Nashik District Kotwal Bharti Question Paper | नाशिक जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
नाशिक जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ ठाणे
❷ छत्रपती संभाजीनगर
❸ अहिल्यानगर
❹ यापैकी नाही
नाशिक जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ तापी
❷ गोदावरी
❸ गिरणा
❹ मुळा-मुठा
नाशिक जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ पद्मनगर
❷ प्रतिष्ठान
❸ इंद्रप्रस्थ
❹ चंपावती
नाशिक येथे दर किती वर्षांनी कुंभमेळा भरतो ?
❶ 6 वर्षे
❷ 10 वर्षे
❸ 8 वर्षे
❹ 12 वर्षे
नाशिक जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची किती मीटर आहे ?
❶ 821 मीटर
❷ 685 मीटर
❸ 565 मीटर
❹ 762 मीटर
नाशिक जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र प्रामुख्याने किती प्रमुख खोऱ्यांमध्ये विभागले गेले आहे ?
❶ दोन
❷ तीन
❸ चार
❹ पाच
नाशिक हे शहर कोणत्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे ?
❶ द्राक्षे
❷ संत्री
❸ कांदा
❹ डाळिंब
नाशिक जिल्ह्यातील 'लासलगाव' ही बाजारपेठ कशासाठी प्रसिद्ध आहे ?
❶ तांदूळ
❷ सोयाबीन
❸ कापूस
❹ कांदा
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान 'भगूर' नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
❶ निफाड
❷ सिन्नर
❸ नांदगाव
❹ नाशिक
नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता ?
❶ साने गुरुजी
❷ महात्मा गांधी
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ लोकमान्य टिळक
मानवी हाडांच्या निकोप वाढीसाठी व बळकटीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाची प्रामुख्याने आवश्यकता असते ?
❶ व्हिटॅमिन A
❷ व्हिटॅमिन C
❸ व्हिटॅमिन D
❹ व्हिटॅमिन K
भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे ?
❶ Playing It My Way
❷ The Test of My Life
❸ A Century Is Not Enough
❹ 281 and Beyond
कागदनिर्मिती उद्योगात कच्चा माल म्हणून खालीलपैकी कोणत्या वृक्षाच्या लाकडाचा लगदा मोठ्या प्रमाणावर वापरतात ?
❶ सागवान
❷ निलगिरी
❸ चंदन
❹ शिसम
पाण्याचे रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणते आहे ?
❶ CO2
❷ NaCl
❸ H2O
❹ CH4
खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने भारताच्या 'अणुयुगाचा पाया' रचून अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले ?
❶ डॉ. एपीजे अब्दुल कलाम
❷ डॉ. होमी भाभा
❸ डॉ. विक्रम साराभाई
❹ डॉ. सी. व्ही. रामन
जगातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा खालीलपैकी कोणता आहे ?
❶ जोग धबधबा
❷ नायगरा धबधबा
❸ व्हिक्टोरिया धबधबा
❹ एंजल धबधबा
प्राचीन रूढी, परंपरा आणि चालीरीतींना आंधळेपणाने अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ?
❶ पुरोगामी
❷ सनातनी
❸ आधुनिक
❹ बुद्धिवादी
'यक्षगान' हा पारंपरिक नाट्य-नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
❶ केरळ
❷ तामिळनाडू
❸ कर्नाटक
❹ आंध्र प्रदेश
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत ?
❶ 33%
❷ 50%
❸ 25%
❹ 30%
दुपारच्या भोजनानंतर घेतलेली अल्पशी झोप किंवा डुलकी या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?
❶ कुंभकर्ण निद्रा
❷ वामकुक्षी
❸ गाढ झोप
❹ तंद्रा
प्राचीन भारतातील सम्राट हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित 'हर्षचरित' या संस्कृत ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
❶ बाणभट्ट
❷ भवभूती
❸ कालिदास
❹ विशाखादत्त
मुघल साम्राज्याचा सहावा शासक औरंगजेब याने गादीवर बसताना कोणती उपाधी धारण केली होती ?
❶ जहाँगीर
❷ शहानशहा
❸ आलमगीर
❹ गाझी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात स्थित आहे ?
❶ पुणे
❷ नागपूर
❸ नाशिक
❹ मुंबई
विजेच्या दिव्यामध्ये प्रकाश देणाऱ्या फिलामेंटच्या बारीक तारेत खालीलपैकी कोणत्या धातूचा वापर केला जातो ?
❶ निकेल
❷ क्रोमियम
❸ टंगस्टन
❹ तांबे
प्राचीन आणि मध्ययुगीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जगप्रसिद्ध 'खजुराहो लेणी' कोणत्या राज्यात आहेत ?
❶ राजस्थान
❷ मध्य प्रदेश
❸ उत्तर प्रदेश
❹ ओडिशा
मराठी वर्णमालेत 'ळ' या वर्णाला काय मानले जाते ?
❶ महाप्राण
❷ स्वतंत्र वर्ण
❸ अनुनासिक
❹ अर्धस्वर
'त्याने पत्र लिहिले.' या वाक्यातील प्रयोग कोणता आहे ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ भावे प्रयोग
❸ कर्मणी प्रयोग
❹ अकर्मक कर्तरी प्रयोग
'प्रतिदिन' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
❶ अव्ययीभाव समास
❷ तत्पुरुष समास
❸ द्वंद्व समास
❹ बहुव्रीही समास
'तो सायकलवरून पडला.' या वाक्यातील 'सायकलवरून' या शब्दाची विभक्ती कोणती ?
❶ तृतीया
❷ चतुर्थी
❸ पंचमी
❹ षष्ठी
'गाढव' या नामाचे योग्य सामान्यरूप कोणते ?
❶ गाढवा
❷ गाढवी
❸ गाढवे
❹ गाढवास
'रामाने रावणास मारले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी प्रयोग
❷ कर्मणी प्रयोग
❸ भावे प्रयोग
❹ संकीर्ण प्रयोग
'पोटात कावळे ओरडणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय होतो ?
❶ पोट दुखणे
❷ खूप भूक लागणे
❸ भीती वाटणे
❹ अपचन होणे
'श्रावणबाळ आई-वडिलांची सेवा करत असे.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
❶ साधा भूतकाळ
❷ अपूर्ण वर्तमानकाळ
❸ रीती भूतकाळ
❹ पूर्ण भविष्यकाळ
'जंगलात आग लागणे' या शब्दसमूहासाठी एक योग्य शब्द कोणता ?
❶ वडवानल
❷ जठराग्नी
❸ विस्तव
❹ वणवा
'तो सावकाश चालतो.' या वाक्यातील 'सावकाश' हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे ?
❶ कालवाचक
❷ स्थलवाचक
❸ रीतिवाचक
❹ संख्यावाचक
विसंगत पर्याय ओळखा
❶ 12
❷ 18
❸ 24
❹ 31
एका संख्येला 15 ने गुणले असता गुणाकार 225 येतो. तर ती संख्या कोणती ?
❶ 10
❷ 12
❸ 15
❹ 20
1 तास 45 मिनिटे म्हणजे किती सेकंद ?
❶ 5400 सेकंद
❷ 6000 सेकंद
❸ 6300 सेकंद
❹ 6500 सेकंद
A आणि B यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. आणखी 6 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 : 6 होईल, तर A चे आजचे वय किती वर्षे आहे ?
❶ 18
❷ 20
❸ 24
❹ 30
ताशी 72 किमी वेगाने धावणारी 350 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी एका 250 मीटर लांबीच्या बोगद्याला किती सेकंदात ओलांडेल ?
❶ 25 सेकंद
❷ 30 सेकंद
❸ 35 सेकंद
❹ 40 सेकंद
एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेमी, 14 सेमी आणि 15 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल ?
❶ 72
❷ 84
❸ 96
❹ 105
एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौ.सेमी असेल (π = 22/7 घ्या) ?
❶ 484
❷ 576
❸ 616
❹ 648
खालील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 6, 13, 28, 59, 122, ?
❶ 245
❷ 247
❸ 249
❹ 251
सुरेश पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो प्रथम डावीकडे 90 अंश वळतो, नंतर उजवीकडे 135 अंश वळतो. तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ नैऋत्य
❷ वायव्य
❸ ईशान्य
❹ आग्नेय
जर 5 मार्च 2012 रोजी सोमवार होता, तर 5 मार्च 2013 रोजी कोणता वार असेल ?
❶ बुधवार
❷ रविवार
❸ मंगळवार
❹ गुरुवार
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 2, 6, 12, 20, 30, ?
❶ 42
❷ 40
❸ 44
❹ 48
जर 'A' म्हणजे '+', 'B' म्हणजे '-', 'C' म्हणजे '×', आणि 'D' म्हणजे '÷' असेल, तर 24 D 6 C 3 A 8 B 5 चे मूल्य काय असेल ?
❶ 18
❷ 12
❸ 20
❹ 15
विधाने : सर्व टेबल खुर्च्या आहेत. काही खुर्च्या कपाट आहेत.
निष्कर्ष : I. काही टेबल कपाट आहेत. II. काही खुर्च्या टेबल आहेत.
योग्य पर्याय कोणता ?
निष्कर्ष : I. काही टेबल कपाट आहेत. II. काही खुर्च्या टेबल आहेत.
योग्य पर्याय कोणता ?
❶ निष्कर्ष I आणि II दोन्ही सत्य आहेत
❷ फक्त निष्कर्ष II सत्य आहे
❸ फक्त निष्कर्ष I सत्य आहे
❹ दोन्ही निष्कर्ष असत्य आहेत
एका शेतात काही गुराखी आणि काही गायी आहेत. त्यांच्या डोक्यांची एकूण संख्या 25 असून पायांची एकूण संख्या 70 आहे, तर त्या ठिकाणी एकूण गुराखी किती आहेत ?
❶ 15
❷ 10
❸ 20
❹ 12
जर ROSE हा शब्द 6821 असा लिहिला आणि CHAIR हा शब्द 73456 असा लिहिला, तर SEARCH हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 241673
❷ 214763
❸ 214673
❹ 214637
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
