Marathi Grammar Online Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट - 26
Marathi Grammar Mock Test | मराठी व्याकरण टेस्ट क्रमांक - 26
MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, महाराष्ट्र गट 'क' सेवा - राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक - टंकलेखक त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य सेवक भरती, वनरक्षक भरती आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अतिशय उपयुक्त - मराठी व्याकरण सराव टेस्ट सिरीज
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 25
🔰 गुण : 25
⏲️ वेळ : 25 मिनिटे
प्रश्नांचे विश्लेषण / स्पष्टीकरण पाहण्यासाठी, टेस्ट सबमिट करा आणि नंतर View Question Analysis बटणावर क्लिक करा
Marathi grammar online test,Marathi grammar mock test,Marathi vyakaran online test,Marathi grammar quiz,Marathi vyakaran mock test,Marathi grammar test paper,Marathi grammar online test free,Free marathi grammar mock test,Marathi vyakaran practice set,Marathi grammar online quiz free,Marathi vyakaran test series free,Marathi grammar question paper pdf,TCS pattern marathi vyakaran online test series,TCS Pattern Marathi Vyakaran Mock Test,मराठी व्याकरण मॉक टेस्ट,मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट,मराठी व्याकरण सराव पेपर,मराठी ग्रामर प्रश्न
तो नेहमीच उशिरा येत असतो. या वाक्यातील काळ ओळखा ?
❶ अपूर्ण वर्तमानकाळ
❷ रीती वर्तमानकाळ
❸ साधा वर्तमानकाळ
❹ पूर्ण वर्तमानकाळ
कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ कंजूष
❷ उदार
❸ चतुर
❹ श्रीमंत
दिगंबर या शब्दाचा अचूक संधी विग्रह ओळखा ?
❶ दिग + अंबर
❷ दिक् + अंबर
❸ दिं + अंबर
❹ दिः + अंबर
स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणारा या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा ?
❶ अष्टपैलू माणूस
❷ अक्कलवान
❸ उंटावरचा शहाणा
❹ कर्णाचा अवतार
नवरात्र हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ द्विगु समास
❷ द्वंद्व समास
❸ कर्मधारय समास
❹ बहुव्रीहि समास
पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा ?
❶ मोर - मोरणी
❷ प्राध्यापक - प्राध्यापक
❸ उंट - उंटणी
❹ बोका - बोकी
पक्षी हवेत उडाला. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ सकर्मक कर्तरी प्रयोग
❷ अकर्मक कर्तरी प्रयोग
❸ कर्मणी प्रयोग
❹ भावे प्रयोग
काही कारणास्तव पावसाळ्यात आकाश ढगांनी दाटून येते. या वाक्यातील 'ढगांनी' या शब्दाची विभक्ती ओळखा ?
❶ द्वितीया
❷ तृतीया
❸ पंचमी
❹ सप्तमी
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ माहिती
❷ शिक्षीका
❸ कवियित्री
❹ परिपुर्ण
केळीचे सुकलेले पान - या शब्दसमूहासाठी एक शब्द द्या ?
❶ ढलपा
❷ चोई
❸ सोपट
❹ पाचोळा
गोगलगाय नि पोटात पाय या म्हणीचा अचूक अर्थ काय ?
❶ गोगलगाईचे पाय पोटात असतात.
❷ बाहेरून अत्यंत गरीब व निरुपद्रवी दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती.
❸ हळूहळू काम करणारा माणूस.
❹ गर्विष्ठ मनुष्य.
तो गाणे गातो. या वाक्यातील 'गातो' हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे ?
❶ अकर्मक क्रियापद
❷ सकर्मक क्रियापद
❸ द्विकर्मक क्रियापद
❹ उभयविध क्रियापद
भृंग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
❶ वारा
❷ भ्रमर
❸ आकाश
❹ पक्षी
आईने मुलाला शाळेत पाठवले. या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ कर्मणी प्रयोग
❸ सकर्मक भावे प्रयोग
❹ अकर्मक भावे प्रयोग
घोडा या शब्दाचे योग्य सामान्यरूप ओळखा ?
❶ घोडे
❷ घोड्या
❸ घोड्याला
❹ घोड्यांवर
उंट या प्राण्याचा समूह काय म्हणून ओळखला जातो ?
❶ तांडा
❷ ताफा
❸ कळप
❹ जुडी
पुढीलपैकी कोणता शब्द 'नदी' या शब्दाचा समानार्थी नाही ?
❶ सरिता
❷ तटिनी
❸ तरंगिणी
❹ दुहिता
अति तेथे _____ . ही प्रसिद्ध म्हण पूर्ण करा ?
❶ माती
❷ खाती
❸ रडती
❹ पडती
मुलांनी शांत बसावे. हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ?
❶ आज्ञार्थी वाक्य
❷ विद्यार्थी वाक्य
❸ विधानार्थी वाक्य
❹ संकेतार्थी वाक्य
चांदीचे चमचे लाभणे - या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय ?
❶ चांदीचे भांडे मिळणे
❷ श्रीमंत किंवा गर्भश्रीमंत कुटुंबात जन्म घेणे
❸ व्यापार करणे
❹ बक्षीस मिळणे
कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल ?
❶ कवीत्री
❷ कवयित्री
❸ कवित्री
❹ कवियत्री
सूर्योदय या शब्दाचा समास ओळखा ?
❶ अव्ययीभाव समास
❷ तत्पुरुष समास
❸ द्वंद्व समास
❹ बहुव्रीहि समास
पळसाला पाने _____ . ही म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा ?
❶ तीनच
❷ चारच
❸ पाचच
❹ दोनच
ती काम करत राहील. या वाक्याचा काळ ओळखा ?
❶ साधा भविष्यकाळ
❷ अपूर्ण भविष्यकाळ
❸ रीती भविष्यकाळ
❹ पूर्ण भविष्यकाळ
उन्हात फिरल्यामुळे त्याचे डोळे लाल झाले. या वाक्यातील 'विशेषण' ओळखा ?
❶ फिरल्यामुळे
❷ डोळे
❸ लाल
❹ झाले
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा