविशेषण अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
शब्दयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
उभयान्वयी अव्यय प्रश्नसंच - 1
केवलप्रयोगी अव्यय प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रयोग व प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यांचे प्रकार - वाक्य रूपांतर प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
समास व समासाचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
अलंकार व अलंकाराचे प्रकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
रस व प्रकार प्रश्नसंच - 1
वृत्ते आणि प्रकार प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
वाक्यपृथक्करण प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - सिद्ध शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसिद्धी - साधित शब्द प्रश्नसंच - 2
शब्दांच्या शक्ती / शब्दशक्ती प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
विरामचिन्हे प्रश्नसंच - 1
शुद्धलेखन प्रश्नसंच - 1
शुद्ध - अशुद्ध शब्द प्रश्नसंच - 1
समूहदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
ध्वनिदर्शक शब्द प्रश्नसंच - 1
शब्दसमूहाबद्दल एक शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
प्रश्नसंच - 4
म्हणी व त्यांचे अर्थ प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
वाक्प्रचार व अर्थ प्रश्नसंच - 1
समानार्थी शब्द प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2
प्रश्नसंच - 3
विरुद्धार्थी शब्द प्रश्नसंच - 1
अलंकारिक शब्द प्रश्नसंच - 1
साहित्यिक व त्यांची टोपण नावे प्रश्नसंच - 1
संत व त्यांची मूळ गावे प्रश्नसंच - 1
संत साहित्य प्रश्नसंच - 1
साहित्य व साहित्यकार प्रश्नसंच - 1
प्रश्नसंच - 2

Post a Comment

Previous Post Next Post