भाषेचे अलंकार मराठी व्याकरण प्रश्न | Alankar Marathi Grammar Question | अलंकारांचे प्रकार व उदाहरणे | प्रश्नसंच - 2

Practice Questions

मराठी व्याकरण प्रश्नसंच

Question : 1
भाषेच्या अलंकाराचे प्रामुख्याने किती प्रकार पडतात
▪️ 9
▪️ 2
▪️ 6
▪️ 2
Correct Answer: 2
Question : 2
भाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्मांना भाषेचे ---------------- असे म्हणतात
▪️ व्याकरण
▪️ अलंकार
▪️ प्रयोग
▪️ वृत्त
Correct Answer: अलंकार
Question : 3
हा आंबा प्रत्यक्ष साखरच . या विधानातील उपमान ओळखा
▪️ साखर
▪️ आंबा
▪️ प्रत्यक्ष
▪️ हा
Correct Answer: साखर
Question : 4
कोणत्याही वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एक किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती करून नादमयता साधली जाते तेव्हा --------------- अलंकार होतो
▪️ अनन्वय अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
Correct Answer: अनुप्रास अलंकार
Question : 5
' मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना ' अलंकार ओळखा ?
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
▪️ व्यतिरेक अलंकार
Correct Answer: अनुप्रास अलंकार
Question : 6
गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले - या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
▪️ व्यतिरेक अलंकार
▪️ रुपक अलंकार
Correct Answer: अनुप्रास अलंकार
Question : 7
आज गोकुळात रंग खेळतो हरी , राधिके जरा जपून जा तुझ्या घरी - हे विधान कोणत्या अलंकाराचे आहे
▪️ अनन्वय अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
Correct Answer: अनुप्रास अलंकार
Question : 8
'हा सूर्य नाहीच, हा तर तेजस्वी गोळा आहे.' या वाक्यात उपमेय लपवले आहे. कोणता अलंकार आहे ?
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ अन्योक्ती अलंकार
▪️ अर्थान्तरन्यास अलंकार
▪️ भ्रान्तिमान अलंकार
Correct Answer: अपन्हुती अलंकार
Question : 9
पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे ? ' कोणी दिला जिव्हाळा , कोणास ताप झाला . हसले दुरून कोणी , जवळून वार केला .
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ यमक अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ उपमा अलंकार
Correct Answer: यमक अलंकार
Question : 10
श्रीकृष्ण नवरा मी नवरी ! शिशुपाल नवरा मी न-वरी !! अधोरेखित शब्दाचा अलंकार ओळखा
▪️ अनन्वय अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
Correct Answer: श्लेष अलंकार
Question : 11
मित्राच्या उदयानं कोणाला आनंद होत नाही ? या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ यमक अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ उपमा अलंकार
Correct Answer: श्लेष अलंकार
Question : 12
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा ---------------- अलंकार होतो
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
▪️ व्यतिरेक अलंकार
Correct Answer: श्लेष अलंकार
Question : 13
वैशालीचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे . या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ भ्रान्तिमान अलंकार
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
Correct Answer: उपमा अलंकार
Question : 14
मुंबईची घरे मात्र लहान ! कबुतराच्या खुराड्यासारखी ! या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ अर्थान्तरन्यास अलंकार
▪️ भ्रान्तिमान अलंकार
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ उपमा अलंकार
Correct Answer: उपमा अलंकार
Question : 15
मेघासम तो श्याम सावळा - या वाक्यातील अलंकार ओळखा
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ अनन्वय अलंकार
Correct Answer: उपमा अलंकार
Question : 16
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी - अलंकार ओळखा
▪️ श्लेष अलंकार
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
Correct Answer: उपमा अलंकार
Question : 17
सामान्य विधान आणि विशेष उदाहरण किंवा विशेष विधान आणि सामान्य सिद्धांत यांचा संबंध दाखवणारा अलंकार कोणता ?
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अर्थान्तरन्यास अलंकार
▪️ व्यतिरेक अलंकार
Correct Answer: अर्थान्तरन्यास अलंकार
Question : 18
' ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ' हे विधान कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ अनन्वय अलंकार
Correct Answer: उत्प्रेक्षा अलंकार
Question : 19
'बोलाची कढी व बोलाचाच भात' या वाक्यात कोणता अलंकार वापरला आहे ?
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ दृष्टांत अलंकार
Correct Answer: दृष्टांत अलंकार
Question : 20
एकाच शब्दातून दोन किंवा अधिक अर्थ निघत असतील, तर कोणता अलंकार होतो ?
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
Correct Answer: श्लेष अलंकार
Question : 21
उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
▪️ अनन्वय अलंकार
▪️ रुपक अलंकार
Correct Answer: अपन्हुती अलंकार
Question : 22
'देवा, तूच आहेस माझा मायबाप !' या उदाहरणातील अलंकार कोणता ?
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ उपमा अलंकार
▪️ रुपक अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
Correct Answer: रुपक अलंकार
Question : 23
उपमेय लपवून त्याच्या जागी उपमानच आहे, असे जेव्हा सांगितले जाते, तेव्हा कोणता अलंकार होतो ?
▪️ चेतनागुणोक्ती अलंकार
▪️ उपमा अलंकार
▪️ उत्प्रेक्षा अलंकार
▪️ अपन्हुती अलंकार
Correct Answer: अपन्हुती अलंकार
Question : 24
आईसारखी मायाळू आईच ! अलंकार ओळखा
▪️ अनन्वय अलंकार
▪️ रुपक अलंकार
▪️ अतिशयोक्ती अलंकार
▪️ दृष्टांत अलंकार
Correct Answer: अनन्वय अलंकार
Question : 25
अंधारात तळपतो तो कागद की दिवा ?' या वाक्यात कोणता अलंकार आहे ?
▪️ संदेह अलंकार
▪️ श्लेष अलंकार
▪️ अनुप्रास अलंकार
▪️ विरोधाभास अलंकार
Correct Answer: संदेह अलंकार

Your Score

Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /

Post a Comment

Previous Post Next Post