🎯 महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती शिपाई परीक्षा, ड्रायव्हर/चालक भरती, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Mock Test Series - 2025
Police Bharti Mock Test In Marathi | Practice Question Paper
MPSC Battle वर आम्ही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी पोलीस भरती मॉक टेस्ट मराठीतून Police Bharti Mock Test in Marathi खाली दिलेल्या आहेत
महाराष्ट्र पोलीस भरतीच्या तयारीसाठी खाली दिलेल्या सर्व टेस्ट सोडवा
महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा माहिती
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी परीक्षा दोन मुख्य टप्प्यांत घेतली जाते : शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा.
1. परीक्षेचे स्वरूप
अ) शारीरिक चाचणी (Physical Test) - एकूण 50 गुण
शारीरिक चाचणीमध्ये उमेदवाराला एकूण गुणांपैकी किमान 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे
| पुरुष उमेदवार (एकूण 50 गुण) | गुण | महिला उमेदवार (एकूण 50 गुण) | गुण |
|---|---|---|---|
| 1600 मीटर धावणे | 20 | 800 मीटर धावणे | 20 |
| 100 मीटर धावणे | 15 | 100 मीटर धावणे | 15 |
| गोळाफेक (7.26 किग्रॅ) | 15 | गोळाफेक (4 किग्रॅ) | 15 |
ब) लेखी परीक्षा - एकूण 100 गुण
- प्रश्नांचे प्रकार : बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न (MCQs)
- वेळ : 90 मिनिटे
- नकारात्मक गुण : नाही
- पात्रता : लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान 40% गुण मिळवणे आवश्यक आहे
| विषय | प्रश्न संख्या | एकूण गुण |
|---|---|---|
| अंकगणित | 25 | 25 |
| बुद्धिमत्ता चाचणी | 25 | 25 |
| मराठी व्याकरण | 25 | 25 |
| सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 25 | 25 |
| एकूण | 100 | 100 |
2. सविस्तर अभ्यासक्रम
1. अंकगणित- संख्या व संख्यांचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार (पदावली)
- लसावी आणि मसावी
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- शेकडेवारी, नफा-तोटा, आणि सूट
- भागीदारी व सरासरी
- गुणोत्तर व प्रमाण
- काळ, काम, वेग (रेल्वे व पाण्याची टाकी आधारित उदाहरणे)
- सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज
- भूमिती (परिमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ)
- संख्या मालिका व अक्षर मालिका
- सांकेतिक भाषा
- नातेसंबंध
- दिशा व अंतर
- घड्याळ आणि दिनदर्शिका
- वेन आकृत्या आणि तार्किक प्रश्न
- विसंगत घटक ओळखणे
- बैठक व्यवस्था
3. मराठी व्याकरण
- मराठी वर्णमाला (स्वर, व्यंजन, आणि त्यांचे उच्चारस्थान)
- संधी व त्याचे प्रकार
- शब्दांच्या जाती (नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अव्यये)
- काळ, लिंग, वचन, आणि विभक्ती विचार
- प्रयोग आणि समास
- समानार्थी, विरुद्धार्थी आणि अलंकारिक शब्द
- म्हणी आणि वाक्प्रचार (अर्थ व उपयोग)
- विरामचिन्हे आणि शुद्धलेखन
- इतिहास : भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, 1857 चा उठाव, प्रमुख समाजसुधारक आणि स्वातंत्र्य लढा.
- भूगोल : महाराष्ट्राचा भूगोल (नद्या, पर्वत, जिल्हे, हवामान) आणि भारताचा मूलभूत भूगोल.
- भारतीय संविधान : मूलभूत हक्क, कर्तव्ये, राष्ट्रपती, संसद आणि महत्त्वाची कलमे.
- पंचायत राज : ग्रामप्रशासन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद) आणि नागरी प्रशासन.
- सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र.
- चालू घडामोडी : चालू वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा क्षेत्र, पुरस्कार आणि नवीन शासकीय योजना.
महाराष्ट्र पोलीस दलात भरती होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी पोलीस भरती परीक्षेची योग्य तयारी आणि वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे . यात Police Bharti Mock Test हे एक अत्यंत उपयुक्त साधन आहे. mpsc battle वर आम्ही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दर्जेदार आणि मोफत मॉक टेस्ट उपलब्ध करून देतो, ज्यामुळे तुमच्या तयारीला एक नवीन बळ मिळेल.
Mock Test for Police Bharti यामध्ये सहभागी झाल्याने तुम्हाला परीक्षेचं स्वरूप, प्रश्नांची पातळी आणि वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं याची स्पष्ट कल्पना येते. Police Bharti Mock Test In Marathi मध्ये भाग घेऊन तुम्ही परीक्षेचा अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकता. MPSC Battle प्लॅटफॉर्मवर या चाचण्या फ्री / मोफत उपलब्ध आहेत, जेणेकरून कोणताही उमेदवार कोणत्याही अडचणीशिवाय सराव करू शकेल.
💌 महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला या Mock Test मध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर mpscbattle@gmail.com वर सविस्तर मेल करा. जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
आम्ही या पेजवर नवनवीन Police Bharti Mock Test सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस भरती लेखी परीक्षेचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या
जर ही Police Bharti Mock Test Series उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका ..........
© MPSC Battle - Police Bharti Mock Test In Marathi | Police Bharti Practice Question
