लातूर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर | Latur District Kotwal Bharti Question Paper - 01
BY :MPSC Battle •
0
Latur District Kotwal Bharti Question Paper | लातूर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
लातूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ बीड
❷ नांदेड
❸ धाराशिव
❹ परभणी
लातूर जिल्ह्याची स्थापना कधी झाली ?
❶ 15 ऑगस्ट 1947
❷ 16 ऑगस्ट 1982
❸ 1 मे 1960
❹ 26 जानेवारी 1950
लातूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ मांजरा
❷ तावरजा
❸ तेरणा
❹ घरणी
लातूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ लत्तालूर
❷ हस्तिनापूर
❸ कुरिग्राम
❹ चंपावतीनगर
लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 6,157 चौ. किमी
❷ 9,157 चौ. किमी
❸ 8,157 चौ. किमी
❹ 7,157 चौ. किमी
लातूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?
❶ 1.33%
❷ 2.40%
❸ 3.33%
❹ 4.33%
क्षेत्रफळाच्या दृष्टीने लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?
❶ अहमदपूर
❷ उदगीर
❸ लातूर
❹ औसा
लातूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ पुणे
❷ छत्रपती संभाजीनगर
❸ नाशिक
❹ नागपूर
लातूर येथील प्रसिद्ध 'खरोसा लेणी' कोणत्या तालुक्यात आहेत ?
❶ लातूर
❷ उदगीर
❸ औसा
❹ रेणापूर
ऐतिहासिक 'उदगीरचा किल्ला' कोणत्या दोन सत्तांमधील लढाईसाठी प्रसिद्ध आहे ?
❶ मराठा आणि निजाम
❷ मराठा आणि मुघल
❸ निजाम आणि आदिलशाह
❹ इंग्रज आणि मराठा
जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे ?
❶ पहिला
❷ दुसरा
❸ तिसरा
❹ चौथा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
❶ चंद्रपूर
❷ अमरावती
❸ नागपूर
❹ मुंबई
महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात कोणती मृदा विकसित झाली आहे ?
❶ जांभी मृदा
❷ तांबडी मृदा
❸ काळी रेगूर मृदा
❹ गाळाची मृदा
श्यामची आई कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
❶ वि. स. खांडेकर
❷ साने गुरुजी
❸ प्र. के. अत्रे
❹ वि. वा. शिरवाडकर
प्लासीची लढाई कोणामध्ये झाली ?
❶ सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाईव्ह
❷ टिपू सुलतान आणि लॉर्ड कॉर्नवॉलिस
❸ मीर कासीम आणि हेक्टर मुनरो
❹ बहादूर शाह आणि लॉर्ड डलहौसी
ओझोन वायूचा थर कोणत्या घातक किरणांना पृथ्वीवर येऊ देत नाही ?
❶ अवरक्त किरणे (Infrared Rays)
❷ अतिनील किरणे (Ultraviolet Rays)
❸ गॅमा किरणे (Gamma Rays)
❹ क्ष-किरणे (X-Rays)
कोणता हा सर्वात प्राचीन वेद आहे ?
❶ यजुर्वेद
❷ सामवेद
❸ ऋग्वेद
❹ अथर्ववेद
सुप्रसिद्ध अमरनाथ गुहा कोठे आहे ?
❶ हिमाचल प्रदेश
❷ उत्तराखंड
❸ सिक्कीम
❹ जम्मू आणि काश्मीर
लाल-बाल-पाल या जोडीमधील पाल हे कोण होते ?
❶ बिपिन चंद्र पाल
❷ देवेन्द्र पाल
❸ पाल कृष्ण गोखले
❹ धरम पाल
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
❶ संबंधित राज्याचे राज्यपाल
❷ भारताचे राष्ट्रपती
❸ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
❹ भारताचे पंतप्रधान
गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो ?
❶ प्रोपेन
❷ ब्युटेन
❸ मिथेन
❹ कार्बन मोनॉक्साइड
भुदान चळवळ कोणी सुरू केली ?
❶ जयप्रकाश नारायण
❷ आचार्य विनोबा भावे
❸ महात्मा गांधी
❹ बाबा आमटे
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला ?
❶ लाल बहादूर शास्त्री
❷ सुभाषचंद्र बोस
❸ भगतसिंग
❹ पंडित जवाहरलाल नेहरू
अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
❶ तिरंदाजी
❷ नेमबाजी
❸ कुस्ती
❹ बॅडमिंटन
नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती आहेत ?
❶ XX
❷ YY
❸ XY
❹ XO
मराठी भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे ?
❶ मोडी
❷ देवनागरी
❸ कानडी
❹ गुरुमुखी
खालीलपैकी 'स्वर' कोणता आहे ?
❶ क
❷ प
❸ आ
❹ च
'घोडा' या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते होईल ?
❶ घोडी
❷ घोड्या
❸ घोडे
❹ घोड्यांना
नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात ?
❶ सर्वनाम
❷ विशेषण
❸ क्रियापद
❹ क्रियाविशेषण
'आंबा गोड आहे.' या वाक्यातील विशेषण ओळखा ?
❶ आंबा
❷ गोड
❸ आहे
❹ वरीलपैकी नाही
'गाय' या शब्दाचे लिंग कोणते आहे ?
❶ पुल्लिंग
❷ नपुंसकलिंग
❸ स्त्रीलिंग
❹ उभयलिंग
वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावर शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात ?
❶ स्वल्पविराम
❷ प्रश्नचिन्ह
❸ उद्गारचिन्ह
❹ पूर्णविराम
'सूर्य' या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे ?
❶ चंद्र
❷ रवी
❸ वारा
❹ पाणी
'दिवस' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
❶ सकाळ
❷ रात्र
❸ दुपार
❹ संध्याकाळ
'नाकापेक्षा मोती जड' या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ?
❶ खूप श्रीमंत असणे
❷ नाकात दागिना घालणे
❸ मालकापेक्षा नोकर शिरजोर होणे
❹ मोत्याचा आकार मोठा असणे
संख्या मालिका पूर्ण करा : 27, 64, 125, .............
❶ 196
❷ 216
❸ 225
❹ 256
CUT : XFG :: YES : ?
❶ BWH
❷ BVG
❸ BVH
❹ YVH
एका सांकेतिक भाषेत SPY = 21, SEND = 66 तर त्याच भाषेत MARK या शब्दाचे सांकेतिक रूप खालीलपैकी कोणते ?
❶ 65
❷ 63
❸ 67
❹ 69
विधान : 1. काही बैल वर्तुळ आहेत. 2. सर्व वर्तुळ सिंह आहेत. अनुमान : अ) सर्व सिंह वर्तुळ आहेत. ब) सर्व बैल वर्तुळ आहेत. क) काही बैल सिंह आहेत. ड) काही सिंह बैल आहेत. योग्य अनुमान कोणते ?
❶ अ आणि ब
❷ ब आणि क
❸ अ आणि ड
❹ क आणि ड
एका सांकेतिक भाषेत खटारा हा शब्द 0∆X असा लिहितात तर खराटा हा शब्द कसा लिहाल ?
❶ 0∆X
❷ 0X∆
❸ X0∆
❹ ∆0X
रिकाम्या जागी योग्य अक्षरे लिहा : a_ab_babab_b
❶ b, b, b
❷ a, b, a
❸ b, a, a
❹ a, a, b
5 : 125 तर 7 : ?
❶ 343
❷ 245
❸ 315
❹ 729
संख्या मालिका पूर्ण करा : 3, 5, 9, 17, 33, 65, 129, ---------
❶ 193
❷ 225
❸ 257
❹ 257
एक मुलगा 12 मिनिटात एक कागद टाईप करतो तर 16 कागद टाईप करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल ?
❶ 3 तास
❷ 3 तास 12 मिनिटे
❸ 2 तास 48 मिनिटे
❹ 3 तास 30 मिनिटे
70 व 105 या दोन संख्यांचा लसावी काढा ?
❶ 140
❷ 350
❸ 210
❹ 105
रमेशला वर्षाअखेर 63000 रुपये पगार मिळतो मिळणाऱ्या एकूण पगारातून तो दरमहा 1000 रुपये बचत करतो तर त्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न किती ?
❶ 5250 रुपये
❷ 4250 रुपये
❸ 6250 रुपये
❹ 5000 रुपये
125 चे 13% किती ?
❶ 15.25
❷ 18.50
❸ 17.75
❹ 16.25
A हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतो , B तेच काम 24 दिवसात पूर्ण करतो , तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?
❶ 6 दिवस
❷ 8 दिवस
❸ 10 दिवस
❹ 16 दिवस
√256 + √729 = ?
❶ 39
❷ 41
❸ 43
❹ 45
5, 15, 40, या संख्येची सरासरी किती ?
❶ 20
❷ 25
❸ 30
❹ 15
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न
विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा