Police Patil Bharti Practice Question Set - 50
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावर आधारित सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
पोलीस पाटील भरती सराव पेपर
Question : 1
रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
Correct Answer : 3
रक्तदाब मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर (Sphygmomanometer) वापरतात. बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठी, तर हायग्रोमीटर आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाते.
Question : 2
आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct Answer : 3
भारतीय संविधानातील कलम 352, 356 आणि 360 नुसार आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींना आहे.
Question : 3
नगरपंचायतीची किमान सदस्य संख्या किती असते ?
Correct Answer : 2
नगरपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांची संख्या किमान 9 आणि कमाल 15 असते.
Question : 4
मानवी विकास निर्देशांक (HDI) मध्ये कोणत्या घटकाचा समावेश नसतो ?
Correct Answer : 4
मानवी विकास निर्देशांक (HDI) मध्ये आरोग्य (आयुर्मान), ज्ञान (शिक्षण) आणि राहणीमान (दरडोई उत्पन्न) हे तीन मुख्य निकष असतात.
Question : 5
वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे ?
Correct Answer : 3
वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे 78% आहे, तर ऑक्सिजनचे प्रमाण साधारण 21% आहे.
Question : 6
'असहकार आंदोलन' कोणत्या घटनेमुळे स्थगित करण्यात आले ?
Correct Answer : 2
5 फेब्रुवारी 1922 रोजी उत्तर प्रदेशातील चौरीचौरा येथे झालेल्या हिंसक घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन स्थगित केले.
Question : 7
'क्षेत्रफळाच्या दृष्टीने' भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
Correct Answer : 3
राजस्थान हे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य आहे, तर लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
Question : 8
धातूंच्या सुवाहकतेमध्ये सर्वात वरचा क्रमांक कोणत्या धातूचा लागतो ?
Correct Answer : 3
चांदी (Silver) हा उष्णता आणि विद्युत धारेचा सर्वात उत्तम सुवाहक धातू आहे.
Question : 9
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
Correct Answer : 3
उच्च न्यायालयाच्या मुख्य आणि इतर न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.
Question : 10
73 वी घटनादुरुस्ती कोणत्या अनुसूचीशी संबंधित आहे ?
Correct Answer : 2
73 व्या घटनादुरुस्तीने संविधानात 11 वी अनुसूची जोडली गेली, जी पंचायत राज संस्थांच्या 29 विषयांशी संबंधित आहे.
Question : 11
भारतातील 'निश्चलनीकरण' (Demonetization) सर्वात अलीकडे कोणत्या वर्षी झाले ?
Correct Answer : 2
8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांचे निश्चलनीकरण करण्याची घोषणा केली होती.
Question : 12
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे ?
Correct Answer : 3
राष्ट्रीय वन धोरणानुसार, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किमान 33% क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे.
Question : 13
'लोकहितवादी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : 1
गोपाळ हरी देशमुख यांनी 'प्रभाकर' साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली आणि ते लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध झाले.
Question : 14
'काझीरंगा' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : 2
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यात असून ते एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
Question : 15
प्रकाशाच्या अपवर्तनामुळे (Refraction) काय घडते ?
Correct Answer : 4
जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो, तेव्हा त्याची दिशा बदलते. यालाच अपवर्तन म्हणतात. वरील सर्व घटना याच तत्त्वावर आधारित आहेत.
Question : 16
लोकसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct Answer : 2
पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार भारताचे राष्ट्रपती लोकसभेचे विसर्जन करू शकतात. राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असून त्याचे विसर्जन होत नाही.
Question : 17
जिल्हा परिषदेचे काम किती समित्यांमार्फत चालते ?
Correct Answer : 3
जिल्हा परिषदेत 1 स्थायी समिती आणि 9 विषय समित्या अशा एकूण 10 समित्या असतात.
Question : 18
भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली ?
Correct Answer : 3
पहिली पंचवार्षिक योजना (1951-1956) मुख्यत्वे कृषी विकासावर केंद्रित होती.
Question : 19
'मिनामाटा' हा रोग कशामुळे होतो ?
Correct Answer : 2
हा रोग पहिल्यांदा जपानमध्ये आढळून आला. पारा (Mercury) दूषित मासे खाल्ल्यामुळे हा चेतासंस्थेचा विकार होतो.
Question : 20
'वंदे मातरम्' हे गीत कोणी लिहिले ?
Correct Answer : 2
बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत हे गीत लिहिले, जे भारताचे राष्ट्रीय गीत आहे.
Question : 21
न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम कशावर आधारित आहे ?
Correct Answer : 2
न्यूटनचा दुसरा नियम सांगतो की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो (F = ma).
Question : 22
भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
Correct Answer : 3
दिल्ली हे एकमेव केंद्रशासित प्रदेश होते ज्याचे स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय होते (आता जम्मू-काश्मीरलाही आहे).
Question : 23
पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
Correct Answer : 3
राजस्थान हे पहिले राज्य होते, तर महाराष्ट्राने 1 मे 1962 रोजी पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आणि तो 9 वा क्रमांक होता.
Question : 24
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात ?
Correct Answer : 4
जीवनसत्व 'ड' च्या अभावामुळे हाडांचा मऊपणा किंवा ठिसूळपणा (Rickets/Osteomalacia) होतो. हे जीवनसत्व सूर्यप्रकाशातून मिळते.
Question : 25
'फेरा' (FERA) च्या जागी कोणता नवीन कायदा आला आहे ?
Correct Answer : 1
Foreign Exchange Regulation Act (FERA) ची जागा 1999 मध्ये Foreign Exchange Management Act (FEMA) ने घेतली.
Question : 26
'एकल वापर प्लास्टिक' (Single-use plastic) बंदी भारतात कधीपासून लागू झाली ?
Correct Answer : 2
पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकारने 1 जुलै 2022 पासून संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली आहे.
Question : 27
'हुतात्मा दिन' कधी पाळला जातो ?
Correct Answer : 2
30 जानेवारी (महात्मा गांधींची पुण्यतिथी) हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. 23 मार्च रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती, तो देखील हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो.
Question : 28
भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Correct Answer : 3
वुलर सरोवर (जम्मू आणि काश्मीर) हे भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे. चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे.
Question : 29
पेशीचा शोध कोणी लावला ?
Correct Answer : 1
रॉबर्ट हूक यांनी 1665 मध्ये बुचाच्या झाडाच्या सालीचा छेद घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यावर पेशींचा (Cells) शोध लावला.
Question : 30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना किती टक्के आरक्षण आहे ?
Correct Answer : 1
महाराष्ट्र हे आरक्षण 50% आहे . महाराष्ट्र हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य होते
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
Very helpful
ReplyDelete